Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिलांमध्ये PCOD, PCOS च्या समस्या का वाढत आहे? शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

हल्ली बऱ्याच महिलांमध्ये पीसीओएस किंवा पीसीओडीची समस्या वाढत चालली आहे. मासिक शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे मासिक पाळीच्या चक्रात मोठे बदल दिसून येतात. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: May 10, 2026 | 08:20 AM
महिलांमध्ये PCOD, PCOS च्या समस्या का वाढत आहे? शरीरात दिसणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

महिलांमध्ये PCOD, PCOS च्या समस्या का वाढत आहे? शरीरात दिसणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Follow Us
Follow Us:

मासिक पाळीच्या चक्रात बदल होण्याची कारणे?
पीसीओएस म्हणजे काय आणि लक्षणे?
पीसीओएसचा धोका कोणत्या महिलांना जास्त असतो?

सर्वच महिलांच्या शरीरात सतत हार्मोनल बदल होत असतात. या बदलांमुळे काहीवेळा महिला खूप जास्त आजारी पडतात. हार्मोन्सचे संतुलन बिघडल्यानंतर महिलांच्या शरीरावर त्याचे थेट परिणाम दिसून येतात. मासिक पाळीच्या चक्रात बदल, गर्भधारणेत अडथळे, अचानक वाढलेले वजन, चेहऱ्यावर केस इत्यादी असंख्य लक्षणे शरीरात दिसून येतात. मासिक पाळीच्या चक्रात बदल झाल्यानंतर प्रामुख्याने उद्भवणारी समस्या म्हणजे PCOD, PCOS. पीसीओएस हा महिलांमध्ये आढळून येणारा हार्मोनल आजार आहे. हार्मोन्सचे असंतुलन आणि इन्सुलिन रेझिस्टन्स इत्यादी कारणांमुळे ही समस्या उद्भवते. जीवनशैलीत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, मानसिक तणाव आणि शारीरिक हालचालींचा अभाव निर्माण झाल्यामुळे मासिक पाळीच्या चक्रात अनेक बदल होतात.(फोटो सौजन्य – istock)

Mothers Day 2026 : महिलांनी दुर्लक्षित करू नयेत अशा 5 महत्त्वाच्या आरोग्य तपासण्या, तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला

पीसीओएस किंवा पीसीओडी झाल्यानंतर वेळीच योग्य त्या चाचण्या आणि उपचार केल्यास शरीरसंबंधित समस्यांपासून सुटका मिळवता येईल. शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे चेहऱ्यावर मुरुम, केस गळणे इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करून शरीराची काळजी घ्यावी. चला तर जाणून घेऊया महिलांमध्ये का वाढत आहे पीसीओएस किंवा पीसीओडीची समस्या आणि त्याची गंभीर लक्षणे, याबद्दल सविस्तर माहिती.

महिलांमध्ये का वाढत आहे पीसीओएस किंवा पीसीओडीची समस्या?

ज्यावेळी शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडून जाते, तेव्हा पीसीओएसची समस्या उद्भवते. स्त्रियांच्या शरीरात ‘अँड्रोजन’ या पुरुष संप्रेरकाची पातळी वाढत जाते, तेव्हा महिलांमध्ये ‘इन्सुलिन रेझिस्टन्स’ होण्यास सुरुवात होते. या स्थितीमध्ये शरीर इन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नाही, ज्याच्या परिणामामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढू लागते. रक्तातील साखर वाढल्यानंतर वजन वाढण्यास सुरुवात होते. कुटुंबातील कोणत्याही महिलेला पीसीओएस किंवा मधुमेहाचा त्रास असेल तर ही समस्या उद्भवू शकते.

पीसीओएसची गंभीर लक्षणे:

  • अनियमित मासिक पाळी आणि चक्रात बिघाड
  • पोटाचा घेर वाढून झपाट्याने वजन वाढणे
  • चेहऱ्यावर आणि अंगावर अनावश्यक केस वाढणे
  • चेहऱ्यावर मुरुम येणे, त्वचा तेलकट होणे किंवा मानेची त्वचा कोरडी पडणे
  • केस विरळ होत जाणे
What is E-Cigarette? ई-सिगारेट म्हणजे काय? जाणून घ्या वेपिंगबाबतचे समज आणि गैरसमज?

पीसीओएसची समस्या टाळण्यासाठी आहारात कोणते बदल करावे:

शरीरातील हार्मोन्स संतुलित राहण्यासाठी आहार आणि व्यायाम करणे फार आवश्यक आहे. रक्तातील इन्सुलिनची पातळी स्थिर ठेवण्यासाठी ओट्स, ब्राऊन राईस आणि बाजरी, नाचणी यांसारख्या धान्यांचा आहारात समावेश करावा. यासोबतच अंडी, मासे, पनीर, डाळी आणि कडधान्ये इत्यादी पदार्थ सुद्धा खावेत. दुपारच्या जेवणानंतर नियमित दही, ताक किंवा लस्सी प्यावी. यामुळे पचनक्रिया निरोगी राहण्यासोबतच हार्मोन्सची पातळी संतुलित राहते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: PCOD आणि PCOS म्हणजे काय?

    Ans: PCOD (Polycystic Ovarian Disease) आणि PCOS (Polycystic Ovary Syndrome) हे महिलांमध्ये आढळणारे हार्मोनल विकार आहेत. यामध्ये अंडाशयांवर लहान सिस्ट तयार होतात आणि हार्मोन्सचे संतुलन बिघडते.

  • Que: PCOD मुळे गर्भधारणेमध्ये अडचणी येऊ शकतात का?

    Ans: होय. PCOD आणि PCOS मुळे ओव्ह्युलेशनमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे गर्भधारणेत समस्या येऊ शकतात.

  • Que: PCOD आणि PCOS पूर्णपणे बरे होऊ शकतात का?

    Ans: ही समस्या पूर्णपणे नाहीशी होणे कठीण असले तरी योग्य जीवनशैली आणि उपचारांच्या मदतीने ती नियंत्रणात ठेवता येते.

Web Title: Why is the problem of pcod pcos increasing in women do not ignore these symptoms in the body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 08:20 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • PCOD
  • Womens Health

संबंधित बातम्या

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी
1

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी

PCOS and Diabetes Risk: PCOS मुळे मधुमेहाचा धोका वाढू शकतो का?
2

PCOS and Diabetes Risk: PCOS मुळे मधुमेहाचा धोका वाढू शकतो का?

Health Tips: चेहऱ्यावर पिंपल्स, वाढत वजन अन्…; ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा…
3

Health Tips: चेहऱ्यावर पिंपल्स, वाढत वजन अन्…; ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा…

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ
4

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.