Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Father’s Day 2026: जागतिक पितृदिन का साजरा केला जातो? जाणून घ्या यामागील इतिहास आणि यंदाची थीम

जगभरात सगळीकडे जागतिक पितृदिन २१ जूनला साजरा केला जातो. या दिवशी वडिलांना सुंदर भेटवस्तू देऊ शकता. वडिलांचा सन्मान करण्यासाठी आणि त्याच्याप्रति असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी जागतिक पितृदिन साजरा केला जातो.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 17, 2026 | 01:49 PM
जागतिक पितृदिन का साजरा केला जातो? जाणून घ्या यामागील इतिहास आणि यंदाची थीम

जागतिक पितृदिन का साजरा केला जातो? जाणून घ्या यामागील इतिहास आणि यंदाची थीम

Follow Us
Follow Us:

कुटुंब एकत्र जोडून ठेवण्यासाठी जशी आई महत्वाची असते तसेच वडील सुद्धा कुटुंबासाठी अतिशय महत्वाचे आहेत. भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये २१ जूनला जागतिक फादर्स डे साजरा केला जातो. हा दिवस जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात असतो. मुलांच्या सुखासाठी आणि त्यांच्या उज्वल भविष्यसाठी वडील कायमच झटत असतात. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर वडिलांच्या निस्वार्थ प्रेमाची आणि मार्गदर्शनाची कायमच सगळ्यांना आवश्यकता भासते. यादिवशी तुम्ही तुमच्या वडिलांना सुंदर भेटवस्तू आणि शुभेच्छा देऊन हा दिवस आनंदात साजरा करू शकता. वडिलांनी आयुष्यभर दिलेल्या प्रेम, मार्गदर्शन, त्याग आणि खंबीर पाठिंब्याची सगळ्यांना कायम आवश्यकता असते. चला तर जाणून घेऊया जागतिक पितृदिन का साजरा केला जातो? काय आहे पितृदिनाचा इतिहास आणि यंदाची थीम? जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य – istock)

Father’s Day 2025: जून महिन्यात या दिवशी साजरा केला जाणार फादर्स डे …

जागतिक पितृदिनाचा इतिहास?

भारतासह अमेरिका, कॅनडा आणि युनायटेड किंगडम इत्यादी अनेक देशांमध्ये जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात पितृदिन साजरा केला जातो. वडिलांविषयी आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. पितृदिनाची सुरुवात अमेरिकेत २० व्या शतकाच्या सुरुवातीला झाली होती. ही एक चळवळ होती, जी स्पोकेन येथील सोनोरा स्मार्ट डोड नावाच्या महिलेशी मोठ्या प्रमाणावर जोडण्यात आलेली आहे. मदर्स डेच्या उत्सवांपासून प्रेरणा घेऊन, डोड यांना वडिलांसाठी एक दिवस समर्पित करण्यासाठी हवा होता. पत्नीच्या निधनानंतर एकट्याने सहा मुलांचे संगोपन करणाऱ्या आपल्या वडिलांचा सन्मान करण्यासाठी त्यांना एक दिवस हवा होता. डोड यांचे वडील गृहयुद्धातील एक अनुभवी सैनिक होते.

१९१० मध्ये स्पोकेन येथे पहिल्यांदा फादर्स डे सोहळा साजारा करण्यात आला होता. त्यानंतरच्या दशकांमध्ये, हा उत्सव देशभरात लोकप्रिय झाला. १९७२ मध्ये अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे वार्षिक उत्सव म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा करत त्यावर स्वाक्षरी केली. त्यानंतर अधिकृतपणे राष्ट्रीय सुट्टी म्हणून मान्यता सुद्धा देण्यात आली.तेव्हापासून फादर्स डे हा एक जागतिक सण बनला आहे. पितृदिन दिन हा केवळ उत्सव नसून वडील आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी देत ​​असलेल्या अनेक योगदानांची दखल घेण्याची एक संधी आहे.

Father’s Day 2025: यंदाच्या फादर्स डे ला आपल्या वडीलांना करा खुश …

पितृदिनाची थीम २०२६:

फादर्स डे २०२६ ची मुख्य संकल्पना अशी आहे की, वडील: मार्गदर्शक शक्ती आणि भविष्याची उभारणी. वडील आपल्या आयुष्यात देत असलेल्या भावनिक आधाराचा, शहाणपणाचा आणि स्थिर उपस्थितीचा सन्मान करणे, अशी जागतिक पितृदिनाची थीम आहे. यंदाच्या पितृदिनाला वडिलांना तुम्ही क्लासिक शर्ट्स, पाकिटे, सनग्लासेस, घड्याळे, वायरलेस इअरबड्स, स्मार्टवॉचेस, पोर्टेबल स्पीकर्स, फोन ॲक्सेसरीज भेटवस्तू म्हणून देऊ शकता.

Web Title: Why is world fathers day celebrated learn about the history behind it and this years theme

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 01:49 PM

Topics:  

  • father in law
  • Fathers Day
  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

Gardening Tips: तुळशीचे रोप वारंवार सुकून जातंय? ‘या’ पद्धतीने घ्या तुळशीच्या रोपाची काळजी, कायमच राहील हिरवीगार
1

Gardening Tips: तुळशीचे रोप वारंवार सुकून जातंय? ‘या’ पद्धतीने घ्या तुळशीच्या रोपाची काळजी, कायमच राहील हिरवीगार

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय
2

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय

कोळदुर्ग किल्ल्यावर वॉटरफॉल रॅपलिंगचा थरार अनुभवायचाय का? ‘दुर्गम सह्याद्री’च्या कुशीत धाडसाची अनुभूती! जाणून घ्या
3

कोळदुर्ग किल्ल्यावर वॉटरफॉल रॅपलिंगचा थरार अनुभवायचाय का? ‘दुर्गम सह्याद्री’च्या कुशीत धाडसाची अनुभूती! जाणून घ्या

Soaked Black Chana: प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत! रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे
4

Soaked Black Chana: प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत! रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.