श्रावणात मांसाहार खाणे का टाळावे
हिंदू धर्मात श्रावण महिन्यात मांसाहार न करण्याचा सल्ला दिला जातो. बहुसंख्य लोकांना याचे कारण धार्मिक असल्याचे वाटू शकते. पण आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही या महिन्यात मांसाहार न करणे फायदेशीर आहे. कारण श्रावण हा पावसाळ्याचा महिना आहे, ज्यामध्ये घाणीमुळे संसर्ग होण्याचा धोका खूप वाढतो.
श्रावणात अथवा पावसाळ्याच्या महिन्यात जीवाणू अन्नपदार्थांवरही अधिक प्रमाणात असतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही मांसाहारी पदार्थ खात असाल तर या लेखात दिलेल्या् समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. या लेखातून आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या बाबी सांगितल्या आहेत. (फोटो सौजन्य – iStock)
संक्रमणाचा धोका
मांसाहाराने वाढतो आजाराचा धोका
पावसाळ्यात जिवाणू आणि जंतूंची वाढ झपाट्याने होते. हे मांसाहारी जेवणावर वा आहारावर विकसित होण्याची शक्यता जास्त असते. जर मांस योग्य प्रकारे शिजवले नाही तर संसर्गाचा धोका वाढतो. त्यामुळे अन्नातून विषबाधा, टायफॉइड आदी आजारांचा धोका असतो. मांसाहार खाल्ल्याने लवकर संक्रमणाचा धोका उद्भवतो.
हेदेखील वाचा – मलेरिया की डेंग्यूः ताप कशामुळे आला हे कसे ओळखावे?
कमकुवत रोगप्रतिकारकशक्ती
पावसाळ्यात मांसाहार केल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते. यामुळे संक्रमणाशी लढण्याची क्षमता कमी होते. त्यामुळेच पावसाळ्यात माणसं अधिक आजारी पडल्याचेही दिसते. काही जण श्रावण पाळत नाहीत, त्यांना मांसाहार हा लागतोच. पण या महिन्यात मांसाहार मुळात न करण्याचं कारण धार्मिक नसून आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
मांसाहार पचनसाठी जड
पचनक्रियेवर होतो परिणाम
मांसाहार हे सामान्यतः जड अन्न मानले जाते. पावसाळ्यात शरीराला हलके आणि सहज पचणारे अन्न हवे असते. अशा स्थितीत पावसाळ्यात मांसाहार खाल्ल्याने पचनास त्रास होऊ शकतो. ज्यांना बद्धकोष्ठता, पचनक्रियेशी संबंधित आजार आहेत, त्यांनी तर अजिबात मांसाहार श्रावणात करू नये. कारण हे आजार वाढण्याचीही शक्यता निर्माण होते.
हेदेखील वाचा – अशी लक्षणे दिसत असतील तर समजा किडनी झालीये कमकुवत, दुर्लक्ष करणे पडेल महागात!
त्वचेची समस्या
पावसाळ्यात त्वचा अधिक संवेदनशील होते. तर मांसाहारी पदार्थ जड असल्याने त्वचेवर अतिरिक्त भार पडू शकतो. त्यामुळे मुरुम आणि एक्जिमा सारख्या समस्या वाढू शकतात. त्वचा अधिक संवेदनशील होऊन त्यावर रॅश येणे अथवा पावसाच्या पाण्यामुळे बाहेरून आणि मांसाहार केल्यामुळे आतून अशा दोन्ही पद्धतीने त्वचेला त्रास होऊ शकतो.
संदर्भ
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC4776969/
https://www.sciencedirect.com/science/article/abs/pii/S2212958823000010
https://www.docplexus.com/posts/non-veg-diet-has-adverse-effect-on-health