मलेरिया विरूद्ध डेंग्यू
ताप हे मलेरिया आणि डेंग्यू या दोन्ही रोगांचे सामान्य लक्षण आहे, हे दोनही रोग उष्णकटिबंधीय आणि उप-उष्णकटिबंधीय प्रदेशात डासांमुळे होतात. तथापि, प्रभावी उपचार आणि व्यवस्थापनासाठी त्यांच्यातील फरक लक्षात घेणे महत्त्वपूर्ण आहे. लक्षणे, संक्रमण आणि निदान पद्धतीं मधील फरक समजून घेतल्यास तापाचे कारण समजण्यात मदत मिळू शकते.
डॉ. अजय शहा, व्यवस्थापकीय संचालक, न्यूबर्ग अजय शाह प्रयोगशाळा यांनी याबाबत अधिक माहिती देत योग्य सल्लाही दिला आहे. तुम्हालाही यातील फरक कळत नसेल तर तुम्ही हा लेख नक्की वाचावा (फोटो सौजन्य – iStock)
मलेरिया कसा होतो?
ताप कसा येतो
प्लाझ्मोडियम परजीवींमुळे होणारा मलेरिया अॅनोफिलीस डासाची संक्रमित मादी चावल्यास पसरतो. प्लाझ्मोडियमच्या अनेक प्रजाती आहेत, ज्यामध्ये प्लाझ्मोडियम फाल्सीपॅरम सर्वात गंभीर आहे. याबाबत वेगवेगळे अभ्यासही करण्यात आले आहेत.
डेंग्यू ताप कसा होतो?
डेंग्यू ताप हा डेंग्यू विषाणूमुळे होतो, ज्यामध्ये चार सेरोटाइप (डीइएनव्ही -1, डीइएनव्ही -2, डीइएनव्ही -3 आणि डीइएनव्ही -4) असतात. याचे संक्रमण हे प्रामुख्याने एडीस एजिप्सी आणि एडीस अल्बोपिक्टस या एडीस डासांद्वारे होते. दोन्ही रोगांमध्ये ताप येतो, परंतु त्याची वेगळी लक्षणे त्यांच्यातील फरक ओळखण्यास मदत करू शकतात.
मलेरियाची माहिती
डेंग्यूची माहिती
मलेरियासाठी निदान
योग्य उपचारासाठी योग्य निदान आवश्यक आहे.
डेंग्यूसाठी निदान
हेदेखील वाचा – Immune Boosting Herbs: पावसाळ्यात आजारांना दूर ठेवतील 4 वनस्पती, असे करा सेवन
उपचार
दोन्ही आजारांवर काय उपाय करावा
दोन्ही आजारांना वेगवेगळ्या उपचारपद्धतीची गरज असते.
मलेरिया: उपचारांमध्ये सामान्यत: क्लोरोक्वीन, आर्टेमिसिनिन-बेस्ड कॉम्बिनेशन ट्रीटमेन्ट (एसीटी) किंवा प्लाझमोडियम प्रजातीनुसार मलेरियारोधक औषधे दिली जातात.
डेंग्यूः डेंग्यूवर कोणतेही विशिष्ट अँटीव्हायरल उपचार नाहीत. यामध्ये काळजीवर लक्ष केंद्रित केले जाते, ज्यामध्ये योग्य हायड्रेशन, एसीटॅमिनोफिन देऊन वेदना कमी करणे (रक्तस्त्राव होण्याचा धोका असल्याने आयबुप्रोफेन आणि अॅस्पिरिन सारख्या एनएसएआयडी टाळणे), आणि डेंग्यू हेमोरॅजिक फीव्हर (डीएचएफ) किंवा डेंग्यू शॉक सिंड्रोम (डीएसएस) सारख्या गंभीर अडचणीं वर लक्ष ठेवणे.
प्रतिबंध कसा करावा?
या दोन्ही आजारांसाठी प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वाचे आहेत.
मलेरिया: कीटक प्रतिकारक वापरणे, झोपताना कीटकनाशक लावलेल्या मच्छरदाण्या वापरणे आणि बाधित भागात प्रवास करताना प्रॉफिलॅटिक मलेरिया प्रतिबंधक औषधे घेतल्यास मलेरियाचा प्रतिबंध करणे शक्य होते.
डेंग्यू: प्रतिबंधात्मक उपायांमध्ये कीटक प्रतिकारक वापरणे, संरक्षक कपडे घालणे, साचलेले पाणी काढून टाकणे जेणेकरून डासांचे प्रजनन होण्यास आळा बसेल आणि समुदाय – व्यापी डास नियंत्रण कार्यक्रमांचा समावेश आहे.
मलेरिया आणि डेंग्यू दोन्ही तापास कारणीभूत ठरतात आणि डासांद्वारे संक्रमित होतात, परंतु त्यांची लक्षणे, निदान आणि उपचारांमध्ये फरक आहेत. योग्य आणि प्रभावी वैद्यकीय उपचारांसाठी हे फरक ओळखणे महत्वाचे आहे.