Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Winter Health Care : हिवाळ्यात दही खाताना ‘ही’ सोपी ट्रीक वापरा, कधीच त्रास होणार नाही!

दही थंडीत खाऊ नये असं आरोग्यतज्ज्ञ सांगतात. असं असलं तरी काही सोप्या ट्रीक्स आहेत ज्या वापरल्याने थंडीत दिवसात तुम्ही दही खाल्लं तरी त्याचा त्रास जास्त प्रमाणात होणार नाही. कोणती आहे ही सोपी ट्रीक जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 23, 2025 | 11:31 PM
Winter Health Care : हिवाळ्यात दही खाताना ‘ही’ सोपी ट्रीक वापरा, कधीच त्रास होणार नाही!
Follow Us
Close
Follow Us:
  • दही खायला आवडतं पण सर्दी होतेय ?
  • हिवाळ्यात दही खावं की खाऊ नये ?
  • दही खाताना ‘ही’ सोपी ट्रीक वापरा
दही खाणं हे शरीरासाठी फायदेशीर आहे. आयुर्वेदानुसार रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी दही खाणं अत्यंत गुणकारी मानलं जातं. मात्र थंडीच्या दिवसात दही खाल्याने शारीरीक व्याधी होण्याची शक्यता असते. दह्याचा गुणधर्म हा थंड असतो त्यामुळे हिवाळ्यात दही खाल्याने अनेकांना सर्दी खोकला होतो त्यामुळे दही थंडीत खाऊ नये असं आरोग्यतज्ज्ञ सांगतात. असं असलं तरी काही सोप्या ट्रीक्स आहेत ज्या वापरल्याने थंडीत दिवसात तुम्ही दही खाल्लं तरी त्याचा त्रास जास्त प्रमाणात होणार नाही. कोणती आहे ही सोपी ट्रीक जाणून घेऊयात.

दह्याला फोडणी

दह्याचा नैसर्गिक गुणधर्म थंड असला तरी त्यात मसाल्याचे पदार्थ एकत्र केल्याने त्याचा गुणधर्म उष्ण होतो. जर तुम्ही घट्ट असलेलं दही खात असात तर खास थंडीच्या दिवसात दही खाताना त्यात थोडं कोमट पाणी मिक्स करा. त्यामुळे कफ होणार नाही. त्याचबरोबर दह्याला फोडणी देऊन खाणं हा देखील पर्याय आहे. फोडणी दिलेलं दही चवीला जसं छान लागतं तसंच ते आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. त एक चमचा राईचे तेल, जीरे, हींग आणि चवीनुसार लाल तिखटाची याची फोडणी दिलेल्या दह्याचं सेवन खास हिवाळ्याच्या दिवसात गुणकारी आहे. यामुळे गुमधर्म उष्ण होतो. हिवाळ्यात दह्याला किंवा ताकाला फोडणी देऊन खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते.

हिवाळ्यात केस कोरडी आणि निर्जीव होतायेत? मग अशाप्रकारे करा जवसाच्या बियांचा वापर 

दह्यात साखर टाकून खायला अनेकांना आवडतं. मात्र हिवाळ्यात दह्यासोबत साखर खाणं चवदार वाटत असलं तरी शरीरासाठी ते त्रासदायक ठरु शकतं. दही आणि साखर एकत्र खाल्याने सर्दीचा त्रास होऊ शकतो. मात्र काहींना दह्यात साखर टाकल्याशिवाय जमत नाही. जर तुम्हाला गोड दही आवडत असेल तर, साखरेऐवजी गुळाचा वापर करा.गुळ उष्ण असल्याने दह्याची चवही चांगली लागते आणि दह्याचा थंड गुणधर्मही संतुलित राहतो.

ताजे दह्याचे सेवन करा

हिवाळ्यात शक्यतो घरी तयार केलेल्या दह्याचं सेवन करा. हिवाळ्यात ताजे दही खाणे फायदेशीर ठरते. हिवाळ्यात सर्दी-खोकल्यापासून वाचण्यासाठी दह्याला फ्रिजमध्ये ठेवणे टाळा. दही नॉर्मल टेमप्रेचरमध्ये ठेवा यामुळे सर्दी खोकल्याचा त्रास देखील होणार नाही. आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, दही सकाळी किंवा संध्याकाळी खाऊ नये. दही खाण्याची योग्य वेळ दुपारची आहे. हिवाळ्यात दुपाऱच्या वेळी दही खाल्ल्याने कफाचा त्रास होण्याची शक्यता कमी असते.

हिवाळ्यात शरीरातील ऊबदारपणा कायम टिकवून ठेवण्यासाठी सोप्या पद्धतीने घरी बनवा भोपळ्याचे सूप, नोट करा रेसिपी

💡

Frequently Asked Questions

  • Que: हिवाळ्यात दही खाणं योग्य आहे का?

    Ans: आयुर्वेदानुसार दह्याचा गुणधर्म थंड असल्याने हिवाळ्यात दही खाल्ल्याने काही लोकांना सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ शकतो. मात्र काही उपाय पाळल्यास दही खाणं सुरक्षित ठरू शकतं.

  • Que: दही थंडीत खाल्ल्यावर त्रास का होतो?

    Ans: दही शरीरातील कफ वाढवू शकते. थंडीच्या दिवसात शरीरात आधीच कफ वाढण्याची प्रवृत्ती असते, त्यामुळे दही घेतल्यास सर्दी-खोकला वाढू शकतो.

  • Que: दही कधी खावं? योग्य वेळ कोणती?

    Ans: आरोग्यतज्ज्ञांच्या मते दही सकाळी किंवा रात्री खाऊ नये. हिवाळ्यात दही खाण्याची योग्य वेळ दुपारची आहे. या वेळी दही घेतल्यास कफाचा त्रास कमी होतो.

Web Title: Winter health care use this simple trick while eating curd in winter you will never have any problems

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2025 | 11:31 PM

Topics:  

  • Benefits for Curd
  • health care news
  • winter health tips

संबंधित बातम्या

थंडीत नियमित करा १ चमचा मधाचे सेवन! आरोग्यसंबंधित गंभीर आजारांपासून मिळेल कायमची सुटका, शरीर राहील हेल्दी
1

थंडीत नियमित करा १ चमचा मधाचे सेवन! आरोग्यसंबंधित गंभीर आजारांपासून मिळेल कायमची सुटका, शरीर राहील हेल्दी

गारव्यामुळे सतत सर्दी खोकला होतो? मग आजीबाईच्या बटव्यातील ‘हा’ पारंपरिक उपाय ठरेल शरीरासाठी प्रभावी, घशातील खवखव होईल दूर
2

गारव्यामुळे सतत सर्दी खोकला होतो? मग आजीबाईच्या बटव्यातील ‘हा’ पारंपरिक उपाय ठरेल शरीरासाठी प्रभावी, घशातील खवखव होईल दूर

Winter Health Care : नाश्त्याला कोणती फळं खाणं ठरतं फायदेशीर ?
3

Winter Health Care : नाश्त्याला कोणती फळं खाणं ठरतं फायदेशीर ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.