
Recipe : थंडीत सारखे आजारी पडताय? मग आता घरीच बनवा आयुर्वेदिक घटकांनी समृद्ध 'च्यवनप्राश'
थंडीचे दिवस सुरु झाले आहेत. या ऋतूत हवामानात अनेक बदल घडून येतात, ज्यामुळे आपले आरोग्य सतत बिघडू लागते. हिवाळ्यात सर्दी, खोकला, ताप असे आजार फार सामान्य आहेत. यासाठी पुन्हा पुन्हा रुग्णालय गाठायची गरज नाही तर घरीच सोपे उपाय करण्याची आवश्यतकता आहे. लहानपणी आपण सर्वांनी च्यवनप्राश खाल्ला असेल. यात अनेक आयुर्वेदिक घटक आढळून येतात ज्यामुळे याचे सेवन शरीराला बळकट बनवण्यास मदत करतात.
च्यवनप्राश हा आयुर्वेदातील अत्यंत प्रसिद्ध, रोगप्रतिरोधक शक्ती वाढवणारा आणि शरीराला सर्वांगीण पोषण देणारा एक उत्तम उपाय मानला जातो. बाजारातील च्यवनप्राश चविष्ट असला तरी त्यामध्ये साखर आणि जास्त जतन करणारे घटक (preservatives) असू शकतात. त्यामुळे घरी बनवलेला च्यवनप्राश अधिक शुद्ध, नैसर्गिक आणि आरोग्यासाठी उपयुक्त ठरतो. आवळा या सुपरफूडमुळे शरीराला व्हिटॅमिन C, मिनरल्स आणि अँटिऑक्सिडंट्सची उत्तम मात्रा मिळते. चला तर मग घरच्या घरी पारंपरिक पद्धतीने पौष्टिक च्यवनप्राश कसा बनवायचा ते जाणून घेऊया. यासाठी लागणारे साहित्य आणि कृती नोट करून घ्या.
साहित्य
वापरण्याची पद्धत
दररोज सकाळी आणि रात्री 1–2 चमचे च्यवनप्राश दूध किंवा कोमट पाण्यासह घेतल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि ऊर्जा टिकून राहते. घरी बनवलेला हा च्यवनप्राश स्वादिष्ट, पौष्टिक आणि पूर्णपणे नैसर्गिक आहे. यातील आयुर्वेदिक घटक शरीराला बळकट बनवण्यास मदत करतात.