Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aniruddhacharya: ‘मला मूलच नाही म्हणून माझा नवरा…’, अनिरुद्धाचार्य महाराजांसमोर व्यक्त झाली महिला, समजावली महत्त्वाची बाब

Aniruddhacharya: नुकतीच एक महिला आपलं दुःख घेऊन अनिरुद्धाचार्य महाराजांजवळ पोहचली. मूल नसल्याने नवरा दुःखी असून टोमणे मारत असल्याचे सांगितलं. यावर अनिरुद्ध महाराजांनी मोठी गोष्ट समजावली

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 30, 2026 | 01:22 PM
मूल न झाल्याने नवऱ्याचा जाच (फोटो सौजन्य - Instagram/iStock)

मूल न झाल्याने नवऱ्याचा जाच (फोटो सौजन्य - Instagram/iStock)

Follow Us
Follow Us:
  • महिलेला मूल नसण्याचे दुःख
  • नवऱ्याकडून टोमणे मारण्याची खंत केली व्यक्त
  • अनिरुद्ध महाराजांनी सांगितली मोठी गोष्ट 
Aniruddhacharya: अनेक जोडप्यांना लग्नानंतर मूल नको असतं तर काही जणांना मूल होतच नाही. पण या दुःखात एखाद्या स्त्री ला आपल्या नवऱ्याची सोबत मिळण्याऐवजी सतत टोमणे ऐकावे लागत असतील आणि सतत सहन करावं लागत असेल तर यापेक्षा वाईट काहीच नाही. अशीच काहीशी परिस्थिती एका महिलेची असून तिने हे दुःख अनिरूद्धाचार्य महाराजांकडे व्यक्त केले आहे. त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर ते अशा परिस्थितीवर लोकांना सल्ला देताना दिसतात. 

या स्त्री ने आपलं दुःख व्यक्त केलं आणि आपला नवराही या गोष्टीमुळे खूपच दुःखी असल्याचे सांगितलं. या महिलेचे दुःख ऐकून घेतल्यानंतर अनिरूद्ध महाराजांनी जे उत्तर दिलं आणि तिच्या नवऱ्याला जो सल्ला दिला तो सर्वांनी समजून घ्यायला हवा. कुटुंब म्हणजे नक्की काय आणि कसं सांभाळायचं यासाठी हे उत्तर नक्कीच डोळे उघडणारं आहे. 

‘मूल होत नाही कमतरता तर स्त्री मध्येच…’, टेस्ट केल्यानंतर सत्य समोर, आजही बाळ होण्यासाठी द्यावी लागते महिलांना परीक्षा

नक्की काय घडले?

अनिरुद्ध महाराजांच्या सभेला एक दुःखी महिला पोहचली होती आणि तिने आपलं दुःख सर्वांसमोर व्यक्त केलं. ‘मला मूल नाही आणि यामुळे माझा नवराही माझ्यावर सतत चिडलेला असतो आणि मला टोमणे मारतो’ यावर अनिरुद्ध महाराजांनी उत्तर दिलं, ‘मी आहे तुझा मुलगा’, यावर महिलेने म्हटलं की, तिला कळतंय पण तरीही ती दुःखी आहे. तिने सांगितलं की, ‘२०२१ मध्ये मी IVF करून घेतलं आणि त्यावेळी मी गरोदरदेखील होते. पण त्यावेळी कोविडचा खराब काळ चालू होता आणि तिच्या बाळाचं यामध्ये निधन झालं. कमतरता तर माझ्यातच आहे. आता तर माझा मेनोपॉज चालू झाला आहे’

काय म्हणाले अनिरुद्ध महाराज

महिलने पुढे म्हटलं की, ‘महाराज तुम्ही मला समजावले होते की, ज्यांना मूल नसते, त्यांच्यासाठी देव काहीतरी चांगलंच करत असतो. जसं मीराबाईला मूल नव्हतं. मी तुम्ही सांगितलेल्या गोष्टी समजून घेऊ शकते पण माझा नवरा मात्र नाही समजून घेत. या कारणामुळे माझ्यापासून दूर राहतो.’ हे ऐकून अनिरुद्ध महाराजांनी सांगितलं की, ‘नवऱ्याला घेऊन ये, मी त्याला समजावून सांगेन’

ही परिस्थिती पाहिली तर हे समजून येतं की, मूल न झाल्यामुळे वा गरोदर न राहिल्यामुळे अनेक जोड्यांमध्ये ताणतणाव आणि भांडणं असल्याचे दिसून येते. अनेकदा या स्थितीत पती-पत्नी एकमेकांना दूषणं देतात. यामुळे नात्यात खूपच दुरावा येऊ लागतो. अशा परिस्थितीत एकमेकांना समजून घेणं खूपच महत्त्वाचं आहे आणि कठीण काळात एकमेकांना साथ देण्याची गरज आहे. मूल होणं न होणं हे नक्कीच आपल्या हातात नाही. पण एकमेकांना समजून साथ देणं हे मात्र आपल्या हातात आहे. मूल होणं हेच जीवनाचं सार्थक नाही तर नातं टिकवून ठेवणं महत्त्वाचं आहे. 

लग्नानंतरही मूल होत नाही का? 100 पैकी 10 जण ‘या’ आजाराने ग्रस्त, ही लक्षणे दिसताच वेळीच सावध व्हा!

Web Title: Woman shares her pain of not having child to annirudhhacharya maharaj offered advice dn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 01:22 PM

Topics:  

  • Family
  • lifestyle news

संबंधित बातम्या

Relationship Tips: लग्नाच्या १०-१५ वर्षानंतरही नात्यात ठेवायचा असेल रोमान्स तर, ‘या’ सवयी हव्यातच!
1

Relationship Tips: लग्नाच्या १०-१५ वर्षानंतरही नात्यात ठेवायचा असेल रोमान्स तर, ‘या’ सवयी हव्यातच!

Upasana Kamineni Konidela: दुसऱ्या महिलांना खाली खेचणाऱ्यांनो, सावधान! उपासना कामिनेनींचा इशारा
2

Upasana Kamineni Konidela: दुसऱ्या महिलांना खाली खेचणाऱ्यांनो, सावधान! उपासना कामिनेनींचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.