Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वर्षांपासून कष्ट सुरुये, पण ग्रोथ नाहीये! तरी थांबू नकोस… आता धीर खचलाय? मग ‘हे’ नक्की वाच

कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न, संयम आणि स्वतःवरचा विश्वास अत्यंत महत्त्वाचा असतो. इतरांशी तुलना करण्याऐवजी कालच्या स्वतःपेक्षा आज अधिक चांगले बनण्याचा प्रयत्न हीच खरी प्रगती आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 12, 2026 | 12:40 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • म्हणतात, “प्रयत्नार्थी परमेश्वर.” कोणतेही क्षेत्र असो, यशाचा पाया हा सातत्यपूर्ण प्रयत्नांवरच उभा असतो.
  • अनेक मोठे क्रिएटर्सही वर्षानुवर्षे संघर्ष केल्यानंतरच लोकांच्या नजरेत आले आहेत.
  • यश एका रात्रीत मिळत नाही; ते रोजच्या छोट्या-छोट्या प्रयत्नांतून घडत असते.
आजच्या सोशल मीडियाच्या युगात प्रत्येकालाच पटकन यश मिळावे असे वाटते. एखादा व्हिडिओ व्हायरल व्हावा, लाखो फॉलोअर्स मिळावेत किंवा काही महिन्यांतच मोठी ओळख निर्माण व्हावी, अशी अपेक्षा अनेकजण ठेवतात. मात्र, प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. काहींना यश लवकर मिळते, तर काहींना त्यासाठी वर्षानुवर्षे सातत्याने मेहनत घ्यावी लागते. म्हणतात, “प्रयत्नार्थी परमेश्वर.” कोणतेही क्षेत्र असो, यशाचा पाया हा सातत्यपूर्ण प्रयत्नांवरच उभा असतो. आयुष्य ही एक शर्यत आहे, पण या शर्यतीत तुमचा खरा प्रतिस्पर्धी दुसरा कोणी नसून तुम्ही स्वतः आहात. इतर लोक किती पुढे गेले, याचा विचार करत बसण्यापेक्षा तुम्ही कालपेक्षा आज किती सुधारला आहात, याकडे लक्ष द्या. हीच खरी प्रगती आहे.

महिलांनो… ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेचा रिमेक आला! Anmol TV वर सारखीच मालिका नव्या ढंगात

यशाचा मार्ग नेहमीच सरळ नसतो. अपयश, टीका, निराशा आणि अडचणी या प्रत्येकाच्या वाट्याला येतात. अशा वेळी खचून जाण्यापेक्षा स्वतःला सावरणे महत्त्वाचे असते. सकारात्मक विचार, योग्य सवयी आणि सातत्यपूर्ण प्रयत्न तुमची मानसिक ताकद वाढवतात. एखाद्या अपयशामुळे तुमच्या करिअरवर किंवा स्वप्नांवर विराम लागू देऊ नका. कारण उत्तम करिअर आणि मेहनतीने मिळवलेले यशच अनेक दुःख आणि संघर्षांवर उत्तर ठरते. उदाहरणार्थ, तुम्ही एखादे इन्स्टाग्राम पेज सुरू केले. तीन-चार वर्षे सातत्याने पोस्ट केल्या, नवनवीन कल्पना राबवल्या, वेळ दिला; तरीही अपेक्षित ग्रोथ मिळत नसेल. अशावेळी अनेकजण पेज बंद करतात किंवा प्रयत्न सोडून देतात. पण लक्षात ठेवा, सोशल मीडियावर यश मिळण्याचा कोणताही निश्चित फॉर्म्युला नाही. अनेक मोठे क्रिएटर्सही वर्षानुवर्षे संघर्ष केल्यानंतरच लोकांच्या नजरेत आले आहेत.

म्हणून परिणामांची सतत चिंता करण्यापेक्षा तुमच्या कामाच्या गुणवत्तेवर आणि सातत्यावर भर द्या. प्रत्येक पोस्ट तुम्हाला काहीतरी नवीन शिकवते. प्रत्येक चूक तुम्हाला अधिक सक्षम बनवते. कदाचित आज तुमच्या मेहनतीची दखल घेतली जात नसेल, पण उद्या हाच सातत्यपूर्ण प्रवास तुमच्या यशाचे कारण ठरू शकतो. स्वतःवर विश्वास ठेवा. इतरांशी तुलना करण्याऐवजी स्वतःला दररोज अधिक चांगले बनवण्याचा प्रयत्न करा. कारण यश एका रात्रीत मिळत नाही; ते रोजच्या छोट्या-छोट्या प्रयत्नांतून घडत असते.

Dhamaal 4 Box Office Collection Day 2: ‘धमाल 4’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड! दुसऱ्याच दिवशी अजय देवगणच्या चित्रपटाची तुफान कमाई

लक्षात ठेव : थांबणारे अनेक असतात, पण शेवटपर्यंत टिकून राहणाऱ्यांचीच वेळ एक दिवस नक्की येते. त्यामुळे प्रयत्न करत रहा, शिकत रहा आणि पुढे चालत रहा. तुमचीही वेळ नक्की येईल.

Web Title: Working hard for many years but not succeed yet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 12:40 PM

Topics:  

  • love affairs
  • office

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.