Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Business Success Story : 15 रुपयांच्या चहाने बदललं 3 मित्रांचं नशीब… नोकरीचा नाद सोडून उभी केली 100 कोटींचा बिझनेस

Business Success Story : कष्टाची तयारी आणि व्यवसायात काहीतरी नवीन करण्याची जिद्द असेल, तर अगदी लहान संकल्पनेतूनही मोठे साम्राज्य उभे करता येते हे तीन भावांनी सिद्ध करून दाखवले आहे. अवघ्या १५ रुपयांच्या चहाच्या कपपासून सुरू झालेल्या या व्यवसायाचे रूपांतर आज १०० कोटींपेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्या ब्रँडमध्ये झाले आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 06, 2026 | 06:26 PM
नोकरीचा नाद सोडून उभी केली 100 कोटींचा बिझनेस( सौजन्य - Chatgpt )

नोकरीचा नाद सोडून उभी केली 100 कोटींचा बिझनेस( सौजन्य - Chatgpt )

Follow Us
Follow Us:
  • 15 रुपयांच्या चहाने बदललं 3 मित्रांचं नशीब…
  • नोकरीचा नाद सोडून उभी केली 100 कोटींचा बिझनेस
  • कुलहड चहा बनली ओळख
Business Success Story : जिद्द, चिकाटी आणि विश्वास असेल तर सारं जग जिंकता येतं. असंच काहीसं उदाहरण यामधून दिसून येतं. शिक्षण झालं की नोकरीच्या मागे धावणारे आपण आयुष्यभर दुसऱ्यासाठी झटत बसतो. पण हाच मार्ग बदलून स्वतःचं काहीतरी करायचा विचार आपलं जग बदलून टाकतं. मैत्रीतून भावाच्या नात्याने जवळे आलेल्या याच भावंडांनी हेच करुन दाखवलं. भारतात चहा हा आपल्या आयुष्याचा एक भाग आहे. या सामान्य चहाला एका व्यावसायिक कल्पनेत बदलून, इंदूरच्या तीन मित्रांनी एक असा व्यवसाय उभा केला. ज्याची आज जगभरात ६५० हून अधिक दुकाने आहेत. कुठून सुरवात झाली आणि कसा उभा राहिला एवढा मोठा कारोभार ? जाणून घेऊयात. ( Business Success Story ) 

भारतीय अर्थव्यवस्था World Bank चा विश्वास; नवा अहवाल केला जाहीर, GDP वाढीचा अंदाज थेट 7.1 टक्क्यांवर

सोडून दिलेली नागरी सेवा परीक्षेची तयारी

ही कथा अनुभव दुबे आणि आनंद नायक यांच्यापासून सुरू होते. हे दोघे मित्र नागरी सेवा परीक्षेची तयारी करत असतात. नंतर,त्यांना नोकरीची तयारी करण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना सुचते. त्यानंतर या विचारातून ते राहुल पाटीदारसोबत सामील होतात. या तिघांनी २०१६ मध्ये इंदूरमध्ये त्यांचे पहिले ‘चाय सुट्टा बार’ आउटलेट सुरू केले. व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांनी अंदाजे ३ लाख रुपयांची गुंतवणूक केली.

प्रवासाची सुरुवात कशी झाली

चहाचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी, हे तिघे मित्र जुने मोबाईल फोन विकायचे. नंतर, त्यांनी एकत्र मिळून असा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला, ज्याचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करता येईल. त्यांनी चहाला त्यांच्या व्यवसायाचा पाया बनवलं. परवडणाऱ्या किमतीत चहा आणि खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले तर लोक आपल्याकडे येतील या ध्येयावर त्यांनी काम सुरु केलं. त्यांनी आपल्या ब्रँडमध्ये भारतीय संस्कृतीचा स्पर्श देण्याचाही प्रयत्न केला.

कुलहड चहा बनली ओळख

चाय सुट्टा बारची सुरुवातीची ओळख कुलहड चहावरून घेतली गेली. पारंपरिक मातीच्या कुलहडांमध्ये चहा देण्याच्या कल्पनेने ग्राहकांना आकर्षित केले. नंतर, मेन्यूमध्ये तुळस, आले, चॉकलेट आणि केशर यांसारख्या विविध प्रकारच्या चहांचा समावेश करण्यात आला. चहा व्यतिरिक्त, या आउटलेट्समध्ये पास्ता, बर्गर आणि नूडल्स यांसारखे खाद्यपदार्थ देखील त्यांना उपलब्ध करुन दिले.

नावात ‘सुट्टा’ असूनही, कॅफेमध्ये धूम्रपानास मनाई

ब्रँडच्या नावात ‘सुट्टा’ हा शब्द असला तरी, त्यांच्या कॅफेमध्ये धूम्रपानास परवानगी दिली नाही. कंपनीने आपली आउटलेट्स खाण्यापिण्याची आणि मित्रांसोबत वेळ घालवण्याची जागा म्हणून वाढवली आणि हाच वेगळेपणा सगळ्यांना आवडला.

१५ रुपयांच्या चहावर व्यवसाय उभा

या ब्रँडने सुरुवातीपासूनच परवडणाऱ्या किमतींवर लक्ष केंद्रित केले. एका कप चहाची किंमत सुमारे १५ रुपये होती, तर कॉफीची किंमत २० रुपयांपासून सुरू होती. कोल्ड कॉफी आणि शेक्सची किंमत ७० रुपये किंवा त्याहून अधिक होती. किंमती लोकांच्या खिशाला परवडतील अशा ठेवल्या. कमी किमती आणि मोठ्या प्रमाणावर विस्तार साधण्यासाठी, कंपनीने फ्रँचायझी मॉडेलवर फोकस केला.

व्यवसायाचा विस्तार इंदूरपासून परदेशात

२०१६ मध्ये इंदूरमध्ये सुरू झालेल्या या ब्रँडची आता ६५० हून अधिक आउटलेट्स आहेत. कंपनीने भारताबाहेर कॅनडामध्ये प्रवेश करून विस्तार केला आहे आणि नेपाळ व संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्येही त्यांची आउटलेट्स आहेत. तीन मित्रांची ही व्यवसाय कल्पना आता एका मोठ्या फ्रँचायझी नेटवर्कमध्ये बहरली आहे. सुमारे ३ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या गुंतवणुकीने सुरू झालेला ‘चाय सुट्टा बार’ आता ६५० हून अधिक आउटलेट्स आणि सुमारे १०० कोटी रुपयांचा महसूल असलेला एक ब्रँड बनला आहे.

Finfluencers ची आता खैर नाही… SEBI ॲक्शन मोडवर! Share Market बाबत चुकीच्या टिप्स देणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई

Web Title: Tea startup success story 650 outlets and 100 crore business details ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 06:26 PM

Topics:  

  • Business News
  • success tips

संबंधित बातम्या

Swiggy Financial Services : अन्न उद्योजकांसाठी सुवर्णसंधी! Swiggy Instamart कडून ₹5 कोटींपर्यंत कर्ज; NOICE ब्रँडचा मेगाप्लॅन
1

Swiggy Financial Services : अन्न उद्योजकांसाठी सुवर्णसंधी! Swiggy Instamart कडून ₹5 कोटींपर्यंत कर्ज; NOICE ब्रँडचा मेगाप्लॅन

Lilavati Hospital चा मोठा उपक्रम! श्रवणदोष असलेल्या मुलांसाठी ‘ऑडिटरी व्हर्बल थेरपी’ क्लिनिक सुरू
2

Lilavati Hospital चा मोठा उपक्रम! श्रवणदोष असलेल्या मुलांसाठी ‘ऑडिटरी व्हर्बल थेरपी’ क्लिनिक सुरू

Fintech Industry : केवळ कर्ज देणे पुरेसे नाही, जबाबदार सवयी महत्त्वाच्या! फिनटेक क्षेत्राच्या भविष्याबाबत तज्ज्ञांचा मोठा दावा
3

Fintech Industry : केवळ कर्ज देणे पुरेसे नाही, जबाबदार सवयी महत्त्वाच्या! फिनटेक क्षेत्राच्या भविष्याबाबत तज्ज्ञांचा मोठा दावा

Life Lessons: आयुष्याचा खरा अर्थ काय? स्वतःला हे प्रश्न विचाराल, तर जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल
4

Life Lessons: आयुष्याचा खरा अर्थ काय? स्वतःला हे प्रश्न विचाराल, तर जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.