Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Workout Rule: रिकाम्या पोटी वर्कआऊट करणं योग्य की अयोग्य?

Workout Rule: व्यायाम हा दैनंदिन जीवनाचा भाग आहे. पण अनेकांना रिकाम्या पोटी वर्कआऊट करणं योग्य वाटतं. पण प्रश्न असा आहे की, हे योग्य आहे की अयोग्य? काय सांगतात तज्ज्ञ?

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 07, 2026 | 12:30 PM
व्यायाम करण्यापूर्वी काय लक्षात ठेवाल (फोटो सौजन्य - iStock)

व्यायाम करण्यापूर्वी काय लक्षात ठेवाल (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • तुम्ही सकाळी वर्कआऊट कशा पद्धतीने करता 
  • रिकाम्या पोटी वर्कआऊट करणं योग्य की अयोग्य 
  • काय सांगतात तज्ज्ञ 
आजकाल, Fit राहण्यासाठी नियमित व्यायाम हा अनेक लोकांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनलाय. काही लोक झोपून उठल्यावर लगेच व्यायाम करणे पसंत करतात, तर काही जण व्यायामापूर्वी हलका आहार घेणे आवश्यक मानतात. यामुळे अनेकदा व्यायाम करण्याची योग्य पद्धत कोणती, हा प्रश्न उपस्थित होतो. पण तुम्हाला माहीत आहे का? याचं उत्तर प्रत्येक व्यक्तीसाठी सारखे असू शकत नाही. आज आपण रिकाम्या पोटी व्यायाम करण्याची योग्यता, त्याचे संभाव्य दुष्परिणाम आणि व्यायाम करण्यापूर्वी कोणती खबरदारी घ्यावी, याबद्दल जाणून घेऊया. काय आहे Workout Rule?

मेंदूची ताकद वाढवण्यासाठी नियमित करा ‘हे’ व्यायाम प्रकार! शरीरासह मन राहील कायम आनंदी आणि फ्रेश

काय सांगतो अभ्यास 

अमेरिकन कॉलेज ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रत्येक माणसासाठी हे वेगळे आहे, कारण ते त्यांच्या आरोग्याच्या स्थितीवर, फिटनेसच्या ध्येयांवर आणि करत असलेल्या व्यायामाच्या प्रकारावर अवलंबून असते. म्हणूनच व्यायामापूर्वीच्या आहाराबद्दल आपल्याला अनेकदा वेगवेगळी मतं ऐकायला मिळतात. शिवाय, प्रत्येक व्यक्तीच्या गरजा वेगवेगळ्या असतात, त्यामुळे एकच नियम सर्वांना लागू करता येत नाही.  दीर्घकाळ चालणाऱ्या किंवा तीव्र व्यायामापूर्वी शरीराला पुरेशा ऊर्जेची आवश्यकता असू शकते. काही लोक काहीही न खाता हलका शारीरिक व्यायाम करू शकतात.

योग्य पोषण महत्त्वाचं 

ACSM नुसार, व्यायामाइतकेच योग्य पोषणही महत्त्वाचे आहे. त्यामुळे, व्यायामाचे नियोजन करताना आहारासंबंधी बाबींचा विचार केला पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीला मधुमेह, रक्तातील साखरेची कमी पातळी किंवा इतर आरोग्य समस्या असतील, तर व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणे उत्तम ठरते 

रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने काही लोकांना ऊर्जेची कमतरता जाणवू शकते. यामुळे थकवा, अशक्तपणा, चक्कर येणे, कार्यक्षमतेत घट किंवा लक्ष केंद्रित करण्यात अडचण यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. काही लोकांना हेव्ही व्यायामादरम्यान रक्तातील साखरेची पातळी कमी होण्याचा अनुभव येऊ शकतो, पण हे प्रत्येकाच्या बाबतीत खरे असेलच असे नाही. व्यायामादरम्यान तुम्हाला अस्वस्थ वाटल्यास, ताबडतोब थांबा आणि आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Weight Loss Tips: व्यायाम करुनही वजन कमी होत नाहीये? मग ‘या’ सामान्य चुका टाळा

व्यायामापूर्वी लक्षात ठेवायच्या गोष्टी 

व्यायामापूर्वी आवश्यकतेनुसार केळी, ओट्स, दही, फळे किंवा संपूर्ण धान्याचे पदार्थ यांसारखे हलके आणि सहज पचणारे जेवण किंवा नाश्ता घेतला जाऊ शकतो. शरीरातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी भरपूर पाणी पिणे देखील आवश्यक आहे. याशिवाय जड जेवणानंतर लगेच व्यायाम करणे टाळा. जर तुम्ही पहिल्यांदाच नवीन फिटनेस दिनचर्या सुरू करत असाल किंवा तुम्हाला काही वैद्यकीय समस्या असेल, तर आधी डॉक्टर किंवा फिटनेस तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि मगच व्यायाम करा 

Web Title: Workout rule is working out on an empty stomach right or wrong

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 12:29 PM

Topics:  

  • exercises
  • Health Tips
  • lifestyle news in marathi

संबंधित बातम्या

World Bamboo Day: जागतिक बांबू दिन का साजरा केला जातो? कधी झाली होती सुरूवात, मनोरंजक तथ्य
1

World Bamboo Day: जागतिक बांबू दिन का साजरा केला जातो? कधी झाली होती सुरूवात, मनोरंजक तथ्य

International Equal Pay Day: पुरुषांपेक्षा अधिक मेहनत, पण तरीही महिलांना वेतन कमी; कधी कमी होणार अंतर
2

International Equal Pay Day: पुरुषांपेक्षा अधिक मेहनत, पण तरीही महिलांना वेतन कमी; कधी कमी होणार अंतर

Health Tips: Brown Rice की Quinoa, फायबरसाठी काय आहे उत्तम?
3

Health Tips: Brown Rice की Quinoa, फायबरसाठी काय आहे उत्तम?

HIV: काय आहे अँटीरिट्रोव्हायरल थेरपी? HIV सह अधिक काळ जगताना वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज
4

HIV: काय आहे अँटीरिट्रोव्हायरल थेरपी? HIV सह अधिक काळ जगताना वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.