मेंदूची ताकद वाढवण्यासाठी नियमित करा 'हे' व्यायाम प्रकार
धावपळीचे जीवन जगताना सगळ्यांचं अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ज्यामुळे काहीवेळा शारीरिक आणि मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडल्यानंतर ते सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. याशिवाय दैनंदिन आहारात झालेले छोटे मोठे बदल, अपुरी झोप, कामाचा तणाव इत्यादी अनेक गोष्टींचा कळतनकळत परिणाम आरोग्यावर दिसून येतो. त्यामुळे निरोगी आरोग्य जगण्यासाठी शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य चांगले असणे आवश्यक आहे. शरीरात वाढलेला तणाव मेंदूची शक्ती कमी करून टाकतो. तसेच मेंदूवर अनेक नकारात्मक परिणाम दिसून येतात. त्यामुळे मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित व्यायाम, ध्यान करणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – iStock)
दंड-मांडीचे स्नायू थरथरतात? सतत डोळा फडफडतो? जाणून घ्या यामागे नेमकी काय आहेत कारणं
मेंदूचे कार्य निरोगी ठेवण्यासाठी नियमित एक्सरसाईज, जिम, चालणे, धावणे, आवडीचे छंद जोपासणे इत्यादी गोष्टी केल्यास मेंदूचे कार्य चांगले राहील. यामुळे स्ट्रेस, मूड स्वींग, डिप्रेशन, चिंता, एडीएचडीसारख्या मानसिक समस्यांपासून सुटका मिळेल. यासोबत जिम, ध्यान, प्राणायाम इत्यादी गोष्टी नियमित केल्यास झोपेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. त्यामुळे नियमित प्राणायाम, व्यायाम, ध्यान, चालणे इत्यादी व्यायाम प्रकारे करणे आवश्यक आहे.
मानसिक तणाव वाढल्यानंतर सतत घरात बसून राहिल्यामुळे तणाव किंवा स्ट्रेस आणखीनच वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे घरात बसून न राहता नियमित धावणे, सायकल चालवणे, ध्यान करणे, स्वीमिंग यांसारख्या शारीरिक हालचाली करणे आवश्यक आहे. यामुळे यामुळे मेंदूमधील एंडॉर्फिन आणि सेराटोनिन सारखे हॅप्पी हार्मोन्स रिलीज होतात आणि तणाव कमी होतो. यामुळे मानसिक आरोग्य निरोगी राहते. मनाला शांत ठेवण्यासाठी नियमित ध्यान किंवा इतर शारीरिक हालचाली करणे आवश्यक आहे.
तणाव आणि इतर कारणांमुळे कमी झालेली मेंदूची क्षमता सुधारण्यासाठी नियमित शारीरिक दृष्टी सक्रिय असणे आवश्यक आहे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. मेंदूची क्षमता वाढवण्यासाठी स्वीमिंग करणे आवश्यक आहे. यामुळे ताणतणाव कमी होतो.
अनेकदा शारीरिक आणि मानसिक तणावामुळे मूड सतत खराब होतो. मूड बदलत राहिल्यामुळे कोणतेही काम करण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे मूड सुधारण्यासाठी नियमित १० मिनिटं ध्यान करावे. ध्यान केल्यामुळे मन शांत होऊन मनाला प्रसन्न वाटू लागते. नियमित व्यायाम केल्यामुळे मेंदूमधील डोपामाइन, सेराटोनिन आणि नॉरएपिनफ्रिन सारखे न्यूरोट्रान्समीटरची लेव्हल वाढते. ज्यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहते.