दम्याविषयी असलेल्या गैरसमजूती
जगभरात वेगवेगळ्या आजारांनी अनेक ग्रस्त आहेत. आरोग्यासंबंधित कोणत्याही गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर संपूर्ण शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे धावपळीचे जीवन जगताना चुकीच्या सवयी फॉलो न करता निरोगी सवयी अंगीकारणे आवश्यक आहे. वाढते प्रदूषण आणि जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर दिसून आल्यानंतर दम्यासारख्या गंभीर आजाराची लागण होण्याची शक्यता असते. दमा हा आजार फुफ्फुसांशीसंबंधित आहे. दमा झाल्यानंतर फुफ्फुसांचे नुकसान होऊन जाते. दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिन म्हणून पाळला जातो. सध्या जगभरात दम्याचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. जागतिक दमा दिन हा संपूर्ण जगात दम्याबाबत जनजागृती करण्यासाठी, लोकांमध्ये या आजाराच्या उपचारांविषयी माहिती पोहोचवण्यासाठी, आणि दमा झालेल्या व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन आयुष्यात दम्याचा परिणाम कमी करण्यास मदत करण्यासाठी साजरा केला जातो. यावर डॉ शाहिद पटेल, फुफ्फुसविकार तज्ज्ञ, मेडिकवर हॉस्पिटल्स, खारघर, नवी मुंबई तज्ज्ञांनी सविस्तर माहिती सांगितली आहे.(फोटो सौजन्य – iStock)
World Asthma Day : पुण्यात दम्याच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ; आकडेवारीही आली समोर
वास्तविकता: दमा बहुतेकदा बालपणात सुरू होतो, परंतु तो कोणत्याही वयात विकसित होऊ शकतो. प्रौढांमध्ये होणारा दमा हा सामान्यपणे आढळून येतो आणि त्यासाठी विशेष खबरदारी नियमित फॅालोअपची आवश्यकता आहे.
वास्तविकता: इनहेलर आणि इतर दम्याची औषधं ही व्यसन निर्माण करणारी नसतात. लक्षणे नियंत्रित करण्यासाठी आणि गुंतागुंत रोखण्यासाठी त्यांचा वापर करणे आवश्यक आहे. भीतीपोटी त्यांना टाळल्याने गंभीर गुंतागुंत होऊ शकते.
वास्तविकता: योग्य व्यवस्थापनाने, दमा असलेल्या व्यक्ती देखील सक्रिय जीवनशैलीचे पालन करु शकतात आणि खेळांमध्येही उत्कृष्ट कामगिरी बजावू शकतात. खरं तर, नियमित व्यायामामुळे फुफ्फुसांचे कार्य आणि एकूणच आरोग्य सुधारते.
वास्तविकता : इनहेलर थेट फुफ्फुसांमध्ये औषधं पोहोचविण्याचे काम करतात, दुष्परिणाम कमी करतात आणि सूज कमी करतात, ज्यामुळे फुफ्फुसांचे संरक्षण केले जाते.
वास्तविकता : दमा हा एक जुनाट आजार आहे. योग्य व्यवस्थापनाने लक्षणं कमी होऊ शकतात, परंतु लक्षणांचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि फुफ्फुसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
वास्तविकता : इनहेलरचा दररोज वापर हा दमा नियंत्रित करण्यासाठी महत्त्वाचे ठरते. लक्षणं अधिक तीव्र होऊ नये याकरिता इनहेलरची मदत होते तसेच त्यामुळे भविष्यातील गुंतागुंत टाळता येते.
अणुबॉम्बचे शरीरावर होतात गंभीर परिणाम, तात्काळ आणि दीर्घकालीन दोन्हीचा खोलवर त्रास
वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधांचे सेवन थांबविल्याने लक्षणे अचानक बिघडू शकतात किंवा त्यांची तीव्रता वाढु शकते. उपचारांमध्ये बदल करण्यापूर्वी नेहमी पल्मोनोलॉजिस्टचा सल्ला घ्यावा. दमा हा एखाद्या व्यक्तीमधील कमकुवतपणा नाही तसेच ती काही लाजिरवाणी बाब नाही. मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये आम्ही अशा रुग्णांवर यशस्वी उपचार करुन त्यांची पुरेपुर काळजी घेण्याचा प्रयत्न करतो.या जागतिक दमा दिनानिमित्त, दम्याविषयी असलेल्या गैरसमजूती आणि भीतीला अचुन ज्ञानाने दूर करण्याचा संकल्प करूया. जर तुम्हाला किंवा तुमच्या प्रियजनांना दम्याची लक्षणे दिसून आली, जसे की घरघर, श्वास घेण्यास त्रास होणे, खोकला येणे किंवा छातीत जडपणा तर विलंब न करता त्वरित तज्ञांचा सल्ला घ्या. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसह, दम्याचे प्रभावीपणे व्यवस्थापन केले जाऊ शकते.