Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World COPD Day: फुफ्फुसाचा हा गंभीर आजार कान, घसा, नाक करेल निकामी, काय आहेत लक्षणं

World COPD Day 2024: क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) हा एक गंभीर फुफ्फुसाचा आजार आहे जो जगभरातील लाखो लोकांना प्रभावित करतो. भारतात या आजाराची 5.5 कोटी प्रकरणे नोंदवली गेली आहेत

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 20, 2024 | 10:49 AM
सीओपीडी नक्की आजार काय आहे

सीओपीडी नक्की आजार काय आहे

Follow Us
Close
Follow Us:

क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) हा एक गंभीर फुफ्फुसाचा आजार आहे जो जगभरातील लाखो लोकांमध्ये सध्या दिसून येत आहे. भारतात या आजाराची 5.5 कोटी प्रकरणे सध्या नोंदविण्यात आली आहेत. ज्यामुळे ते देशातील मृत्यू आणि अपंगत्वाचे प्रमुख कारण बनले आहे. सीओपीडीचे मुख्य कारण म्हणजे हानिकारक पदार्थांचा दीर्घकाळ संपर्क जसे की तंबाखूचा धूर, वायू प्रदूषण आणि औद्योगिक धूळ. याचा सर्वाधिक प्रभाव असल्यामुळेच हा आजार होतो. 

पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल मुंबई येथील एमएस ईएनटी डॉ. अर्पित शर्मा म्हणतात की या आजाराच्या सामान्य लक्षणांमध्ये श्वास घेण्यात अडचण, खोकला आणि थकवा यांचा समावेश होतो. पण ते केवळ फुफ्फुसापुरते मर्यादित नाही. COPD चा कान, नाक आणि घसा (ENT) वर देखील परिणाम होतो, ज्याची फारच कमी प्रमाणात चर्चा होते, त्यामुळे अनेकांना या आजाराबाबत माहीतही नाही. याची जटिलता अर्थात गंभीरता रोगाच्या व्यापक परिणामांवर प्रकाश टाकते (फोटो सौजन्य – iStock) 

COPD ची लक्षणे 

COPD ची लक्षणे नक्की काय आहेत

  • श्रवणशक्ती कमी होणे: फुफ्फुसाच्या खराब कार्यामुळे ऑक्सिजनची कमतरता होते, ज्यामुळे आतील कानावर (कॉक्लीया) परिणाम होतो. यामुळे हळूहळू ऐकण्याची क्षमता खराब होऊ शकते
  • टिनिटस आणि समतोल समस्या: ऑक्सिजनच्या पुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्यामुळे, कानात वाजणे आणि चक्कर येणे होऊ शकते
  • वारंवार कानात संक्रमण: श्लेष्मा जमा होणे आणि नाक बंद होणे यामुळे मधल्या कानाचे संक्रमण होऊ शकते
  • सायनस समस्या: सीओपीडीशी संबंधित जळजळ नाक आणि सायनसवर परिणाम करू शकते, ज्यामुळे क्रॉनिक सायनुसायटिस आणि नाक बंद होते
  • आवाजात बदल: सतत खोकला आणि घसा जळजळ झाल्यामुळे आवाज जड किंवा थकवा जाणवू शकतो
Chronic Stress मुळे तरुण वयातच होतात हृदयासंबंधित समस्या, स्वतःचा बचाव करण्यासाठी ‘हे’ काम करा

काय उपाय करावे

कोणते उपाय करावेत

  • नियमित तपासणी: वेळोवेळी ईएनटी तज्ञ आणि पल्मोनोलॉजिस्टकडे तपासा
  • जीवनशैलीत बदल: धुम्रपान टाळा आणि वायू प्रदूषण टाळण्याचा प्रयत्न करा
  • योग्य औषधे: COPD आणि ENT लक्षणे कमी करण्यासाठी योग्य औषधे वापरा
  • हायड्रेशन आणि आर्द्रता: पुरेसे पाणी प्या आणि आपला घसा आणि नाक ओलावा ठेवण्यासाठी ह्युमिडिफायर वापरा
जागरूकता होणे आवश्यक 

सीओपीडीच्या वाढत्या केसेस आणि त्याच्या ईएनटी परिणामांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. वेळेवर निदान आणि प्रतिबंधात्मक प्रयत्नांद्वारे या रोगाची हानी कमी केली जाऊ शकते. त्यामुळे अशी लक्षणे दिसत असतील तर तुम्ही वेळीच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, त्याकडे दुर्लक्ष करणे हे नक्कीच गंभीर ठरू शकते हे लक्षात घ्या. 

क्रॉनिक मायलॉइड ल्युकेमिया कर्करोग व्यवस्थापन: डॉक्‍टरांसोबत खुल्‍या मनाने संवाद साधणे महत्त्वाचे

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: World copd day chronic obstructive pulmonary disease can cause damage to ear throat and nose know the symptoms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2024 | 10:49 AM

Topics:  

  • chronic diseases
  • Health News

संबंधित बातम्या

‘अतिवेग, हेल्मेट अन्…’; भारतात दरवर्षी अपघातांमध्ये ‘इतक्या’ जणांचा मृत्यू; काय सांगतो UNICEF चा अहवाल?
1

‘अतिवेग, हेल्मेट अन्…’; भारतात दरवर्षी अपघातांमध्ये ‘इतक्या’ जणांचा मृत्यू; काय सांगतो UNICEF चा अहवाल?

PeptideTrend : दीर्घायुष्याचे गुपित की फसवणूक? व्हायरल होणाऱ्या पेप्टाइड इंजेक्शनचे सत्य उघड; रिपोर्ट धक्कादायक
2

PeptideTrend : दीर्घायुष्याचे गुपित की फसवणूक? व्हायरल होणाऱ्या पेप्टाइड इंजेक्शनचे सत्य उघड; रिपोर्ट धक्कादायक

World Pneumonia Day : लहान मुलांची योग्य काळजी घ्या… ! ४२ महिन्यांत ‘निमोनिया’चे ३२ बळी
3

World Pneumonia Day : लहान मुलांची योग्य काळजी घ्या… ! ४२ महिन्यांत ‘निमोनिया’चे ३२ बळी

World Pneumonia Day : श्वास एक…धोके अनेक! प्रदूषण, थंडी आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती न्यूमोनियाचे तीन गुप्त शत्रू
4

World Pneumonia Day : श्वास एक…धोके अनेक! प्रदूषण, थंडी आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती न्यूमोनियाचे तीन गुप्त शत्रू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.