फोटो सौजन्य: iStock
आजच्या व्यस्त लाइफस्टाइलमध्ये तणाव ही एक सामान्य समस्या बनली आहे. मग ती मुलं असो, नोकरी करणारी माणसं असो किंवा घरच्या जबाबदाऱ्या सांभाळणारी महिला, प्रत्येकजण बहुतेक वेळा कोणत्या ना कोणत्या कारणाने तणावग्रस्त असतात. हा ताण अनेकदा तात्पुरता असतो, पण जेव्हा हा बराच काळ टिकतो तेव्हा त्याला क्रॉनिक स्ट्रेस असे म्हणतात.
डॉक्टरांच्या मते, क्रॉनिक स्ट्रेस हा हृदयाच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे. यामुळे हाय ब्लड प्रेशर, हार्ट बीट आणि कोलेस्टेरॉलची पातळी वाढण्यासारख्या समस्या उद्भवू शकता. अनेक काळापासून स्ट्रेसमध्ये राहिल्याने हृदयविकार, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो.
क्रोनिक स्ट्रोकमुळे तुमच्या हृदयाला गंभीर नुकसान होऊ शकते. जेव्हा आपण सतत तणावाखाली असतो तेव्हा आपल्या शरीरातील स्ट्रेस हार्मोन्सची पातळी वाढते. हे हार्मोन्स आपला रक्तदाब वाढवतात व आपल्या हृदयाचे ठोके जलद करतात. यामुळे आपल्या हृदयावर हळूहळू दाब वाढतो आणि हृदयविकाराचा धोका निर्माण होतो.
हिवाळ्यात शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत चालू राहण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचे सेवन,
तणाव कमी करण्यासाठी तुम्ही अनेक गोष्टी करू शकता, माइंडफुलनेस मेडिटेशन, दीर्घ श्वास आणि योग यासारख्या पद्धती आपले मन शांत आणि तणाव कमी करतात. याशिवाय मित्र आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवणे, तुमच्या आवडीची कामे करणे, पुरेशी झोप घेणे आणि निरोगी राहणे यामुळे क्रॉनिक स्ट्रेस कमी होण्यास खूप मदत होते.
डेली लाइफस्टाइलमध्ये छोटे-मोठे बदल करून आपण हृदयाशी संबंधित आजारांना स्वतःपासून दूर ठेवू शकतो. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि तणावमुक्त जीवनशैलीचा अवलंब करून आपण आपले हृदय निरोगी ठेवू शकतो. फायबरयुक्त अन्न, कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ आणि ताजी फळे व भाज्यांचे सेवन हृदयासाठी खूप फायदेशीर आहे.
नियमित व्यायाम केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि कोलेस्ट्रॉल कमी होते. योग, ध्यान आणि प्राणायाम यांसारख्या पद्धतींनी तणाव कमी करता येतो. लक्षात ठेवा, लहान बदलांमुळे मोठा फरक पडू शकतो.
आपल्या हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी, संतुलित आहाराचे पालन करणे फार महत्वाचे आहे. तुम्ही तुमच्या आहारात ताजी फळे, पालेभाज्या, संपूर्ण धान्य जसे की ब्राऊन राइस, आणि ओट्स यांचाही समावेश करावा. त्यामध्ये भरपूर फायबर असते जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. याव्यतिरिक्त, प्रोटीन्सचे चांगले स्रोत जसे की डाळी, बीन्स, मासे (विशेषतः सॅल्मन), अंडी आणि काजू यांचा आहारात समावेश करा.
ओमेगा-३ फॅटी ॲसिड हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स अक्रोड, फ्लेक्ससीड आणि चिया सीड्स यांसारख्या पदार्थांमध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. हे फॅटी ऍसिड रक्तातील ट्रायग्लिसराइड्सची पातळी कमी करतात आणि चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) वाढवतात.
दुसरीकडे, तुम्ही साखरयुक्त पेये, पॅक केलेले ज्यूस आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळावेत, कारण त्यात साखर जास्त प्रमाणात असतात ज्यामुळे रक्तवाहिन्या कडक होतात आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. याशिवाय मीठाचे सेवन कमी करा कारण जास्त मीठ रक्तदाब वाढवू शकते.