Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World IVF Day: आयव्हीएफला सुरुवात करण्याआधी मानसिक तयारी किती गरजेचे, तज्ज्ञांनी दिल्या खास टिप्स

IVF हा काही सोपा प्रवास नाही. त्यासाठी आई आणि वडील दोघांनाही मानसिक तयारी करावी लागते आणि त्यासाठी नक्की कोणत्या मानसिक त्रासातून जावं लागते, कशी तयारी करावी याबाबत तज्ज्ञांच्या टिप्स

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 24, 2025 | 12:51 PM
वर्ल्ड आयव्हीएफ डे च्या निमित्ताने जाणून घ्या महत्त्वाची माहिती (फोटो सौजन्य - iStock)

वर्ल्ड आयव्हीएफ डे च्या निमित्ताने जाणून घ्या महत्त्वाची माहिती (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करत आहात का? सोप्यात सोप्या पद्धतीने गर्भधारणा कशी होईल यासाठीचे मार्ग तुम्ही नक्कीच शोधत असाल. गर्भधारणा तपासणीच्या अहवालाची वाट पाहतानाचा एक-एक क्षण तासाप्रमाणे भासत असेल. आणि जर अहवाल निगेटिव्ह आला तर निराशा, ताणतणाव हे ठरलेलेच असते. बाळ होण्यात येणाऱ्या अडचणी ही जगभरातील अनेक महिलांची समस्या आहे.

आकडेवारी सांगते की, जवळपास १० ते १४ टक्के भारतीयांना वंध्यत्वाची समस्या भेडसावते आणि याचा दर शहरी भागात जास्त आहे. आयव्हीएफसाठी मानसिक तयारीमध्ये निरोगी जीवनशैली, ताणतणावांचे व्यवस्थापन आणि भावनिक पाठिंबा यावर लक्ष केंद्रित करा. डॉ. हितेशा रामनानी रोहिरा, कन्सल्टंन्ट, IVF कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई यांनी सांगितलेल्या आयव्हीएफच्या प्रवासात पुढील गोष्टी उपयोगी ठरतील, जाणून घ्या (फोटो सौजन्य – iStock) 

IVF प्रक्रियेला घाबरुन जाऊ नका, तज्ज्ञांचा सल्ला

  • वजन नियंत्रणात राहावे – स्थूलपणा किंवा वजन खूप कमी असणे या दोन्ही गोष्टी मासिकपाळीवर, खासकरून ओव्ह्युलेशनवर आणि त्यामुळे वंध्यत्वावर परिणाम करू शकतात
  • गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असाल तर अल्कोहोल सेवनावर नियंत्रण ठेवा किंवा ते टाळा – खूप जास्त अल्कोहोल सेवन करत असाल तर समस्यांचा धोका देखील खूप जास्त असतो. जर तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असाल तर अल्कोहोल सेवन थांबवा
  • धूम्रपान टाळा – धूम्रपानाचा खूप जास्त परिणाम प्रजननक्षमतेवर होतो. धुम्रपानामुळे ओव्हरीयन रिझर्व्ह कमी होतात आणि अंड्यांची गुणवत्ता घसरते. धुम्रपानामुळे पुरुषांचा स्पर्म काउंट कमी होतो, स्पर्म्सच्या गुणवत्तेवर देखील विपरीत परिणाम होतो. जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर ते कमी करा आणि हळूहळू ते पूर्णपणे थांबवा
  • अँटीऑक्सिडंट्स भरपूर असलेले अन्नपदार्थ खा – तुमच्या शरीरातील फ्री रॅडिकल्स स्पर्म आणि अंड्यांच्या पेशी या दोघांनाही नुकसान पोहोचवू शकतात, पण अँटीऑक्सिडंट्स त्यांना निष्क्रिय करण्यात मदत करू शकतात. आहारामध्ये अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण वाढवण्यासाठी फळे, भाज्या, दाणे आणि संपूर्ण धान्ये यांचा तुमच्या आहारात मोठ्या प्रमाणावर वापर करा
  • ओमेगा-३ फॅटी ऍसिडस् सुरु करा – प्रजननक्षमता आणि एकंदरीत आरोग्याला चालना देण्यासाठी दररोजच्या आहारात हेल्दी फॅट्स असणे खूप महत्त्वाचे आहे. ओमेगा-३ फॅटी ऍसिडस्मुळे प्रजननक्षमता वाढवायला मदत होऊ शकते. चरबीचे प्रमाण जास्त असलेले मासे, अक्रोड आणि चिया सीड्समध्ये हे हेल्दी फॅट मिळू शकते
  • कॅफिनवर नियंत्रण – दर दिवशी २०० मिलिग्रॅम कॅफिनचे सेवन गर्भधारणा क्षमतेच्या आड येण्याची शक्यता नाही. म्हणजेच एका दिवसभरात तुम्ही जास्तीत जास्त एक किंवा दोन कप कॉफी घेऊ शकता
  • ताणतणावांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करा – गर्भधारणेसाठी बरेच प्रयत्न करावे लागणे हाच मुळात खूप मोठा ताण असतो. काही संशोधनांमध्ये आढळून आले आहे की, ताणतणावांचा प्रजननक्षमतेवर परिणाम होतो. ताणतणावांमुळे मासिक पाळी अनियमित होऊ शकते, त्यामुळे प्रजननक्षमता बिघडू शकते
  • प्रसूतीपूर्वी आवश्यक असलेली व्हिटामिन घ्या – ही खास डिझाईन केलेली मल्टीव्हिटामिन सप्लिमेंट्स असतात जी शरीराला गर्भधारणेच्या आधी आणि गर्भावस्थेमध्ये व्हिटामिनचा जो डोस दररोज मिळणे आवश्यक असते, तो पुरवतात. फोलिक आणि व्हिटामिन डी ही दोन प्रजननक्षमतेला चालना देणारी पोषके आहेत, तुमच्या शरीरात त्यांचे प्रमाण योग्य राहील याची काळजी घ्या
  • सक्रिय राहा – व्यायाम करणे आरोग्यासाठी अनेक प्रकारे हितकारक असते. व्यायामामुळे प्रजननक्षमता देखील वाढते. मध्यम शारीरिक हालचाली वाढवल्याने महिला व पुरुष दोघांच्याही प्रजननक्षमतेवर सकारात्मक प्रभाव पडतो. खासकरून स्थूल व्यक्तींना हे खूपच फायदेशीर ठरते. खूप जास्त थकवणारे किंवा खूप जास्त वेळ व्यायाम करू नका.

फर्टिलिटी कन्सल्टन्टचा सल्ला घ्या, आयव्हीएफ प्रक्रिया नीट समजून घ्या. लक्षात ठेवा की, आयव्हीएफ पहिल्याच प्रयत्नांत यशस्वी न होण्याचीदेखील शक्यता असते. सकारात्मक दृष्टिकोन ढळू नये यासाठी या प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्याचा आनंद घ्या.

मेडिकल सायन्सचा चमत्कार! नव्या IVF टेक्निकने आता बाळाचे डोळे, त्वचा आणि केसांचा रंगही पालक ठरवू शकणार

Web Title: World ivf day how important is mental preparation before starting ivf experts give special tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2025 | 12:17 PM

Topics:  

  • fertility rate
  • health issue
  • Health Tips
  • IVF

संबंधित बातम्या

शरीराच्या ‘या’ भागात असते सर्वात जास्त घाण, आंघोळीनंतरही राहतात लाखो Bacteria
1

शरीराच्या ‘या’ भागात असते सर्वात जास्त घाण, आंघोळीनंतरही राहतात लाखो Bacteria

शुगर राहील कायमच नियंत्रणात! जेवणानंतर फॉलो करा ‘ही’ सवय, गंभीर आजारांपासून होईल शरीराचे रक्षण
2

शुगर राहील कायमच नियंत्रणात! जेवणानंतर फॉलो करा ‘ही’ सवय, गंभीर आजारांपासून होईल शरीराचे रक्षण

आळसामुळे तुम्ही बदलत नाही Panty? ही घाणेरडी सवय धोक्यात आणेल तुमची Vaginal Health
3

आळसामुळे तुम्ही बदलत नाही Panty? ही घाणेरडी सवय धोक्यात आणेल तुमची Vaginal Health

10-10-10 नियम कराल फॉलो तर कधीच होणार नाही Diabetes, आयुष्यभर रहाल तंदुरुस्त; न्यूट्रिशनिस्टचा खुलासा
4

10-10-10 नियम कराल फॉलो तर कधीच होणार नाही Diabetes, आयुष्यभर रहाल तंदुरुस्त; न्यूट्रिशनिस्टचा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.