मुतखड्यावरील घरगुती उपाय (फोटो सौजन्य - iStock)
सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळत आहे आणि याचा थेट परिणाम किडनीवरही होताना दिसून येतो. अनेकांना लहान वयातच किडनी डॅमेजसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. १३ मार्च रोजी जगभरात किडनी डे साजरा केला जातो. किडनीच्या समस्यांबाबत जागरूकतेसाठी ही दिन साजरा करण्यात येतो.
किडनी स्टोन ही सर्वाधिक मोठी समस्या सध्या अनेकांना सतावते. कारण वेळेवर न खाणे आणि पाणी न पिणे या दोन्ही गोष्टी मोठ्या प्रमाणात लोकं करताना दिसतात. विशेषतः पाणी पिण्याची आठवणच अनेकांना रहात नाही, ज्याचा किडनीवर परिणाम होऊन मुतखडा होण्याची दाट शक्यता निर्माण होते. मात्र तुम्हाला जर किडनी स्टोन झाला तर घरगुती उपाय तुम्ही करू शकता. आयुर्वेदिक डॉक्टर माधव भागवत यांनी काही सोपे उपाय याबाबत सांगितले आहेत आणि ते तुम्ही नक्की करून पहा. तुमचा किडनीत तयार झालेले छोटा मुतखडा त्वरीत शरीराबाहेर पडण्यास मदत होईल.
जास्त पाणी पिणे
नियमित भरपूर पाणी प्या
मूत्रपिंडातील दगड बाहेर काढण्यासाठी पुरेसे पाणी पिणे हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. दिवसातून ८-१२ ग्लास पाणी प्या, यामुळे लघवीचे प्रमाण वाढते आणि मुतखडा शरीरातून काढून टाकण्यास मदत होते. डॉक्टरही सर्वात पहिला पर्याय हाच सांगतात. पाणी सतत पित राहिल्यास लघवीवाटे हा मुतखडा बाहेर येण्याची शक्यता जास्त असते. मुतखडा तयार झाल्यास किडनीवर भार येतो आणि सतत पोटात दुखत राहते आणि ते दुखणे असह्य असते. त्यामुळे मुतखडा होऊ न देण्यासाठीही दिवसभरात २-३ लीटर पाणी पित रहावे
किडनी सडल्याची 5 लक्षणं; सकाळीच दिसून येतात संकेत, दुर्लक्ष करणे बेतेल जीवावर
लिंबाच्या रसाचा वापर
लिंबाच्या रसाचा योग्य वापर करावा
लिंबामध्ये सायट्रेट असते, जे कॅल्शियम स्टोन तोडण्यास मदत करते आणि नवीन दगड अर्थात नवा किडनी स्टोन तयार होण्यापासून रोखते. सकाळी कोमट पाण्यात ताज्या लिंबाचा रस मिसळा आणि प्या. रोज सकाळी उठून तुम्ही उपाशीपोटी कोमट पाण्यात लिंबू रस पिळून प्यालात तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा मिळतो आणि डॉक्टरांची औषधे घेण्यापूर्वीच मुतखडा शरीराबाहेर पडण्यास मदत मिळते.
अॅपल सायडर व्हिनेगर
अॅपल सायडर व्हिनेगरचा वापर
अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये अॅसिटिक अॅसिड असते, जे किडनी स्टोन विरघळवण्यास उपयुक्त ठरू शकते. पाण्यात १-२ चमचे सफरचंद सायडर व्हिनेगर मिसळा आणि दिवसातून एकदा प्या. मात्र याचा वापर करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे नक्कीच आवश्यक आहे. काही जणांना या पदार्थाची अॅलर्जी असू शकते. तसंच याचे नक्की प्रमाण किती घ्यायचे हेदेखील समजून घेणे आवश्यक आहे.
ऑक्सलेटयुक्त पदार्थ
अधिक खारट पदार्थ खाणे टाळा
खारट पदार्थ आणि ऑक्सलेटयुक्त पदार्थ जसे की पालक, बीट आणि काजू यांचे सेवन मर्यादित करा, कारण यामुळे किडनी स्टोन तयार होण्याचा धोका वाढू शकतो. संतुलित, कमी सोडियमयुक्त आहार घ्या. अनेकांना फास्ट फूड आणि त्यातही अधिक मीठाचे पदार्थ खाण्याची सवय असते. पण ही सवय वेळीच सोडा नाहीतर त्याचा परिणाम हा किडनीवर होताना दिसून येतो. रोजच्या जेवणातही वरून मीठ घालून खाणे टाळा.
Kidney Damage Causes: किडनी सडू लागली आहे कसे ओळखावे? रात्रीच्या वेळी शरीरावर दिसतील ‘अशी’ लक्षणे
हर्बल उपाय
किडनी स्टोनसाठी वनस्पती
काही औषधी वनस्पती जसे की पिवळ्या रंगाची फूले येणारे रानटी फुलझाड ज्याला डँडेलियन रूट वा सिंहपर्णी असे म्हटले जाते आणि तुळस या वनस्पती किडनीच्या आरोग्यासाठी मदत करतात असे मानले जाते. हर्बल टी पिण्याने लहान किडनी स्टोन निघून जाण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे तुम्ही याचाही वापर करू शकता.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.