Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चहाबाजांनो! सोन्यापेक्षा महाग मिळतोय चहा, चिमूटभर चहापानांच्या किमतीत येईल Luxury Car; वाचून बसेल धक्का

बहुतेक लोकांना चहा प्यायला आवडतो. चहा पोटात गेल्याशिवाय अनेकांना काही सुचत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का, की चहाचा एक असा प्रकार आहे जो जगातील सर्वात महागड्या चहांपैकी एक मानला जातो?

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 10, 2026 | 02:24 PM
जगातील सर्वात महागडा चहा (फोटो सौजन्य - iStock)

जगातील सर्वात महागडा चहा (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:

चहाप्रेमी चहाला कधीच नकार देऊ शकत नाहीत. अगदी कडक उन्हातही गरमागरम चहाची चुस्की मारणारे तुम्हाला नक्कीच दिसतील. सर्वसाधारण चहाची किंमत तुम्ही आतापर्यंत महागड्या हॉटेलमध्येही साधारण ५०० रूपयांपर्यंत ऐकली असेल. तुम्ही कधी अशा चहाबद्दल ऐकले आहे का, ज्याची किंमत सोन्यापेक्षाही कित्येक पटींनी जास्त आहे? होय, तुम्ही बरोबर ऐकले. जगात असा एक चहा आहे, ज्याच्या केवळ २० ग्रॅममध्ये तुम्ही एक आलिशान फ्लॅट किंवा एक आलिशान कार खरेदी करू शकता. 

आम्ही चीनच्या ‘दा हाँग पाओ’ चहाबद्दल बोलत आहोत. जर तुम्हाला वाटत असेल की त्याची किंमत एक हजार किंवा दोन हजार रुपये प्रति किलो असेल, तर तुम्ही चुकताय, कारण ‘दा हाँग पाओ’ सोन्यापेक्षा ३० पट अधिक महाग आहे. चला जाणून घेऊया की हा चहा जगातील सर्वात महागडा का आहे. आरोग्यासाठी हा चहा कसा आहे तेदेखील जाणून घेऊया. 

२० ग्रॅम चहाची किंमत १.८ दशलक्ष रुपये आहे!

२००२ मध्ये, चीनमधील एका लिलावादरम्यान, एका श्रीमंत व्यक्तीने केवळ २० ग्रॅम ‘दा हाँग पाओ’ चहासाठी १,८०,००० युआन, म्हणजेच अंदाजे १.८ ते २ दशलक्ष रुपये (त्यावेळच्या अंदाजे २८,००० डॉलर्स) दिले. तुम्ही हिशोब केल्यास, या चहाच्या एका कपाची किंमत सुमारे १० लाख रुपये आहे.

वाढलेले वजन कमी होण्यासोबतच चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो! उपाशी पोटी नियमित करा निळ्या चहाचे सेवन

हा चहा इतका महाग का आहे?

सर्वात मोठे कारण म्हणजे त्याची दुर्मिळता. अस्सल दा होंग पाओ चहा चीनच्या फुजियान प्रांतातील वुयिशान पर्वतरांगांमध्ये असलेल्या काही विशेष ‘मातृवृक्षां’पासून (जुनी झाडे) मिळतो. जगात अशा अस्सल झाडांची संख्या आता बोटांवर मोजण्याइतकी आहे. ही झाडे सरकारी मालमत्ता आहेत आणि अनेक वर्षांपासून त्यांच्या संरक्षणासाठी सशस्त्र सैनिक तैनात होते. ही जुनी झाडे वर्षाला फक्त काहीशे ग्रॅम चहा देतात, जो मुख्यतः उच्च-पदस्थ सरकारी अधिकाऱ्यांसाठी राखीव असतो. असा विश्वास आहे की हा चहा प्यायल्याने अनेक आजार बरे होण्यास मदत होते.

‘दा होंग पाओ’ नावामागील कथा 

‘दा होंग पाओ’ या नावाचा अर्थ ‘मोठा लाल झगा’ असा आहे. लोककथेनुसार, प्राचीन काळी, चीनच्या एका सम्राटाची आई हा चहा प्यायल्यानंतर एका गंभीर आजारातून बरी झाली. आनंदापोटी, राजाने चहाच्या झाडांना आपला शाही लाल झगा पांघरला आणि त्यावरूनच हे नाव पडले.

रोज चहा हवाच का? एक चूक शरीरात भरतेय विष, आयुर्वेद तज्ज्ञांचा सूचक इशारा; होईल संधिवात

सर्वसामान्य माणसासाठी काय पर्याय आहेत?

सर्वसामान्य माणसाला याची चव कधीच घेता येणार नाही का, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. अस्सल ‘मदर ट्री’ चहा मिळणे अशक्य असले तरी, त्याच झाडांच्या कलमांपासून वाढवलेल्या लहान रोपांचा चहा वुयिशानच्या बाजारपेठांमध्ये उपलब्ध आहे. त्याच्या उच्च गुणवत्तेला प्रति किलो १०० डॉलर (सुमारे ८,००० रुपये) भाव मिळू शकतो. मात्र, ‘प्राचीन’ आणि अस्सल जुना चहा फक्त अब्जाधीशांनाच मिळतो.

Web Title: Worlds most costly tea more expensive than gold and luxury car at chaina called da hong pao tea

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 02:24 PM

Topics:  

  • Health Tips
  • healthy tea
  • lifestyle news in marathi

संबंधित बातम्या

Sweets Cravings: सतत गोड खावंसं का वाटतं? शरीराच्या ‘या’ संकेतांकडे दुर्लक्ष करू नका
1

Sweets Cravings: सतत गोड खावंसं का वाटतं? शरीराच्या ‘या’ संकेतांकडे दुर्लक्ष करू नका

दिवसभर शरीराला हायड्रेड ठेवण्यासाठी नक्की किती पाण्याचे सेवन करावे? योग्य प्रमाण जाणून घ्या
2

दिवसभर शरीराला हायड्रेड ठेवण्यासाठी नक्की किती पाण्याचे सेवन करावे? योग्य प्रमाण जाणून घ्या

Women Libido: महिलांचे लिबिडो वाढवून शारीरिक संबंध सुधारण्यासाठी वरदान ठरते मेथी, जाणून घ्या फायदे
3

Women Libido: महिलांचे लिबिडो वाढवून शारीरिक संबंध सुधारण्यासाठी वरदान ठरते मेथी, जाणून घ्या फायदे

आता बायोप्सीची गरज कमी होणार? लाळ आणि स्वॅबमधून ओरल कॅन्सरची प्राथमिक तपासणी शक्य
4

आता बायोप्सीची गरज कमी होणार? लाळ आणि स्वॅबमधून ओरल कॅन्सरची प्राथमिक तपासणी शक्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.