जगातील Top 10 सुरक्षित शहरांची यादी आली समोर; भारताच्या एकही शहराचा समावेश नाही, या क्रमांकावर पटकावले स्थान
परदेशात फिरण्याचे स्वप्न कोणाचे नसते? प्रत्येकजण आयुष्यात किमान एकदा तरी परदेश प्रवास करण्याची इच्छा ठेवतो. भारताच्या तुलनेत, अनेक परदेशी देशांमध्ये सुरक्षा अधिक चांगली असते. जर तुम्ही सुरक्षिततेचा विचार करून परदेशात जाण्याचा विचार करत असाल, तर ‘अबू धाबी’ (Abu Dhabi) तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.
देशातील एकमेव असे मंदिर जिथे भगवान शिव माता पार्वतीच्या मांडीवर झोपलेले आहेत; अनोखं आहे यामागचं कारण
2025 च्या Numbeo Crime Index Report नुसार, अबू धाबीला जगातील सर्वात सुरक्षित शहरांपैकी एक म्हणून स्थान देण्यात आले आहे. ही मिड-ईयर रिपोर्ट 279 शहरांच्या डेटावर आधारित तयार करण्यात आली आहे. अबू धाबीने 88.8 अशा उच्च सेफ्टी स्कोअरसह पहिलं स्थान पटकावलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, अबू धाबी गेल्या 9 वर्षांपासून या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे हे शहर पर्यटक आणि कुटुंबीयांसोबत प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत विश्वासार्ह मानलं जातं.
2025 मधील टॉप 10 सर्वाधिक सुरक्षित शहरं (मिड-ईयर रिपोर्टनुसार):
या शहरांमध्ये केवळ सुरक्षितता नव्हे, तर स्वच्छ वातावरण आणि पर्यटकांसाठी अनुकूल सुविधा देखील आहेत. त्यामुळे इथे प्रवास करणारे पर्यटक अधिक आरामदायक आणि सुरक्षित अनुभव घेतात.
सेफ्टी इंडेक्स कसा ठरवला जातो?
‘Numbeo’ नावाच्या वेबसाईटवर लोक स्वतःच्या अनुभवांच्या आधारे रिव्ह्यू देतात. या रेटिंगमध्ये हे पाहिलं जातं की, एखादं शहर दिवसा किंवा रात्री कितपत सुरक्षित वाटतं, गुन्हेगारीची पातळी कशी आहे, लोकांना चोरी, हिंसा अशा गोष्टींची किती भीती वाटते, यावर आधारित सेफ्टी इंडेक्स दिला जातो.
Nagpanchmi 2025 : भारतातील 5 फेमस आणि रहस्यमय नाग मंदिर; इथे जाताच सर्व समस्यांपासून होईल मुक्तता
प्रवासापूर्वी ही माहिती का आवश्यक आहे?
जर तुम्ही सोलो ट्रॅव्हलर असाल किंवा कुटुंबासोबत प्रवास करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. सुरक्षित शहरांमध्ये तुम्हाला मानसिक शांतता मिळते, तसंच स्थानिक लोकांचा सहकार्य आणि सुविधा देखील तुमचा अनुभव संस्मरणीय बनवतात.