(फोटो सौजन्य: AstroVed)
तुम्ही अनेक शिवमंदिरे पाहिली असतील जिथे भगवान शिवांची मूर्ती उभी असते. काही मंदिरांत ते एकटे विराजमान असतात, तर काही ठिकाणी त्यांच्या सोबत देवी पार्वतीही असतात. पण कधी तुम्ही अशा मंदिराबद्दल ऐकलंय का, जिथे भगवान शिव विश्रांतीच्या अवस्थेत, झोपलेले आहेत आणि देवी पार्वती त्यांच्या शेजारी बसलेली आहे. हे दृश्य फारच दुर्मिळ आहे आणि असं दृश्य तुम्हाला फक्त एकाच मंदिरात पाहायला मिळेल जे भारतात वसलेले आहे.
Nagpanchmi 2025 : भारतातील 5 फेमस आणि रहस्यमय नाग मंदिर; इथे जाताच सर्व समस्यांपासून होईल मुक्तता
श्री पल्लिकोंडेश्वर स्वामी मंदिर – एक अद्वितीय शिवमंदिर
आंध्र प्रदेशातील सुरुट्टपल्ली नावाच्या गावात वसलेलं श्री पल्लिकोंडेश्वर स्वामी मंदिर हे भगवान शिवाला समर्पित आहे. या मंदिरात भगवान शिव “आनंद शयन” स्थितीत झोपलेले दिसतात, अगदी जसं आपण भगवान विष्णूला ‘अनंतशयन’ रूपात पाहतो. ही मुद्रा इतर कोणत्याही शिवमंदिरात पाहायला मिळत नाही.
मंदिराची वैशिष्ट्ये
हे मंदिर दाक्षिणात्य स्थापत्यशैलीत बांधलेले असून यामध्ये सुंदर पाच मजली राजगोपुरम आहे. भगवान शिव येथे “पल्लिकोंडेश्वरर” या नावाने पूजले जातात आणि देवी पार्वती “मरगथांबिगै” नावाने प्रतिष्ठित आहेत. विशेष म्हणजे, येथे शिवलिंग नसून, भगवान शिव मानवी रूपात झोपलेले असून देवी पार्वती त्यांच्या डोक्याशी बसलेली आहेत.
“सुरुट्टपल्ली” या नावामागील कथा
सुरुट्टपल्ली या गावाच्या नावामागे एक पौराणिक कथा आहे. समुद्रमंथनावेळी जेव्हा भगवान शिवांनी हलाहल विष पिऊन जगाचा उद्धार केला, तेव्हा त्यांची प्रकृती खालावली. त्यावेळी ते एका जागी विश्रांतीसाठी झोपले आणि देवी पार्वतीने त्यांचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. “सुरुट्टा” म्हणजे थोडं चक्कर येणं किंवा थकवा आणि “पल्ली” म्हणजे झोप किंवा विश्रांती. यावरूनच या ठिकाणाचं नाव सुरुट्टपल्ली पडलं. असे मानले जाते की हे मंदिर विजयनगर साम्राज्याच्या विद्यारण्य राजाने बांधले होते. काही काळ हे मंदिर जीर्णावस्थेत होते, परंतु अलीकडेच त्याची सुंदर पुनर्बांधणी करण्यात आली आहे.
प्रदोष पूजेचा उगम
सुरुट्टपल्ली हेच ते ठिकाण आहे जिथे प्रथमच प्रदोष पूजेची सुरुवात झाली. असे मानले जाते की, जे भक्त शनिवारच्या दिवशी पडणाऱ्या प्रदोष व्रतावर येथे पल्लिकोंडेश्वराची पूजा करतात, त्यांचे सर्व अडथळे दूर होतात. प्रमोशन थांबले असल्यास ते पुन्हा सुरू होते, विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होतात, आणि विभक्त झालेल्या जोडप्यांमध्ये पुन्हा गोडवा निर्माण होतो.
दर्शन वेळ:
प्रवास मार्ग:
बसने: उत्तुकोट्टई बस स्थानक मंदिरापासून फक्त 2 किमी अंतरावर आहे.
रेल्वेने: तिरुवल्लूर रेल्वे स्टेशन सुमारे 29 किमी अंतरावर आहे.
हवाईमार्गे: तिरुपती इंटरनॅशनल एअरपोर्ट हे सर्वात जवळचे विमानतळ असून, मंदिरापासून सुमारे 73 किमी अंतरावर आहे.
पल्लिकोंडेश्वर मंदिर हे अशा भक्तांसाठी एक अद्वितीय तीर्थक्षेत्र आहे जे भगवान शिवाच्या दुर्लभ आणि शांत स्वरूपाचे दर्शन घेऊ इच्छितात. हे मंदिर एकदा तरी नक्की भेट देण्याजोगं आहे.