Lifestyle News: हल्लीच्या काळात आपले प्रत्येकाचेच जीवन हे धपालीचे झालेले आहे. ऑफिसचे काम, अन्य गोष्टींची काळजी अशा अनेक गोष्टींचा आपण ताण घेत असतो. तो आपोआप येतच असतो. प्रत्त्येकाच्या जीवनात ताण आहे. मानसिक ताण, शारीरिक ताण असे आपण म्हणून शकतो. व्यायाम व आहारात असलेली अनियमितता यामुळे देखील अनेक आजार होण्याचा धोका असतो. स्ट्रेस हा कोणत्याही गोष्टीचा येत असतो. रोजच्या धावपळीच्या जीवनात स्ट्रेस येणे हे नेहमीचे झाले आहे. मात्र हा स्ट्रेस म्हणजेच तणाव कमी करणे अस्व्ह्यक आहे. तो कसा कमी करायचा याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
मानसिक ताण-तणाव कमी करण्यासाठी आपण आपल्या रोजच्या दिनचर्येत काही उपायाचा समावेश करू शकतो. ते उपाय केल्यास आपण आपला ताण-तणाव कमी करू शकतो. ज्यामुळे तुम्हाला तणावापासून मुक्तता मिळू शकतो. आराम मिळू शकतो.
तणाव कमी करण्यासाठी कोणते उपाय करावेत?
दीर्घ श्वास घ्यावा: ताण तणावावर मात करण्यासाठी तुम्ही दीर्घ श्वास घेऊ शकता. यामुळे तुम्हाला थोडे रिलॅक्स वाटू शकते. तुम्ही जेव्हा दीर्घ श्वास घेता तेव्हा तुमच्या डोक्यात ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. ताणावर मात करण्यासाठी तुम्ही दररोज १० ते १५ मिनिटे हा उपाय करू शकता.
दररोज चालावे: दररोज थोडावेळ बाहेर मोकळ्या हवेत फिरल्यास तुम्हाला तणावापासून मुक्तता मिळू शकते. दररोज २०-३० मिनिटे मोकळ्या हवेत चालल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो.
पुरेशी झोप घ्यावी: कमी झोप झाली असेल तरी तुम्हाला ताण तणावाचा सामना करावा लागू शकतो. निरोगी जीवनासाठी ७ ते ८ तासांची पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. तसेच शक्य तितका स्क्रीन टाइम कमी करण्याचा प्रयत्न करावा.
Baba Ramdev ने सांगितले सकाळी उपाशीपोटी तूप खाण्याचे 10 फायदे, खाण्याची योग्य पद्धत माहीत हवी
योग आणि मेडिटेशन: ताण आणि तणाव कमी करण्यासाठी तुम्ही दररोज योग करणे आवश्यक आहे. मेडिटेशन आणि योग केल्याने मन शांत होते. दिवसाची सुरुवात १५ ते २० मिनिटे योग करून करावी.
मोकळेपणाने हसावे: आपला ताण-तणाव कमी करण्यासाठी हसण्यापेक्षा दुसरा कोणताही दुसरा सोपा मार्ग नाही. ताण कमी करण्यासाठी तुम्ही कॉमेडी-सो देखील पाहू शकता. मित्र मैत्रिणींसोबत तसेच कुटुंबासोबत देखील गप्पा माराव्यात. त्यामुळे ताण कमी होण्यास मदत मिळू शकते.
टीप: वरील लेखातून आम्ही कोणताही दावा करत नाही. योग्य उपचारांसाठी/उपायांसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. .