Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ST Bus: दिवाळीत धुळे विभागाला ‘लक्ष्मी’ पावली! लालपरीची तब्बल ४ कोटी ३१ लाखांची बंपर कमाई

दीपोत्सवाच्या १० दिवसांचा काळ एसटी महामंडळासाठी बंपर कमाईचा काळ ठरला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील एसटीच्या चौघा आगारांना अक्षरशः सोन्याची पर्वणी लाभली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 31, 2025 | 04:17 PM
10-day Deepotsav in Dhule division generated crores of revenue for the ST Corporation.

10-day Deepotsav in Dhule division generated crores of revenue for the ST Corporation.

Follow Us
Close
Follow Us:

ST Bus: धुळे: दिवाळीच्या निमित्ताने स्वतःच्या गावी जाणारे अनेक लोक असतात. पर्यटक, विद्यार्थी आणि स्थलांतरित मोठ्या प्रमाणामध्ये लालपरीची वापर करतात. त्यामुळे दिवाळी ही एसटी महामंडळाला लक्ष्मी देणारी ठरते. यंदाच्या दीपोत्सव काळात नंदुरबार जिल्ह्यातील एसटीच्या चौघा आगारांना अक्षरशः सोन्याची पर्वणी लाभली आहे. दीपोत्सवाच्या १० दिवसांत तब्बल ४ कोटी ३० लाख ७९ हजारांची कमाई केली आहे. गेल्या वर्षी दीपोत्सवात तीन कोटी ८७ हजारांची कमाई केली होती. गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल ४३ लाखाहून अधिकची कमाई केल्याने दीपोत्सवाच्या १० दिवसांचा काळ एसटी महामंडळासाठी बंपर कमाईचा काळ ठरला आहे.

दिवाळीनिमित्त मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी आपल्या गावी तसेच भेटीगाठी करण्यासाठी प्रवास केला. जिल्ह्यातील नंदुरबारसह शहादा, नवापूर व अक्कलकुवा या चारही आगारांच्या बस फेऱ्यांमध्ये प्रचंड गर्दी दिसून आली. सात लाख ४६ हजार ९६ प्रवाशांनी गेल्या दहा दिवसात प्रवास केला. यामुळे कधी नव्हे तो प्रवासी वाहतूकीचा विक्रम यंदा एसटीने केला आहे. दरम्यान, वाढत्या गर्दीचा विचार करुन एसटी प्रशासनाने अतिरिक्त बस फेऱ्या चालविल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना सुलभ सेवा मिळाली. तर महसूलातही वाढ झाली. वाढत्या प्रवासी संख्येमुळे आगार कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून गेल्या वर्षाभरातील सर्वाधिक उत्पन्नाचा कालावधी ठरला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

या आगारांनीही लावलाय मोठा आर्थिक हातभार

जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, अक्कलकुवा व नवापूर या चौधा आगारांमधून चंदा एकूण १६ हजार ६११ बसफेऱ्या १० दिवसात झाल्या. यातून तब्बल ७ लाख ४६ हजार ९६ इतक्या प्रवाशांनी प्रवास केला तर गेल्यावर्षी दीपोत्सवात १० दिवसांच्या कालावधीत १२ हजार ६८९ फेऱ्या झाल्या होत्या. यातून ७ लाख ३६ हजार ८३६ प्रवाशानी प्रवास कैला, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा ९ हजार २६०प्रवाशांनी अधिक प्रवास केला आहे. यंदा १६ ते २६ ऑक्टोबर या दीपोत्सवाच्या कालावधीत एसटीने ४ कोटी ३० लाख ७९ हजारांची कमाई केली आहे. गेल्यावर्षी २७ ऑक्टोबर त ६ नोव्हेंबर या १० दिवसाच्या कालावधीत ३ कोटी ८७ लाख ७१ हजारांची कमाई केली होती. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा ४३ लाख ८ हजारांची कमाई अधिक केली आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

धुळे नंदुरबार जिल्ह्यातील विभागीय नियंत्रक पुरुषोत्तम व्यवहारे म्हणाले की,”दीपोत्सवाच्या १० दिवसांच्या कालावधीत संभाव्य वाढती गर्दी लक्षात घेता वाढीव बसफेऱ्यांचे नियोजन केले होते. त्यानुसार प्रवाशांना सोयी, सुविधा पुरविण्याचे नियोजन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले होते. यातुन नंदुरबार व धुळे जिल्हा मिळून सर्व ९ आगारांमधून गेल्या वर्षाच्या तुलनेत ५७ लाख ९४ हजारांची अधिक कमाई झाली आहे. यापुढेदेखील प्रवाशाना दर्जेदार सेवादेण्यासाठी कटीबध्द आहोत, असा भावना विभागीय नियंत्रण व्यवहारे यांनी व्यक्त केल्या.

Web Title: 10 day deepotsav in dhule division generated crores of revenue for the st corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 04:16 PM

Topics:  

  • dhule news
  • Jalgaon News
  • st bus news

संबंधित बातम्या

अडीच कोटींच्या देवळी ते भोरस रस्त्याचे तीनतेरा! वर्षभरातच पडले रस्त्यावर भलेमोठे खड्डे
1

अडीच कोटींच्या देवळी ते भोरस रस्त्याचे तीनतेरा! वर्षभरातच पडले रस्त्यावर भलेमोठे खड्डे

मतदार यादीतील बदलाबाबत वैयक्तिक तक्रारीच ग्राह्य! प्रत्येक तक्रारीची सुनावणी घेतली जाणार
2

मतदार यादीतील बदलाबाबत वैयक्तिक तक्रारीच ग्राह्य! प्रत्येक तक्रारीची सुनावणी घेतली जाणार

बसची आगाऊ तिकिट सेवेचे वाजले तीन-तेरा! ST महामंडळाच्या ऑनलाईन व्यवस्थेमुळे प्रवाशांचे तीन तास गेले वाया
3

बसची आगाऊ तिकिट सेवेचे वाजले तीन-तेरा! ST महामंडळाच्या ऑनलाईन व्यवस्थेमुळे प्रवाशांचे तीन तास गेले वाया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.