चंद्रपुरातुन एक मोठी बातमी समोर येत आहे. चंद्रपुरातील माजरी गावात महाप्रसादeतून 100 जणांना विषबाधा झाली आहे. यापैकी एकाचा मृत्यूही झाला आहे. विषबाधा झाल्यानंतर सर्वांना नजीकच्या रुग्णालयात भरती करण्यात आलं. मात्र, एका वृद्धाचा उपचारादम्यान मृत्यू झाला. रामप्रेक्ष यादव असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून आरोग्य यंत्रणाही त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे.
[read_also content=”‘पुष्पा 2’ चा टीझर यूट्यूबवर ट्रेंडिंग, गेल्या 138 तासात 110 दशलक्ष व्ह्यूज! https://www.navarashtra.com/movies/pushpa-2-the-ruleteaser-becomes-the-first-teaser-to-be-trending-number-one-on-youtube-for-a-record-138-hours-nrps-523624.html”]
मिळालेल्या माहितीनुसार,चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील माजरी गावाता हा प्रक महाप्रसादातून 100 नागरिकांना विषबाधा झाली. यामध्ये एका वृद्धाचा मत्यू झालाय. चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हा मृत्यू नोंदविला गेलाय. भोजनानंतर सहभागी 100 लोकांना रात्री उशिरा मळमळ-उलटीचा त्रास झाल्यानंतर आसपासच्या वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेड रुग्णालय, वरोरा उपजिल्हा रुग्णालय, स्थानिक आरोग्य केंद्र येथे दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांनी भेट दिली आहे. सध्या पोलीस व आरोग्य यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.