
फोटो सौजन्य: iStock
नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत व दिलासा देण्यास शासन नेहमीच प्राधान्य देत आले आहे. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि पूर यांसारख्या परिस्थितीत नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून मदत वितरीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Ahilyanagar News: नदीचे पाणी दूषित असल्याने जेऊर ग्रामस्थ आक्रमक, आरोग्याचा प्रश्न चव्हाट्यावर
ऑक्टोबर २०२५ मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी, पूर आणि सततच्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासन निर्णयानुसार (०–२ हेक्टर क्षेत्र) ४८२ कोटी १० लाख ६९ हजार आणि (२–३ हेक्टर क्षेत्र) ₹२ कोटी २९ लाख २३ हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. हा निधी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावा, अशी बळीराजाची अपेक्षा आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील २९,२५६ शेतकऱ्यांच्या एकूण ६,७०३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना आता ७ कोटी ६३ लाख ५४ हजार रुपयांचा मदतनिधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Gadchiroli Naxal Surrender: गडचिरोलीत मोठे यश! डीजीपी रश्मी शुक्लांसमोर ११ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील ६,५५४ शेतकऱ्यांचे सुमारे १०१५.९९ हेक्टर क्षेत्रावरील शेतजमिनीचे नुकसान झाले होते. त्याबाबत ४ कोटी ७४ लाख ६४ हजार रुपयांचा निधी मिळणार आहे. शासनाच्या या मदतनिधी वितरणामुळे नैसर्गिक संकटांनी होरपळलेल्या शेतकऱ्यांना उभारी मिळण्यास मदत होणार आहे.