आता शाळांमध्ये 'सीबीएसई पॅटर्न'
पुणे : गेल्या काही दिवसांपासून प्रतिक्षा लागलेल्या बारावी बोर्ड परीक्षा आजपासून सुरु होत आहेत. यामध्ये राज्यातील 3 हजार 373 परीक्षा केंद्रावर मंगळवारपासून बारावीच्या परीक्षा सुरु होणार आहे. ही परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या कालावधीत होत आहे. यंदा परीक्षेसाठी एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये 8 लाख 10 हजार 348 मुले, तर 6 लाख 94 हजार 652 मुली आहेत.
हेदेखील वाचा : Pariksha Pe Charcha 2025: तणावविरहित वातावरणात संपूर्ण पेपर कसा सोडवायचा? पंतप्रधान मोदींच्या विद्यार्थ्यांसाठी खास टिप्स
राज्यात एकूण 10 हजार 550 कनिष्ठ महाविद्यालयातील या विद्यार्थ्यांची नोंदणी आहे. यंदा 37 तृतीयपंथी विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. प्रत्येक परीक्षा केद्रांवर बैठे पथक असणार आहे. तसेच ड्रोनची नजरही असेल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडाळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गोसावी म्हणाले, विज्ञान शाखेला ७ लाख ६८ हजार ९६७ विद्यार्थी, कला शाखेला तीन लाख ८० हजार ४१० विद्यार्थी, वाणिज्य शाखेला तीन लाख १९ हजार ४३९ विद्यार्थी तर किमान कौशल्य आधारित अभ्यासक्रम ३१ हजार ७३५ विद्यार्थी आहेत. टेक्निकल सायन्स ४ हजार ४८६ असे एकूण १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थी यंदा परीक्षा देणार आहेत. पुणे, नागपूर, संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळात ही परीक्षा होणार आहे.
राज्यात 271 भरारी पथके
परीक्षा काळात संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा या दृष्टीने मंडळामार्फत संपूर्ण राज्यात 271 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. याशिवाय दक्षता समिती कार्यरत असून विभागीय मंडळात विशेष भरारी पदके स्थापन करण्यात आली आहेत. मंडळाने निर्धारित केलेल्या कालावधीत विद्यार्थी, वैद्यकीय कारणास्तव प्रत्यक्ष तोंडी परीक्षा प्रकल्प व इतर परीक्षा देऊ न शकल्यास अशा विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेनंतर १२,१५,१७ मार्च रोजी आऊट ऑफ टर्न आयोजित करण्यात आलेले आहे.
पंतप्रधान मोदींकडून मोलाचा सल्ला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाद्वारे देशभरातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. हा कार्यक्रम दिल्लीतील प्रगती मैदान येथील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान बोर्डाच्या परीक्षेपूर्वीचा ताण आणि भीती कमी करण्यासाठी पंतप्रधान मोदी आठव्यांदा विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी परीक्षांबद्दल संवाद साधला. यावेळी मोदींनी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याशिवाय मोदींनी मुलांना गणित कसे हाताळायचे याचे तंत्र देखील शिकवले.
परीक्षा केंद्राजवळ ड्रोन कॅमेराद्वारे नजर
परीक्षा केंद्राजवळ ड्रोन कॅमेराद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रत्येक ब्लॉकमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार आहे. तसेच नियंत्रण कक्षामधून प्रत्येक ब्लॉकवर झूम ऍपद्वारे लक्ष राहणार आहे. या परीक्षा केंद्रासाठी 6 भरारी पथक नेमण्यात आली असून, प्रत्येक केंद्रावर बैठे पथक देखील तैनात राहणार आहे. कॉपीमुक्त अभियानासाठी पोलीस प्रशासन व इतर विभागाचे देखील मदत घेण्यात येणार आहे. 12 वीच्या परीक्षेसाठी नंदुरबार जिल्ह्यात जवळपास 17 हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा भयमुक्त वातावरणात व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाने संपूर्ण तयारी केली केली असल्याची माहिती नंदुरबारचे शिक्षणाधिकारी संतोष अहिरे यांनी दिली.
हेदेखील वाचा : बृहन्मुंबई महानगरपालिकेला उमेदवारांची मागणी; पुर्वानुभव नको! केंद्रांबद्दल तक्रार