पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांसाठी दिल्या खास टिप्स (फोटो सौजन्य-X)
Pariksha Pe Charcha 2025 News Marathi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाद्वारे देशभरातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. हा कार्यक्रम दिल्लीतील प्रगती मैदान येथील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान बोर्डाच्या परीक्षेपूर्वीचा ताण आणि भीती कमी करण्यासाठी पंतप्रधान मोदी आठव्यांदा विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी परीक्षांबद्दल संवाद साधला. यावेळी मोदींनी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याशिवाय मोदींनी मुलांना गणित कसे हाताळायचे याचे तंत्र देखील शिकवले.
गेल्या आठ वर्षांपासून ‘परीक्षा पे चर्चा’ हा उपक्रम केंद्र सरकारकडून राबवला जात आहे. त्यांतर्गत पीएम मोदी स्वतः विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना करिअरच्या वाटेवरील महत्त्वाच्या परीक्षेमधील अभ्यास प्रक्रिया, अडचणी, ताणतणाव व्यवस्थापन आणि यश या संदर्भात मार्गदर्शन करतात. यावेळी मोदींनी पालकांना सल्ला देताना सांगितले की, पालकांना माझा सल्ला असा आहे की तुम्ही तुमच्या मुलाला सर्वत्र आदर्श म्हणून उभे करू नका. प्रत्येक मूल वेगवेगळ्या क्षेत्रात चांगले असतो. सचिन तेंडुलकर जसा खेळात आहे, अभ्यासात नाही. एकदा मला विचारण्यात आले की जर तुम्ही पंतप्रधान नसता आणि मंत्री असता तर तुम्ही कोणते खाते निवडले असते. यावर पंतप्रधान म्हणाले की मी कौशल्य विभाग निवडेन कारण कौशल्य खूप महत्वाचे आहे. पालकांनीही त्यांच्या मुलांच्या कौशल्यांकडे लक्ष दिले पाहिजे.
अभ्यासासोबतच आराम करण्याचीही गरज असल्याचे पंतप्रधान म्हणाले. तुमच्या पालकांना समजावून सांगा की आपल्याला रोबोटसारखे जगण्याची गरज नाही, आपण माणसे आहोत. मुले प्रगती करू शकत नसल्यामुळे ते पुस्तकांपुरते मर्यादित राहतील. त्यांना मोकळे आकाश हवे आहे आणि त्यांनी त्यांच्या आवडीच्या गोष्टी कराव्यात.
Had a wonderful interaction with young students on different aspects of stress-free exams. Do watch Pariksha Pe Charcha. #PPC2025. https://t.co/WE6Y0GCmm7
— Narendra Modi (@narendramodi) February 10, 2025
अनेक विद्यार्थ्यांना वारंवार प्रयत्न करून एखाद्या क्षेत्रात यश मिळत नाहीत, यावर बोलतान PM म्हणाले, तुम्ही तुमच्यातील वेगळेपणे शोधले पाहिजे. जे काम करताना तुम्हाला आनंद मिळतो. ते काम तुम्ही केले पाहिजे. आणि त्या क्षेत्रात प्राविण्य मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक विशेष प्रतिभा असते. अभ्यासात कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये इतर काही लपलेली प्रतिभा असण्याची शक्यता आहे. शिक्षकांनी ती प्रतिभा ओळखून तिला प्रोत्साहन दिले पाहिजे.
परीक्षेदरम्यान मन शांत कसे ठेवावे याबद्दल पंतप्रधान म्हणाले की याचा अर्थ असा की तुम्ही स्वतःला ओळखत नाही. सगळी मुलं असं बोलतात की, मी काल अभ्यास करू शकलो नाही. काल माझा मूड चांगला नव्हता. जर तुम्ही हे वारंवार म्हणत राहिलात तर तुमचे मन कसे शांत राहील? तुम्ही जे करत आहात त्यावर लक्ष केंद्रित करा.
परीक्षांबद्दल चर्चा करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलांना ध्यानधारणेचे फायदे सांगितले. या सत्रादरम्यान, त्यांनी सर्व मुलांना एकाच ठिकाणी एकत्र केले आणि त्यांना ध्यान शिकवले.पालकांनी त्यांच्या मुलांना आदर्श बनवू नये. त्याचे कौशल्य आणि खासियत समजून घेतली पाहिजे. जर एखादा मुलगा अभ्यासात चांगला नसेल तर त्याची ताकद दुसरीकडेच असेल. पालकांनी ती गोष्ट समजून घेतली पाहिजे.
परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात, पंतप्रधान नरेंद्र मोदी बोर्डाच्या परीक्षेपूर्वी ताण कमी करण्यासाठी आणि परीक्षेत सर्वोत्तम गुण मिळविण्यासाठी मुलांना टिप्स दिल्या आहेत, या कार्यक्रमात सर्व सहभागी मुलांना शिक्षण मंत्रालयाकडून एक विशेष परीक्षा चर्चा किट देखील दिली. याशिवाय, टॉप १० ‘वेटरन एक्झाम वॉरियर्स’ना पंतप्रधानांच्या निवासस्थानी भेट देण्याची विशेष संधी देखील दिली जाणार आहे.