Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारावीची परिक्षा २१ फेब्रुवारी तर दहावीची एक मार्चपासून; अधिकृत संकेतस्थळावर वेळापत्रक उपलब्ध

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा एक मार्चपासून सुरू होणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 29, 2023 | 07:32 AM
बारावीची परिक्षा २१ फेब्रुवारी तर दहावीची एक मार्चपासून; अधिकृत संकेतस्थळावर वेळापत्रक उपलब्ध
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा एक मार्चपासून सुरू होणार आहे.

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत दहावी-बारावीची लेखी परीक्षा घेण्यात येते. फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या परीक्षेचा कालावधी राज्य मंडळाने जाहीर केला आहे. त्यानुसार बारावीची (सर्वसाधारण, द्विलक्षी विषय आणि व्यवसाय अभ्यासक्रम) परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च २०२४ दरम्यान होणार आहे. तर दहावीची परीक्षा १ ते २२ मार्च २०२४ या कालावधीत आयोजित केली आहे.

व्हॉटसॲप किंवा तत्सम माध्यमातून आलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये

मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दहावी-बारावीच्या परीक्षेचे संभाव्य सविस्तर वेळापत्रक देण्यात आले आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करता यावे आणि विद्यार्थ्यांच्या मनावरील परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केल्याचे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले. मंडळाच्या संकेतस्थळावरील संभाव्य वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असणार आहे. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी आणि विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉटसॲप किंवा तत्सम माध्यमातून आलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन राज्य मंडळाने केले आहे.

प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्र्यपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येईल. या वेळापत्रकांबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे, तसेच राज्य मंडळाकडे १५ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात पाठवाव्यात. त्यानंतर आलेल्या सूचनांवर विचार केला जाणार नाही, असे ओक यांनी सांगितले आहे. सविस्तर वेळापत्रक पाहण्यासाठी संकेतस्थळ : www. mahahsscboard.in

Web Title: 12th exam from february 21 and 10th from march 1 timetable available on official website nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2023 | 07:32 AM

Topics:  

  • cmomaharashtra
  • hsc exam
  • maharashtra
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

महाराष्ट्राचे रिअल इस्टेट क्षेत्र नव्या उंचीवर! शहरी विकासाच्या पुढील टप्प्यासाठी राज्य सज्ज; राष्ट्रीय परिषदेत उमटला ठसा
1

महाराष्ट्राचे रिअल इस्टेट क्षेत्र नव्या उंचीवर! शहरी विकासाच्या पुढील टप्प्यासाठी राज्य सज्ज; राष्ट्रीय परिषदेत उमटला ठसा

HSC Exam 2026: बारावीच्या परीक्षेसाठी जिल्हा प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर! कॉपी केल्यास थेट जेल; संवेदनशील केंद्रांवर ड्रोनची नजर
2

HSC Exam 2026: बारावीच्या परीक्षेसाठी जिल्हा प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर! कॉपी केल्यास थेट जेल; संवेदनशील केंद्रांवर ड्रोनची नजर

Chandrapur News: चंद्रपुरात राजकारण तापलं! महापौरपदासाठी दोन्ही पक्षात वर्चस्वाची लढाई; कोणाची सत्ता स्थापन होणार?
3

Chandrapur News: चंद्रपुरात राजकारण तापलं! महापौरपदासाठी दोन्ही पक्षात वर्चस्वाची लढाई; कोणाची सत्ता स्थापन होणार?

मावळ तालुक्यात शांततेत मतदान; सकाळी 11.30 वाजेपर्यंत 24.45 टक्के मतदानाची नोंद
4

मावळ तालुक्यात शांततेत मतदान; सकाळी 11.30 वाजेपर्यंत 24.45 टक्के मतदानाची नोंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.