Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: चंद्रपुरात राजकारण तापलं! महापौरपदासाठी दोन्ही पक्षात वर्चस्वाची लढाई; कोणाची सत्ता स्थापन होणार?

चंद्रपूर महानगर पालिकेसाठी काँग्रेसचे विधिमंडळ नेते आ. विजय वडेट्टीवार व खा. धानोरकर यांच्यातील वर्चस्वाची लढाई आहे. प्रचाराची धुरा दोन्ही पक्षातील नेत्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने सांभाळली.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 07, 2026 | 03:03 PM
Chandrapur News: चंद्रपुरात राजकारण तापलं! महापौरपदासाठी दोन्ही पक्षात वर्चस्वाची लढाई; कोणाची सत्ता स्थापन होणार?

Chandrapur News: चंद्रपुरात राजकारण तापलं! महापौरपदासाठी दोन्ही पक्षात वर्चस्वाची लढाई; कोणाची सत्ता स्थापन होणार?

Follow Us
Follow Us:
  • दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये वर्चस्वाची लढाई
  • ‘कोळसा खाण’ अशी ओळख असलेल्या शहराचा महापौर कोण?
  • प्रचाराची धुरा दोन्ही पक्षातील नेत्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने सांभाळली
चंद्रपूर: महानगर पालिकेची निवडणूक ही दोन्ही पक्षांतील नेत्यांच्या वर्चस्वाची लढाई बनलेली आहे. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतरही कोणता पक्ष सत्ता स्थापन करणार अद्याप स्पष्ट झालेले नाही. दोन्ही पक्षात उमेदवारी, एबी फार्म वाटपापासून सुरू झालेला वाद महापौर पदाचे नामांकन दाखल झाल्यानंतरही संपलेला नाही. त्यामुळे ‘कोळसा खाण’ अशी ओळख असलेल्या शहराचा महापौर नेत्यांच्या वर्चस्वाच्या लढाईत तापूण निघणार, अशा चर्चा आता शहरात रंगू लागलेल्या आहेत.

फुलकिडीमुळे आंबा बागायतदार चिंतेत; शेतकऱ्यांची नितेश राणेंकडे ‘ही’ मागणी

चंद्रपूर महानगर पालिकेसाठी काँग्रेसचे विधिमंडळ नेते आ. विजय वडेट्टीवार व खा. धानोरकर यांच्यातील वर्चस्वाची लढाई आहे. तर भाजपमध्ये माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी आ. किशोर जोरगेवार यांच्यावर मात करण्याची लढाई बनलेली आहे. सुरूवातीला दोन्ही पक्षांमध्ये उमेदवारी वाटपापासून सत्तासंघर्षाची लढाई सुरू झाली. धानोरकर यांनी वडेट्टीवार यांच्या समर्थकांचे तिकीट कापले. तर जोरगेवार यांनी मुनगंटीवार यांच्या निकटवर्तीयांना तिकीट नाकारले. (फोटो सौजन्य – AI Created) 

प्रचाराची धुराही दोन्ही पक्षातील नेत्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने सांभाळली. मात्र, निकाल लागल्यानंतर भाजप आघाडीला २४ तर काँग्रेस आघाडीला ३० जागा मिळाल्या. श्रेय घेऊन झाले नाही, तर गटनोंदणीसाठी काँग्रेसमध्ये वाद पेटला. सुरेंद्र अडबाले यांना गटनेता केल्याने वडेट्टीवार समर्थकांनी विरोध करत थेट न्यायालयापर्यंत मजल मारली.

अखेर राजेश अडूर यांना गटनेता म्हणून मान्यता देण्यात आली. वाद येथेचे थांबलेले नाही तर काँग्रेसमध्ये धानोकर यांच्या गटाला महापौरपद तर वडेट्टीवार यांच्या गटाला उपमहापौरपद देण्याचे ठरले. असे असतानाही वडेट्टीवार समर्थकांनी महापौर पदासाठी नामांकन दाखल केले नाही. मात्र, धानोरकर समर्थक नगरसेवकाने उपमहापौर पदासाठी नामांकन दाखल केले, तर भाजपमध्ये महापौरपद मुनगंटीवार समर्थक नगरसेवकाला देण्याचे निश्चित झालेले असताना जोरगेवार समर्थक नगरसेवकाने महापौर पदासाठी नामांकन दाखल केल्याने पुन्हा वादाची ठिणगी पडलेली आहे. महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक मंगळवारी (दि. १०) होणार आहे. निवडणुकीअंती कोण सत्ता स्थापन करणार? कोण महापौर बनणार? हे प्रश्न कायम असले तरी महापौर हा सत्तासंघर्षांच्या लढाईत तापून निघणार, हे मात्र नक्की.

BMC Politics : मुंबईमध्ये शरद पवारांनी फिरवली भाकरी; राष्ट्रवादीने ठाकरे बंधूंना सोडून दिली महायुतीला साथ

मित्रपक्ष कोणाच्या बाजूने ?

चंद्रपूरात उबाठा आघाडीकडे उबाठाचे ६, वंचित २, अपक्ष २ असे १० नगरसेवक आहेत. तर एमआयएमचा १ पकडून जनविकास सेनेच्या आघाडीकडे ४ असे संख्याबळ आहे. या दोन्ही पक्षांची काँग्रेसला समर्थन देण्याची ईच्छा असली तरी काँग्रेसमधील अंतर्गत वादामुळे समर्थन द्यावे, की नाही. याबाबत दोन्ही आघाडीच्या गटामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. मात्र, भाजपकडून उबाठाला महापौरपद दिल्यास समर्थन देण्याची तयारी जिल्हाप्रमुख संदीप गिन्हे यांनी दर्शविलेली आहे.

Web Title: Chandrapur politics heats up power struggle between two parties for mayor post chandrapur news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 03:03 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Maharashtra Poitics
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप
1

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा
2

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा

‘मूक प्रेक्षकाची भूमिका घेऊ नका’;रखडलेल्या झोपु प्रकल्पांवर हायकोर्टाचे सरकारला कालबद्धतेचे निर्देश
3

‘मूक प्रेक्षकाची भूमिका घेऊ नका’;रखडलेल्या झोपु प्रकल्पांवर हायकोर्टाचे सरकारला कालबद्धतेचे निर्देश

Chandrapur News: चंद्रपूरच्या 12 तालुक्यांत दुष्काळ; शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती, वीजबिलातही सवलत
4

Chandrapur News: चंद्रपूरच्या 12 तालुक्यांत दुष्काळ; शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती, वीजबिलातही सवलत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.