Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: आज कोणते शेअर्स देतील दमदार परतावा?

Maharashtra Breaking News- प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी तीन स्टॉक्सची शिफारस केली आहे. ज्यामध्ये हीरो मोटोकॉर्प, पाइन लॅब्स आणि एम अँड एम फायनान्शियल सर्व्हिसेस यांचा समावेश आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 16, 2026 | 10:45 AM
LIVE
Maharashtra Breaking News Updates Today:

Maharashtra Breaking News Updates Today:

Follow Us
Follow Us:
  • 16 Jun 2026 10:55 AM (IST)

    16 Jun 2026 10:55 AM (IST)

    मालकासमोरुन दुकानातील ८ कोटींचे दागिने लंपास, Video Viral

    व्हायरल व्हिडिओत केलेल्या दाव्यानुसार, दुकान मालक झोपेत असताना चोराने या सुवर्णसंधीचा फायदा घेतला आणि तब्बल ५ किलो सोने आणि १२ किलोची चांदी लंपास केली. आताच्या काळात सोन्याचे दर झपाट्याने वाढत असताना या दागिन्यांचे मूल्य कोट्यवधींच्या घरात जाते. माहितीनुसार, दुकानातून चोरी केलेल्या या दागिन्यांची किंमत ८ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. तथापि, याची पुष्टी अद्याप झाली नाही. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात दिसते की, मालक पाय पसरुन निवांत झोपत असताना एक वाटसरु दुकानातील काचेच्या पेटीत अलगद हात घालतो आणि तिथून एक बॅग हळूच काढून घेतो.

     

  • 16 Jun 2026 10:45 AM (IST)

    16 Jun 2026 10:45 AM (IST)

    नागपुरात पेपरफुटीविरोधात आज तरुणांचे भव्य आंदोलन

    सीजेपीच्या आंदोलनासाठी  नागपूर पोलिसह सज्ज झाले आहेत. संपूर्ण शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  4 डीसीपी, 3 एसीपी, 18 पोलिस निरीक्षक, 45 एपीआय आणि उपनिरीक्षक, 470 पुरुष आणि 170 महिला पोलिस कर्मचारी  या आंदोलनासाठी तैनात करण्यात आल्याची माहिती आहे. याशिवाय नागपुर पोलिसांकडून दोन दंगल नियंत्रण पथकेही स्टॅंडबायवर ठेवण्यात आली आहेत. “शहराची कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याच्या कोणत्याही प्रयत्नावर कठोर कारवाई केली जाईल,” असा इशाराही पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंग यांनी दिला आहे.
  • 16 Jun 2026 10:35 AM (IST)

    16 Jun 2026 10:35 AM (IST)

    US-Iran करारावरुन संतापले इस्रायली पंतप्रधान

    US-Iran Peace Deal News in Marathi : गेल्या चार महिन्यांपासून मध्यपूर्वेत सुरु असलेल्या तणाव कमी करण्यासाठी  शांतता करारावर सहमती झाल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी येत्या आठवड्यात जिनिव्हा येथे अमेरिका-इराण करारावर स्वाक्षरी करतील अशी घोषणा केली. तसेच त्यांनी होर्मुझ सामुद्रधुनी देखील पुन्हा सुरु केली असल्याचे म्हटले. यामुळे जगाला मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, इस्रायलने या कराराला तीव्र विरोध केला आहे. यामुळे पुन्हा चिंता निर्माण झाली आहे.

  • 16 Jun 2026 10:25 AM (IST)

    16 Jun 2026 10:25 AM (IST)

    शंभूराज देसाईंचं मोठं विधान

    सातारा : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत नाशिक आणि सांगली-सातारा मतदारसंघांवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. विशेषतः सांगली-सातारा मतदारसंघातील महायुतीच्या भाजप उमेदवाराला पक्षांतर्गत विरोधाला सामोरे जावे लागू शकते. याचे कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने भाजप उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान निर्माण झालेला वाद शिवसेना नेते विसरलेले नाहीत. त्याचवेळी, कॅबिनेटमंत्री शंभूराज देसाई यांनी पुन्हा एकदा भाजपवर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

  • 16 Jun 2026 10:15 AM (IST)

    16 Jun 2026 10:15 AM (IST)

    शिक्षक आहे की हैवान? निर्दयीपणे चिमुकल्यांना केली बेदम मारहाण, Video Viral

    सध्या सोशल मिडियावर एका शाळेतील व्हिडिओ खूप जास्त व्हायरल होत आहे. यात एक निर्दयी शिक्षक वर्गातील काही लहान मुलांना मारहाण करताना दिसून आला. या मारहाणीमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी यातील दृष्यांनी मात्र यूजर्सचा संताप अनावर केला आहे. व्हिडिओमध्ये शिक्षक एका विद्यार्थीनीला एका मागून एक कानशिलात मारताना दिसतो. यानंतर तो तिला वर्गातील एक कोपऱ्यात जाऊन उभे राहण्यास सांगतो. मुलगी मागे जात असतानाच तो दुसऱ्या विद्यार्थीनीजवळ जातो आणि तिलाही कानशिलात मारतो, एकदा नाही तर दोनदा. शिक्षकाची ही मारहाण पाहून इतर विद्यार्थीही घाबरताना दिसतात. सर्व मुले इतके लहान असतात की विरोध करण्याचे बळ त्यांच्यात नसते.

  • 16 Jun 2026 10:05 AM (IST)

    16 Jun 2026 10:05 AM (IST)

    नागरी सेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर

    UPSC Prelims Result 2026: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) सोमवारी नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२६ (Civil Services Preliminary Examination 2026) चा निकाल जाहीर केला आहे. यंदा या परीक्षेतून एकूण १३,३४३ उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. ही पूर्व परीक्षा २४ मे २०२६ रोजी देशात घेण्यात आली होती.

  • 16 Jun 2026 09:50 AM (IST)

    16 Jun 2026 09:50 AM (IST)

    ‘झी मराठी’ने उलगडलं ‘इच्छाधारी नागीण’चं रहस्य

    काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाहने मी कात टाकली या मालिकेची घोषणा केली होती. या मालिकेच्या घोषणनेंतर झी मराठीने साधारण वर्षभरापूर्वी घोषणा केलेल्या इच्छाधारी नागीण मालिकेचा मुहूर्त नुकताच पार पडला असून, मालिकेचा नवा प्रोमोही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दोन्ही मालिकांच्या टीझर्सवरून कथानकात ‘नागीण’ हा समान धागा असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या दोन मालिकांबाबत उत्सुकता वाढली आहे.

  • 16 Jun 2026 09:40 AM (IST)

    16 Jun 2026 09:40 AM (IST)

    EA Sports UFC 6 चा फ्री ट्रायल सुरू

    ईए स्पोर्ट्सने त्यांच्या नवीन फायटिंग गेम यूएफएस 6 च्या अर्ली एक्सेसचा ट्रायल सुरू केला आहे. कंपनीने सुरू केलेले ही ट्रायल सध्या EA Play मेंबरशिप असलेल्या प्लेअर्ससाठी उपलब्ध आहे. या ट्रायलमध्ये गेम अधिकृतपणे रिलीज होण्यापूर्वी प्लेअर्स त्याचा अनुभव घेऊ शकणार आहेत. EA ने दिलेल्या माहितीनुसार, ट्रायलदरम्यान प्लेयर्सना यूएफएस 6 खेळण्यासाठी एकूण 10 तासांचा कालावधी मिळणार आहे. यामुळे प्लेयर्सना आगामी गेममधील नवीन फीचर्स, फाइटिंग सिस्टम आणि गेमप्ले जवळून समजण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजेच ट्रायलदरम्यान प्लेअर्सनी केलेले प्रोग्रेस गेम खरेदी केल्यानंतर देखील सेव्ह राहणार आहे. यामुळे प्लेअर्सना सुरुवातीपासून गेम खेळण्याची गरज नाही.

  • 16 Jun 2026 09:30 AM (IST)

    16 Jun 2026 09:30 AM (IST)

    आज कोणते शेअर्स देतील दमदार परतावा?

    प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी तीन स्टॉक्सची शिफारस केली आहे. ज्यामध्ये हीरो मोटोकॉर्प, पाइन लॅब्स आणि एम अँड एम फायनान्शियल सर्व्हिसेस यांचा समावेश आहे. आजच्या व्यवहारात भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार एचसीएल टेक्नॉलॉजीज, भारतीय सामान्य विमा महामंडळ, स्टेट बँक ऑफ इंडिया, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस, तेल भारत, येस बँक, अदानी एंटरप्रायझेस, क्राफ्ट्समन ऑटोमेशन, देवयानी इंटरनॅशनल, बंधन बँक या शेअर्सवर त्यांचे लक्ष केंद्रीत करू शकतात.

  • 16 Jun 2026 09:19 AM (IST)

    16 Jun 2026 09:19 AM (IST)

    सोन्याच्या दरांनी पुन्हा घेतली झेप, चांदीही वधारली!

    भारतात 16 जून रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 15,154 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,891 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,366 रुपये आहे. भारतात 16 जून रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,38,910 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,51,540 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,13,660 रुपये आहे. भारतात 16 जून रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 265.10 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,65,100 रुपये आहे.

  • 16 Jun 2026 09:04 AM (IST)

    16 Jun 2026 09:04 AM (IST)

    Mumbai Water Crisis, Monsoon Delay: पुढील आठवड्यापासून २० टक्के पाणी कपातीची शक्यता

    मुंबई: जून महिना अर्धा संपत आला तरी राज्यात मान्सूनचे अद्याप आगमन न झाल्याने मुंबईकरांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे; त्यातच आता मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सद्यस्थितीत केवळ १० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. या पार्श्वभूमीवर, पाऊस लांबल्यामुळे निर्माण झालेले पाणीटंचाईचे संकट पाहता, मुंबई महानगरपालिका पुढील आठवड्यापासून शहरात २० टक्के पाणी कपात करण्याचा विचार करत आहे. सध्या मुंबईत अनेक ठिकाणी आधीच १० टक्के पाणी कपात लागू आहे, मात्र धरणक्षेत्रातील चिंताजनक साठा लक्षात घेता पालिका प्रशासन यामध्ये आणखी १० टक्के वाढ करून ती २० टक्के करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

  • 16 Jun 2026 09:03 AM (IST)

    16 Jun 2026 09:03 AM (IST)

    India A Defeat: वैभव सूर्यवंशीची श्रीलंकन खेळाडूंसोबत बाचाबाची

    India A Defeat: श्रीलंकेत सुरू असलेल्या तिरंगी क्रिकेट मालिकेत भारतीय अ संघाला श्रीलंका अ विरुद्धच्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये ८ धावांनी पराभवाचा धक्का बसला असून, स्पर्धेतील या सलग दुसऱ्या पराभवामुळे टीम इंडियाचा अंतिम फेरी गाठण्याचा मार्ग आता अधिक खडतर झाला आहे. दोन्ही संघांनी निर्धारित ५० षटकांत २६५ धावा केल्याने सामना टाय झाला, ज्यानंतर सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेने उभारलेल्या १६ धावांच्या प्रत्युत्तरात भारताचे सलामीवीर वैभव सूर्यवंशी आणि सूर्यांश शेडगे केवळ ९ धावांपर्यंतच मजल मारू शकले. हाय-व्होल्टेज ठरलेला हा सामना मैदानातील खराब प्रकाश, वादग्रस्त पंचगिरी (अंपायरिंग) आणि भारताच्या वैभव सूर्यवंशीची श्रीलंकन खेळाडूंसोबत झालेली बाचाबाची व धक्काबुक्की यामुळे प्रचंड वादग्रस्त ठरला.

  • 16 Jun 2026 08:55 AM (IST)

    16 Jun 2026 08:55 AM (IST)

    Fuel Price Hike India: अमेरिका-इराण शांतता कराराने जागतिक बाजारात कच्चे तेल घसरले 

    Fuel Price Hike India: अमेरिका आणि इराण यांच्यातील प्रदीर्घ लष्करी संघर्ष आणि युद्ध अखेर शांतता कराराने संपुष्टात आले आहे. या सकारात्मक घडामोडीमुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण नोंदवली गेली आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर दिलासा मिळत असतानाच, देशांतर्गत बाजारात मात्र केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेला इंधन दरवाढीचा आणखी एक मोठा दणका दिला आहे.

    जागतिक बाजारात घसरण, होर्मुझ खाडी पूर्ववत युद्धकाळात इराणने जागतिक व्यापारासाठी महत्त्वाची असलेली 'होर्मुझ खाडी' पूर्णपणे बंद केली होती, ज्यामुळे जगभरात एलपीजी (LPG) आणि कच्च्या तेलाचा (Crude Oil) तीव्र तुटवडा निर्माण झाला होता आणि किमती सातत्याने वाढत होत्या.

Maharashtra to National And International Breaking News:

Share Market Today: आज कोणते शेअर्स देतील दमदार परतावा? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

India Share Market Update: जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांचा विचार करता आज १६ जून रोजी मंगळवारी भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, संथ गतीने उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची सुरुवात सपाट असल्याचे दर्शवतात. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजपेक्षा जवळपास १५ पॉइंट्सच्या प्रीमियमवर, सुमारे २३,९३२ च्या पातळीवर व्यवहार करत होता.

Web Title: 16th june2026 live breaking news marathi maharashtra politics national international politics crime sports gold silver price oil price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 08:46 AM

Topics:  

  • international news
  • Maharashtra Breaking News update
  • national news
  • share market

संबंधित बातम्या

Share Market Today:  आज कोणते शेअर्स देतील दमदार परतावा? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
1

Share Market Today: आज कोणते शेअर्स देतील दमदार परतावा? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

फक्त 15 दिवस… काळा पैसा भारतात परतणार! परदेशात जमा मालमत्तेवर सरकार नियम आणण्याच्या तयारीत
2

फक्त 15 दिवस… काळा पैसा भारतात परतणार! परदेशात जमा मालमत्तेवर सरकार नियम आणण्याच्या तयारीत

लॉटरी लागली रे… गुंतवणूकदार झटक्यात मालामाल, ‘या’ कंपनीने 1 शेअर बदल्यात दिले 4 मोफत शेअर्स, आज झाली धमाकेदार लिस्टिंग
3

लॉटरी लागली रे… गुंतवणूकदार झटक्यात मालामाल, ‘या’ कंपनीने 1 शेअर बदल्यात दिले 4 मोफत शेअर्स, आज झाली धमाकेदार लिस्टिंग

ट्रम्प यांच्या एका घोषणेने शेअर बाजार सुसाट… ‘या’ 10 शेअर्सचा मार्केटमध्ये धुमाकुळ; गुंतवणूकदारांची बल्लेबल्ले
4

ट्रम्प यांच्या एका घोषणेने शेअर बाजार सुसाट… ‘या’ 10 शेअर्सचा मार्केटमध्ये धुमाकुळ; गुंतवणूकदारांची बल्लेबल्ले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.