
19 independents withdraw from Vadgaon Nagar Panchayat elections Local Body Elections 2025
Maharashtra Local Body Elections : वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये आज (दि. २१ नोव्हेंबर) उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिवस पार पडला. नगरसेवक पदासाठी रिंगणात असलेल्या ६४ उमेदवारांपैकी शेवटच्या क्षणापर्यंत चाललेल्या चर्चेनंतर १९ अपक्ष उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. तर नगराध्यक्ष पदासाठी ५ उमेदवार रिंगणात होते, त्यापैकी सुनंदा गुलाब म्हाळसकर यांनी माघार घेतल्याने आता ४ उमेदवार रिंगणात आहेत, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा तेलभाते यांनी दिली.
माघारीनंतर आता नगरसेवक पदासाठी ४५ उमेदवार रिंगणात आहेत. काही प्रभागांत सरळ लढतीची शक्यता तर काही प्रभागांत बहुकोनी मुकाबला अधिक चुरशीचा होणार आहे. या घडामोडींनी राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल निर्माण करण्याची चिन्हे दिसत आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात असलेले उमेदवार
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नगराध्यक्षपदासाठी ‘म्हाळसकर विरुद्ध ढोरे’ ?
नगराध्यक्ष पद महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने प्रमुख राजकीय घराण्यांची प्रतिष्ठा या पदावर लागणार आहे.म्हाळसकर कुटुंबातील मृणाल गुलाबराव म्हाळसकर (२ अर्ज), सुनंदा गुलाबराव म्हाळसकर, सायली रुपेश म्हाळसकर या तिघींनी दाखल केलेल्या अर्जांमुळे घराण्यातील अंतर्गत शक्तीपरीक्षेची चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर रंगली आहे.
मतदार जनजागृती जोमदार — SVEEP उपक्रम रंगात
मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी नगरपंचायतीने SVEEP मोहिमेला मोठा वेग दिला आहे. LED स्क्रीन व्हॅन, विद्यार्थी प्रतिज्ञा, गर्दीच्या ठिकाणी जनजागृती यामुळे शहरभर निवडणुकीचे वातावरण भारावून गेले आहे.