Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wadgaon Maval : वडगाव नगरपंचायतीची प्रशासकीय आढावा बैठक; आमदार सुनिल शेळकेंची अधिकाऱ्यांना कडक ताकीद

वडगाव मावळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी वडगाव नगरपंचायतीची प्रशासकीय आढावा बैठक शुक्रवार, दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 21, 2026 | 05:47 PM
वडगाव नगरपंचायतीची प्रशासकीय आढावा बैठक; आमदार सुनिल शेळकेंची अधिकाऱ्यांना कडक ताकीद

वडगाव नगरपंचायतीची प्रशासकीय आढावा बैठक; आमदार सुनिल शेळकेंची अधिकाऱ्यांना कडक ताकीद

Follow Us
Close
Follow Us:
  • वडगाव नगरपंचायतीची प्रशासकीय आढावा बैठक
  • आमदार सुनिल शेळकेंची अधिकाऱ्यांना कडक ताकीद
  • विकासकामांना गती देण्याचे निर्देश
वडगाव मावळ : वडगाव मावळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी वडगाव नगरपंचायतीची प्रशासकीय आढावा बैठक शुक्रवार, दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडली. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली व नगराध्यक्षा अबोली मयूर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम, सर्व नगरसेवक-नगरसेविका व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. बैठकीत शहरातील विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

 

शहरातील ४० कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजनेचे सुमारे ६० टक्के काम पूर्ण झाले असून, कामाच्या गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त करण्यात आले. ही योजना वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या तसेच शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छतेच्या कामात सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सुरू असलेल्या विकासकामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड न करण्याची कडक ताकीद संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदारांना देण्यात आली.

विकासकामांना गती देण्याचे निर्देश

बैठकीत बाजारपेठेतील मुख्य रस्ता रुंदीकरण न करण्याबाबत भूमिका मांडण्यात आली. जैन मंदिर येथील आरक्षण तत्काळ काढणे, महिला व बालकल्याण विभागामार्फत महिला सक्षमीकरणासाठी निधी उपलब्ध करणे, दत्त मंदिर परिसरात अभ्यासिका उभारणे तसेच ‘नमो उद्यान’ अंतर्गत शहरातील मोकळ्या जागांचे व नव्या उद्यानांचे सुशोभीकरण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

याशिवाय वैकुंठरथ व्यवस्था, बसस्टॉप दुरुस्ती, ओपन जिम, भाजी मंडई उभारणी आणि शहरभर सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले. नागरी प्रश्नांवर चर्चा, शहरातील वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन, पार्किंगची समस्या, अतिक्रमणे आणि कातवी येथील स्मशानभूमीचा प्रश्न यावर सविस्तर चर्चा झाली. या समस्यांवर तातडीने पर्याय शोधून कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच शहरात हॉकर्स झोन निर्माण करणे, प्रमुख चौकांचे सुशोभीकरण, क्रीडांगण व अद्ययावत गार्डन उभारणे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘नाना-नानी पार्क’ तयार करण्यासाठी तात्काळ सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

शहराचा सुनियोजित विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असून, नागरिकांच्या सोयी-सुविधांना प्राधान्य दिले जाईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. बैठकीस आमदार सुनील शेळके, नगराध्यक्षा अबोली ढोरे, मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम नगरसेवक पंढरीनाथ ढोरे, अनंता कुडे दिनेश ढोरे, संदीप म्हाळसकर विशाल वहिले, गणेश म्हाळसकर अजय म्हाळसकर मंगेश धडवले,अर्चना म्हाळसकर, सुनिता ढोरे माया चव्हाण, पुनम भोसले, रूपाली ढोरे ,राणी म्हाळसकर, सारिका चव्हाण, वैशाली सोनवणे अजय भवार,आकांक्षा वाघवले, यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा : राहुल गांधी भाजपच्या धमक्यांना घाबरत नाहीत, जिवाला धोका असतानाही…; हर्षवर्धन सपकाळांनी ठणकावून सागितलं

Web Title: Mla sunil shelke has given important instructions to the officials of vadgaon nagar panchayat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 05:47 PM

Topics:  

  • maval news
  • Ncp Mla
  • Sunil Shelke

संबंधित बातम्या

Maval SSC Exam: दहावीच्या परीक्षेसाठी मावळ सज्ज! २३६९ विद्यार्थ्यांना ‘घर ते परीक्षा केंद्र’ मोफत पिक-अप आणि ड्रॉप सुविधा
1

Maval SSC Exam: दहावीच्या परीक्षेसाठी मावळ सज्ज! २३६९ विद्यार्थ्यांना ‘घर ते परीक्षा केंद्र’ मोफत पिक-अप आणि ड्रॉप सुविधा

Crime News : मावळात बनावट कागदपत्रे तयार करून खरेदी-नोंदणीचा प्रयत्न; दहा जणांवर गुन्हा, पाच जणांना अटक
2

Crime News : मावळात बनावट कागदपत्रे तयार करून खरेदी-नोंदणीचा प्रयत्न; दहा जणांवर गुन्हा, पाच जणांना अटक

मावळ भूमी अभिलेख कार्यालयात अधिकारीच नाहीत; जागेवर फक्त खुर्च्या असल्याने नागरिकांचा मनस्ताप वाढला
3

मावळ भूमी अभिलेख कार्यालयात अधिकारीच नाहीत; जागेवर फक्त खुर्च्या असल्याने नागरिकांचा मनस्ताप वाढला

Maharashtra Politics: महायुतीत मिठाचा खडा? “आरोप सिद्ध करा, नाहीतर…”; भेगडेंचा शेळकेंना इशारा
4

Maharashtra Politics: महायुतीत मिठाचा खडा? “आरोप सिद्ध करा, नाहीतर…”; भेगडेंचा शेळकेंना इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.