Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News : मावळात बनावट कागदपत्रे तयार करून खरेदी-नोंदणीचा प्रयत्न; दहा जणांवर गुन्हा, पाच जणांना अटक

मावळ तालुक्यातील कुरवंडे येथील जमिनीबाबत बनावट कागदपत्रे तयार करून खरेदीखत नोंदणी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 20, 2026 | 05:41 PM
Case registered against ten people for attempting to register purchase by preparing fake documents in Maval

Case registered against ten people for attempting to register purchase by preparing fake documents in Maval

Follow Us
Follow Us:

वडगाव मावळ: सतिश गाडे प्रतिनिधी : पुणे-मुंबई या दोन महानगरांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मावळ तालुक्यात जमिनींचे दर झपाट्याने वाढल्याने जमीन व्यवहारांमध्ये गैरप्रकार वाढत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. (Maval News) मावळ तालुक्यातील कुरवंडे येथील जमिनीबाबत बनावट कागदपत्रे तयार करून खरेदीखत नोंदणी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. (Crime News)

या प्रकरणी हर्ष प्रविणचंद्र परमार (वय ४२, रा. गुलालवाडी, मुंबई) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादीनुसार, एकनाथ शंकर जांभुळकर, शैलेश सुरेश ओव्हाळ, शंकर भागोजी ओव्हाळ, अनिकेत ओव्हाळ, बुवा उर्फ गुलाब जाधव, ऋषिकेश ओव्हाळ (सर्व रा. कुरवंडे, ता. मावळ), गौतम सपकाळ (रा. खंडाळा, ता. मावळ), नासिर आरकटी (रा. लोणावळा), शेखर पाटील व एक अनोळखी व्यक्ती अशा दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा : राजकारणात कायमस्वरुपी काहीही नसतं…; राज ठाकरेंच्या सूचित वक्तव्याने चर्चांना उधाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हर्ष परमार यांचे वडील प्रवीणचंद्र परमार यांनी मावळ तालुक्यातील कुरवंडे येथे जमीन खरेदी केली होती. वडिलांच्या निधनानंतर काही व्यक्तींनी संगनमताने जुन्या स्टॅम्प पेपरचा गैरवापर करून गट क्रमांक २६७ या जागेचे बनावट खरेदीखत तयार केले. संबंधित दस्तऐवजावर खोट्या सह्या करून नोंदणी कार्यालयात शुल्क भरल्याचे भासविण्यात आले.

चालनाद्वारे फी भरल्याचे दाखवून दस्तऐवज वैध असल्याचा आभास निर्माण करून जमीन स्वतःच्या नावावर नोंद करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. हा प्रकार १ एप्रिल २०२५ ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

हे देखील वाचा : देशात बंधुता राखण्याची जबाबदारी राजकीय पक्षांची; सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांची महत्त्वपूर्ण टिप्पणी

या प्रकरणी पोलिसांनी एकनाथ जांभुळकर, शैलेश ओव्हाळ, ऋषिकेश ओव्हाळ, गौतम सपकाळ व नासिर आरकटी यांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जाधव करीत आहेत. पोलिसांकडून संबंधित कागदपत्रांची पडताळणी, स्वाक्षरी तज्ज्ञांमार्फत परीक्षण तसेच नोंदणी कार्यालयातील नोंदींची चौकशी सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला खुनाचा डाव

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने खूनाचा डाव उधळून लावत एका पिस्तूलधारी तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडे केलेल्या तपासानंतर त्याला तब्बल आठ जणांनी एकाची सुपारी दिल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल तसेच जिवंत काडतूसे जप्त केली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी चेतन उर्फ बाळ्या सिद्धनाथ जाधव (वय २६, रा. दांडेकर पूल, शंकर पवार यांच्या घराजवळ, सिंहगड रोड) या पिस्तूलधारी तरुणाला अटक केली आहे.

 

Web Title: Attempt to register purchase by creating fake documents in maval case registered against ten people

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 05:35 PM

Topics:  

  • crime news
  • maval news
  • Wadgaon Maval

संबंधित बातम्या

Pune Murder : भवानी पेठेत किरकोळ वादातून तरुणाची हत्या; डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून संपवलं
1

Pune Murder : भवानी पेठेत किरकोळ वादातून तरुणाची हत्या; डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून संपवलं

Crime News: मालमत्तेसाठी आधी सासरच्यांना मारहाण; सुटकेनंतर दोनच दिवसांत पत्नीची भररस्त्यात हत्या!
2

Crime News: मालमत्तेसाठी आधी सासरच्यांना मारहाण; सुटकेनंतर दोनच दिवसांत पत्नीची भररस्त्यात हत्या!

आठ महिन्यांची गर्भवती… दोन गुन्ह्यांत जामीन, आता पतीनेच मागितला घटस्फोट; निदा खानसमोर नवे संकट!
3

आठ महिन्यांची गर्भवती… दोन गुन्ह्यांत जामीन, आता पतीनेच मागितला घटस्फोट; निदा खानसमोर नवे संकट!

Crime News: दारूविक्रीविरोधात तक्रार केली अन् वारकऱ्याला बेदम मारहाण; पाय फ्रॅक्चर, भीतीपोटी गाव सोडण्याची वेळ!
4

Crime News: दारूविक्रीविरोधात तक्रार केली अन् वारकऱ्याला बेदम मारहाण; पाय फ्रॅक्चर, भीतीपोटी गाव सोडण्याची वेळ!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.