Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur News: सोलापूरच्या विकासाला ‘पाणी’ मिळणार! १३७८ कोटींच्या पाणीपुरवठा प्रकल्पाला मंजुरी

महापालिकेच्या वतीने १ मे महाराष्ट्र दिन आणि महापालिकेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. इंद्रभुवन येथे मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

  • By anuradha sagar
Updated On: May 02, 2026 | 05:28 PM
Solapur Municipal Corporation Employee Hike 2026

Solapur Municipal Corporation Employee Hike 2026

Follow Us
Follow Us:
  • सर्व कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ
  • सेविका आणि शिक्षिकांच्या मानधनात दरमहा ५०० रुपयांची वाढ
  • १२० कर्मचाऱ्यांना त्यांच्या अर्जित रजेच्या मोबदल्यात ४ कोटी रुपयांचे वितरण
 

Solapur News:  सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिका कटिबद्ध असून नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी विविध विकासकामांना गती देण्यात आली आहे. महाराष्ट्र दिन आणि सोलापूर महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त महापौर विनायक कोंड्याल यांनी कर्मचाऱ्यांसाठी ३ टक्के महागाई भत्ता वाढ, रोजंदारी कर्मचाऱ्यांना प्रतिदिन ५० रुपये वाढ, अंगणवाडी सेविका-शिक्षिकांना दरमहा ५०० रुपये वाढ तसेच १२० कर्मचाऱ्यांना सुमारे ४ कोटी रुपयांच्या अर्जित रजेच्या देयकांचे वितरण करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

Satara Politics: साताऱ्यात उसाच्या पैशावरून रणकंदन! ९ मे रोजी नितीन गडकरींना काळे झेंडे दाखवणार; 

महापालिकेच्या वतीने १ मे महाराष्ट्र दिन आणि महापालिकेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. इंद्रभुवन येथे मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, नगरसेवक विनोद भोसले, नगरसेविका कल्पना कदम, संगीता जाधव, नगरसेवक ज्ञानेश्वर माकल, महेश देवकर, नागेश खरात, पृथ्वीराज कोंड्याल, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, वीणा पवार, उपायुक्त आशिष लोकरे, उपायुक्त सोनाली यादव उपस्थित होते.

महापौर कोंड्याल म्हणाले की, सर्वसाधारण सभेत २०६० पर्यंतच्या गरजांचा विचार करून ‘सोलापूर सिटी वॉटर सप्लाय इंटरनल डिस्ट्रिब्युशन सिस्टम’ या सुमारे १३७८.४२ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे शहराला नियमित, पुरेशा दाबाने आणि न्याय्य पाणीपुरवठा सुनिश्चित होणार आहे. तसेच शहरातील विविध भागांमध्ये लागू असलेल्या ‘बी-२ सत्ता’ प्रकारासंदर्भातही शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Nasrapur Crime News: चिमुरडीवरील अत्याचारानंतर भोर तालुक्यात जनक्षोभ; पुणे-सातारा महामार्ग रोखला

पदोन्नती, वेतनवाढ आणि अनुकंपा नियुक्त्यांवर भर

महापालिकेने कर्मचाऱ्यांच्या कल्याणाला प्राधान्य देत पदोन्नती, वेतनवाढ आणि अनुकंपा नियुक्त्यांवर विशेष भर दिला आहे. वर्षभरात ४० अनुकंपा नियुक्त्या, ५५ जणांना जमादार पदोन्नती, १०८ जणांना कालबद्ध पदोन्नती देण्यात आली. तसेच लाड समितीतून ४५२ नियुक्त्या आणि ३४१ वर्ग-४ कर्मचाऱ्यांना १०-२०-३० योजनेचा लाभ देण्यात आला.

 

 

Web Title: 3 da hike for solapur gmc staff landmark 1378 crore water project approved

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 05:28 PM

Topics:  

  • Solapur Municipal Corporation
  • Solapur News
  • Solapur Politics

संबंधित बातम्या

Solapur News: देवस्थान की रंगमंच? कुंभारीच्या गेनसिद्ध महाराज मंदिरातील ‘त्या’ नृत्याचा व्हिडिओ व्हायरल; भाविकांमध्ये तीव्र संताप
1

Solapur News: देवस्थान की रंगमंच? कुंभारीच्या गेनसिद्ध महाराज मंदिरातील ‘त्या’ नृत्याचा व्हिडिओ व्हायरल; भाविकांमध्ये तीव्र संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.