मुंबई : मध्य रेल्वे (Central Railway) १० ते १२ फेब्रुवारी २०२३ रोजी मध्यरात्री ०२.०५ ते ०५.३५ या कालावधीत टिटवाळा आणि आसनगाव दरम्यान अप आणि डाऊन मार्गांवर (On up and down routes between Titwala and Asangaon) इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमधील (Electronic Interlocking) बदलासाठी चाचणीकरीता रात्रीचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक परिचालित करण्यात येणार आहे (Special night traffic and power block will be operated). ब्लॉकमुळे ट्रेन धावण्याच्या वेळा खालीलप्रमाणे असणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून ००.१५ वाजता सुटणारी कसारा उपनगरीय (लोकल) ठाणे येथे शॉर्ट टर्मिनेट होईल.
कसारा (Kasara) येथून ०३.५१ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीताची उपनगरीय (लोकल) ट्रेन ठाणे येथून चालेल.
खालील गाड्या आसनगाव, आटगाव, खर्डी, कसारा येथे ३५ मिनिटे ते ९५ मिनिटांपर्यंत नियमित केल्या जातील आणि वेळेपेक्षा उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.
ट्रेन क्रमांक 20104 गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस.
ट्रेन क्रमांक 11402 आदिलाबाद-मुंबई एक्सप्रेस
गाडी क्रमांक 12112 अमरावती – मुंबई एक्सप्रेस
गाडी क्रमांक 12106 गोंदिया – मुंबई एक्सप्रेस
गाडी क्रमांक 12112 अमरावती – मुंबई एक्सप्रेस
ट्रेन क्रमांक 17058 सिकंदराबाद- मुंबई एक्सप्रेस
ट्रेन क्रमांक 12618 निजामुद्दीन- एर्नाकुलम
ट्रेन क्रमांक 12138 फिरोजपूर – मुंबई पंजाब मेल
गाडी क्रमांक 12290 नागपूर – मुंबई एक्सप्रेस
ट्रेन क्रमांक 12102 शालीमार – मुंबई एक्सप्रेस
गाडी क्रमांक 12132 साईनगर शिर्डी – दादर एक्सप्रेस
ट्रेन क्रमांक 12545 रक्सौल- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस






