Rushing dumper crushed the woman! Gangadham Road incident; Traffic despite the ban on heavy vehicles
मुंबई : सध्या राज्यात अपघाताच्या (Accident) घटनांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. रोज कुठं ना कुठं अपघात झाल्याचं वृ्त्त ऐकायंला मिळतं. नुकतंच मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात (Mumba Pune Expressway Accident) झाल्याची माहिती समोर आलाी आहे. खोपोलीजवळ एका ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने ट्रकने समोर असलेल्या टेम्पो आणि एका कारला धडक दिली. या अपघातात कारमधील दोघांचा आणि ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे तर आठजण जखमी झाले आहेत. जखमींवर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
[read_also content=”‘कोलकाता ते न्यूयार्क’ सोपा नव्हता सब्यसाची मुखर्जीचा प्रवास; नैराश्य झेललं, आत्महत्येचा प्रयत्नही केला, अनेक अडचणींना पार करत कमवलं नाव! https://www.navarashtra.com/movies/sabyasachi-mukherjee-battel-with-financial-social-mental-difficulties-to-reach-met-gala-nrps-531115.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर हा अपघाता झाला आहे. पुण्याहून मुंबईला येताना ट्रकचा ब्रेक निकामी झला यावेळी चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटलं आणि ट्रकनं पुढं असलेल्या टेम्पो आणि कारला धडक दिली. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण गंभीर जखमी झाले आहे. या अपघाताची माहिती कळताच स्थानिकांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी अपघातस्थळावरुन जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केलं.
ट्रकची धडक एवढी जोरदार होती की, ओमनी कारमधील 2 जणांचा जागीच मृत्यू झाला, ओमनीमधील 3 जण जखमी झाले आहेत. तर या अपघातात ब्रेक फेल झालेल्या ट्रकच्या चालकाचाही मृत्यू झाला आहे. तसेच, ट्रकमधील 2 जण जखमी झाले आहेत. ट्रकची धडक ज्या टेम्पोला बसली, त्यातील 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. असे अपघातात एकूण 8 जण जखमी झाले आहेत. जखमींवर पनवेलच्या MGM रुग्णालयात उपचार सुरू आहेत.