Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तारीख ठरली! 31 वी ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन ‘या’ दिवशी होणार

'मॅरेथॉन ठाण्याची.. उर्जा तरुणाईची' या घोषवाक्याखाली आयोजित करण्यात आली असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय धावपट्टूंसह जवळपास 25 हजारांहून अधिक धावपट्टू धावतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 06, 2025 | 05:38 PM
तारीख ठरली! 31 वी ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन ‘या’ दिवशी होणार
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/स्नेहा जाधव,काकडे : ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द् असलेली 31 वी ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन यावर्षी ऑगस्ट 2025 मध्ये होणार आहे. यंदाही स्पर्धेत टाईम टेक्नॉलॉजीचा वापर 21 किमी पुरूष व महिला तसेच 18 वर्षावरील 10 किमीच्या स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे. सदरची स्पर्धा ‘मॅरेथॉन ठाण्याची.. उर्जा तरुणाईची’ या घोषवाक्याखाली आयोजित करण्यात आली असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय धावपट्टूंसह जवळपास 25 हजारांहून अधिक धावपट्टू धावतील असा विश्वास आहे. या स्पर्धेत महापालिका अधिकारी व कर्मचारी, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्‍या पत्रकारांसह जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी यांनी आज झालेल्या पत्रकार ‍ परिषदेत केले.

‘या’ तारखेला होणार स्पर्धा

महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेस उपायुक्त उमेश बिरारी, मीनल पालांडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील आदी उपस्थित होते.रविवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी सकाळी 6.30 वाजता महापालिका मुख्यालय चौकातून या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. सदर स्पर्धा विविध 12 गटांत घेण्यात येणार आहे.

मॅरेथॉन स्पर्धेसाठी ऑफलाईन नोंदणी एकूण 13860 इतकी झाली आहे. 12 वर्षाखालील मुले 3कि.मी -2378, मुली 3कि.मी – 2051, 15 वर्षाखालील मुले ‍5 कि.मी – 4641, मुली 5कि.मी- 4018, 18 वर्षाखालील मुले 10 ‍ कि.मी- 965, 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक महिला 1 ‍कि.मी – 22, पुरूष कि.मी 11 तर कॉर्पोरेट रन 1 कि.मी साठी 14 आदी नोंदणी झाली आहे. तर ऑनलाईन नोंदणी 1850 इतकी झाली आहे. पुरुष 21 ‍कि.मी खुला गट – 610, महिला 21 कि.मी – 190, 18 वर्षावरील पुरूष 10 कि.मी – 730, 16 वर्षावरील महिला 10 कि.मी – 320 इतकी नोंदणी झाली आहे.

कॉर्पोरेट रन
महापालिका अधिकारी कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांच्यासाठी 1 कि.मी ची ‘कॉर्पोरेट रन’ ठेवण्यात आली असून या स्पर्धेत महापालिका अधिकारी कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधी यांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार आहेत.

वातावरणनिर्मितीसाठी झुंबाचे आयोजन

यंदाची ठाणे महानगरपालिका ही 6 वर्षांनी होत आहे, स्पर्धेच्या दिवशी वातावरणनिर्मिती व स्पर्धा सुरू होण्यापूर्वी स्पर्धेकरितेच्या सरावासाठी झुंबा वर्कआऊटचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिका मुख्यालयासमोर उभारण्यात येणाऱ्या स्टेजसमोर झुंबा वर्कआऊट होणार आहे.

महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी परिवहन बसेसची सोय

या स्पर्धेत ठाणे महापालिका शाळांमधील विद्यार्थी सहभागी होणार असून या विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी परिवहनच्या बसेसची सोय उपलब्ध करण्यात आली आहे.

· “विशेष लोकल सेवा”

स्पर्धकांना सदर स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी वेळेत पोहचता यावे यासाठी रविवार दि. 10/08/2025 रोजी सकाळी 5.00 वा. बदलापूर ते ठाणे व दुपारी 1.00 वा. ठाणे ते बदलापूर अशी “विशेष लोकल सेवा” उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

8 ऑगस्ट रोजी बीप एक्स्पो

21 कि.मी पुरूष व महिला गट व 18 वर्षावरील 10 कि.मी स्पर्धेसाठी नोंदणी केलेल्या स्पर्धकांना खुल्या गटाचे टि-शर्टचे अनावरण(BIB EXPO) व चेस्ट नंबरचे वाटप स्पर्धेच्या दोन दिवस अगोदर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत.विजेत्यांना एकूण 10 लाख 38 हजार 900 रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.

यंदा मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना देण्यात येणाऱ्या पारितोषिकांमध्ये वाढ करण्यात आली असून 21 कि.मी स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम 1 लाखांचे रोख पारितोषिक, सन्माचिन्ह, मेडल व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच सर्वच बक्षीसांमध्ये वाढ करण्यात आली आहे.

पहिल्या तीन गटातील स्पर्धा राज्यस्तरीय असून, 21 कि.मी गटातील पुरूष व महिला विजेत्यांसाठी पहिले पारितोषिक 1,00,000/- दुसरे 75,000/- तिसरे 50,000/- चौथे 30,000/- अशी आहेत. त्या शिवाय 5 ते 10 पर्यतच्या विजेत्यांसाठीही आकर्षक रोख पारितोषिक व चषके ठेवण्यात आली आहेत.

10 कि.मी 18 वर्षावरील खुल्या गटातील स्पर्धा खारीगांव ते कोपरी मार्गे महापालिका भवन अशी असून स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक 25,000, दुसरे 20,0000, तिसरे 15,000/- , चौथे 10,000/- व 5 ते 10 पर्यतच्या विजेत्यांसाठीही आकर्षक रोख पारितोषिक व चषके ठेवण्यात आली आहेत.

10 कि.मी 18 वर्षाखालील मुलांसाठी असलेली स्पर्धा महापालिका भवन येथून सुरू होणार असून मिलेनियम टोयाटा येथे समाप्त होणार आहे. या स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक रु. 25,000, दुसरे 20,0000, तिसरे 15,000, चौथे 10,000, व 5 ते 10 पर्यतच्या विजेत्यांसाठीही आकर्षक रोख पारितोषिक व चषके ठेवण्यात आली आहेत.

10 कि.मी 15 वर्षावरील मुलींसाठी (खुला गट) असलेली स्पर्धा महापालिका भवन येथून सुरू होणार असून हिरानंदानी इस्टेट येथे समाप्त होणार आहे. या स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक 25,000 दुसरे 20,0000, तिसरे 15,000, चौथे 10,000 व 5 ते 10 पर्यतच्या विजेत्यांसाठीही आकर्षक रोख बक्षीसे व चषके ठेवण्यात आली आहेत.

15 वर्षाखालील मुले व मुली दोन गटासाठी – 5 किमी अंतराची स्पर्धा महापालिका भवन येथून सुरू होणार असून ही स्पर्धा माँसाहेब मीनाताई ठाकरे चौक येथे समाप्त होणार आहे. या स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक 8,000, दुसरे 6,000, तिसरे 5,500, चौथे 5,000, व 5 ते 10 पर्यतच्या विजेत्यांसाठीही आकर्षक रोख पारितोषिक व चषके ठेवण्यात आली आहेत.

12 वर्षाखालील मुले व मुली दोन गटासाठी – 3 कि.मी अंतराची स्पर्धा असून या दोन्हीही गटांसाठी पहिल्या ते चौथ्या क्रमांकाच्या विजेत्यांसाठी अनुक्रमे पहिले पारितोषिक 5,500, दुसरे 5,000, तिसरे 4,500/, चौथे 3,500, व 5 ते 10 पर्यतच्या विजेत्यांसाठीही आकर्षक रोख पारितोषिके व चषक ठेवण्यात आले आहेत. या गटातील स्पर्धा महापालिका भवन, पाचपाखाडी येथे सुरू होऊन परत महापालिका भवन येथे समाप्त होणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक पुरूष व महिला या स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे रु. 5 हजार, रु. 3 हजार, रु 2 हजार अशी बक्षीसे ठेवण्यात आली असल्याचे नमूद करीत या पत्रकार परिषदेत मॅरेथॉन स्पर्धेच्या टिझरचे तसेच मॅरेथॉन गाण्याचे व स्पर्धकांना देण्यात येणारे टी शर्ट, खाऊ तसेच विविध वयोगटासाठी विविध रंगात देण्यात येणाऱ्या चेस्ट नंबरचे प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.

Web Title: 31st thane municipal corporation varsha marathon to be held on august 10th

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2025 | 03:45 PM

Topics:  

  • maharashtra
  • muncipal corporation
  • Thane news

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
4

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.