Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बघतोय रिक्षावाला संघटनेच्या अध्यक्षांसह 36 जणांना अटक; बेकायदा बाईक टॅक्सीविरोधात पुकारले होते रिक्षा बंद आंदोलन

बेकायदेशिर बाईक टॅक्सीविरोधात पुकारलेल्या चक्काजाम रिक्षा आंदोलनादरम्यान आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन करून सर्व नागिरकांना तसेच आरटीओंच्या अधिकाऱ्यांसोबतच पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे दुर्लक्ष करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला असल्याप्रकरणी बघतोय रिक्षावाला संघटनेच्या अध्यक्षांसह ३७ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर, यामध्ये इतर संघटनांचे देखील अध्यक्ष व इतर रिक्षा चालक आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 13, 2022 | 05:27 PM
बघतोय रिक्षावाला संघटनेच्या अध्यक्षांसह 36 जणांना अटक; बेकायदा बाईक टॅक्सीविरोधात पुकारले होते रिक्षा बंद आंदोलन
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : बेकायदेशिर बाईक टॅक्सीविरोधात पुकारलेल्या चक्काजाम रिक्षा आंदोलनादरम्यान आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन करून सर्व नागिरकांना तसेच आरटीओंच्या अधिकाऱ्यांसोबतच पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे दुर्लक्ष करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला असल्याप्रकरणी बघतोय रिक्षावाला संघटनेच्या अध्यक्षांसह ३७ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर, यामध्ये इतर संघटनांचे देखील अध्यक्ष व इतर रिक्षा चालक आहेत.

या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात भादवी कलम ३५३, १४३, १४५, १४७, १४९, ३३६, ३४२, १८८ व क्रिमिनल लॉ. अमेंडमेंट कायदा कलम ३, ७ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१), (३) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बघतोय रिक्षावाला फोरमचे अध्यक्ष, आम आदमी रिक्षा चालक संघटना, पुणे जिल्हा वाहतूक सेना अध्यक्ष, आरपीआय वाहतूक आघाडी, पी आर्शिवाद रिक्षा संघटना यासह इतर संघटना तसेच त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

रॅपीडो बाईक टॅक्सी बंद होण्यासाठी आरटीओ कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलन केले. तत्पुर्वी पोलिसांकडून या आंदोलनासंदंर्भात बैठक घेऊन ते न करण्यासाठी सांगण्यात आले होते. तशी नोटीस देखील त्यांना बजावण्यात आली होती. तर, बाबा आढाव यांनी देखील हे आंदोलन न करण्याबाबत सांगितले होते. तरीही संघटनांकडून आरटीओ कार्यालयासमोर बेकायदेशीर आंदोलन केले. या आंदोलनात साडे नऊच्या जवळपास रिक्षा चालक सहभागी झाले होते. त्यांनी रिक्षाच चौकात लावून वाहतूकीला अडथळा निर्माण केला.आरटीओच्या गेटसमोर आंदोलन केल्याने कार्यालयीन व शासकीय कामात अडथळा निर्माण झाला. त्यासोबतच शाळा तसेच रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णांना याचा त्रास सहन करावा लागला. या आंदोलनादरम्यान पोलीस वाहतूक सुरळीत करू लागले असता पोलिसांच्या अंगावर आंदोलक धावून गेले. पोलिसांनी यानंतर बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल करून डॉ. केशव क्षिरसागर यांच्यासह तब्बल ३७ जणांना अटक केली. सोमवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या कारवाईनंतर मोठी खळबळ उडाली आहे.

आंदोलनात सहभागी न होणाऱ्या रिक्षांची तोडफोड.. !

बेकायदेशिर बाईक टॅक्सीविरोधात पुकारण्यात आलेल्या बंद आंदोलनात सहभागी न झाल्याने रिक्षाची तोडफोड केल्यावरून रिक्षा संघटनेचे अध्यक्षांसह ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात केशव नाना क्षिरसागर, संजिव कवडे, आनंद अंकुश, तुषार पवार, बाबा सय्यद व इतरांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत उदय चंद्रकांत शिर्के (वय ४६) यांनी तक्रार दिली आहे. सोमवारी दुपारी नवले-ब्रिज कात्रज रस्त्यावर हा प्रकार घडला आहे.

पुण्यातील बेकायदा बाईक टॅक्सीविरोधात बघतोय रिक्षा संघटनेसह रिक्षा चालकांनी चक्का जाम रिक्षा बंद आदोलन पुकारले होते. पण, त्यांनी रिक्षा चालकांना विश्वासात न घेता हे आंदोलन पुकारल्याने काही रिक्षा बंदमध्ये सहभागी झाल्या नव्हत्या. बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष केशव क्षिरसागर व इतरांनी सहभागी न झालेल्या रिक्षांवर लक्ष ठेवून तसेच रिक्षा मिळून आल्यास त्या फोडून टाका व जाळून टाका, सोडू नका कोणाला असे चिथावणी दिली. त्यामुळे अज्ञात तीन ते चार जणांनी तक्रारदार प्रवासी घेऊन जात असताना त्यांची रिक्षा अडवून त्याची तोडफोड केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Web Title: 36 people arrested including president of bhagtoy rickshawala association the rickshaw bandh movement was called against illegal bike taxis nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2022 | 05:27 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune
  • Riksha

संबंधित बातम्या

Pune Crime: पुण्यात 17 वर्षीय मुलाचं अपहरण करून निर्घृण हत्या; इन्स्टाग्रामवरून सापळा, दगड-कोयत्याने वार करत…
1

Pune Crime: पुण्यात 17 वर्षीय मुलाचं अपहरण करून निर्घृण हत्या; इन्स्टाग्रामवरून सापळा, दगड-कोयत्याने वार करत…

महाराष्ट्रात वसलेलं ही ठिकाणं म्हणजे भारतातील इटलीच… इथे एकदा जाल तर परत येण्याची इच्छाच होणार नाही
2

महाराष्ट्रात वसलेलं ही ठिकाणं म्हणजे भारतातील इटलीच… इथे एकदा जाल तर परत येण्याची इच्छाच होणार नाही

Deepak Kesarkar: “निवडणूक आयोगावर आक्षेप घेणाऱ्यांना पराभव डोळ्यासमोर दिसतोय…”, दिपक केसरकर यांची संजय राऊतांवर टीका
3

Deepak Kesarkar: “निवडणूक आयोगावर आक्षेप घेणाऱ्यांना पराभव डोळ्यासमोर दिसतोय…”, दिपक केसरकर यांची संजय राऊतांवर टीका

Pune Crime: ‘वडील गंभीर आहेत’ आणि…; बनावट इमर्जन्सी कॉलने डॉक्टरांना बोलावलं अन् चाकूच्या धाकात लुटलं
4

Pune Crime: ‘वडील गंभीर आहेत’ आणि…; बनावट इमर्जन्सी कॉलने डॉक्टरांना बोलावलं अन् चाकूच्या धाकात लुटलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.