
उरणमध्ये केमिकलच्या गोदामाला भीषण आग; मोठ्या स्फोटाने परिसर हादरला, धुराचे प्रचंड लोट!
मिळालेल्या माहितीनुसार, वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील प्लाटीनम लॉजिस्टिकच्या गोदामाला आग लागल्यानंतर काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. गोदामात साठवून ठेवलेल्या केमिकलमुळे मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू गेल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली. गोदामातून आगीच्या ज्वाळा आणि धुराचे मोठमोठे लोट बाहेर पडताना दिसत होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांची एकच धावपळ उडाली.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन पथकाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले. दरम्यान, हवेत मोठ्या प्रमाणात धूर पसरल्यामुळे परिसरातील काही नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहिती समोर आली आहे. अद्याप आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.
उरण तालुक्यातील विविध ग्रामपंचायत हद्दींमध्ये अनेक कंटेनर यार्ड आणि गोदामे उभारण्यात आली आहेत. यापैकी काही ठिकाणी शासनाच्या सुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याचा आरोप केला जात आहे. गोदामांमध्ये साठवण्यात येणाऱ्या ज्वलनशील पदार्थांच्या सुरक्षिततेबाबत तसेच अग्निसुरक्षा यंत्रणांच्या उपलब्धतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. अनेक गोदामांचे नियमित फायर ऑडिट होत नसल्याने अशा आगीच्या घटना घडत असल्याची माहिती समोर येत आहे. उरणमधील ताज्या घटनेनंतर प्रशासनाकडून गोदामांची तपासणी, अग्निसुरक्षा यंत्रणांची पडताळणी आणि नियमांचे पालन होत आहे की नाही, याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, नवी मुंबईतील कळंबोली परिसरातही ड्रममध्ये साठवलेल्या रसायनांच्या स्फोटामुळे एका गॅरेज-कम-वेअरहाऊसमध्ये भीषण आग लागली होती. थिनरच्या ड्रममध्ये साठवलेल्या रसायनांचा स्फोट झाल्याने आग भडकली. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करताना अग्निशमन दलाचा एक कर्मचारी जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेनंतर वेअरहाऊसचा मालक फरार झाल्याची माहिती समोर आली होती. या आगीच्या कारणांचाही तपास सुरू आहे. उरण आणि कळंबोलीतील घटनांमुळे औद्योगिक गोदामे, केमिकल साठवणूक आणि अग्निसुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
Mumbai News: पर्जन्यजल संचयन ‘चा पालिकेला विसर! पाणीटंचाईमुळे अडचणीत भर, आमदारांनी सुरू केली योजना
Ans: उरण तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील प्लाटीनम लॉजिस्टिकच्या मालसाठा गोदामाला भीषण आग लागली.
Ans: गोदामात केमिकलचा साठा असल्याने आगीदरम्यान मोठा स्फोट झाला. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Ans: आगीमुळे परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले. त्यामुळे काही नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहिती समोर आली आहे.