Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: अहिल्यानगर महापालिकेत सहापैकी 5 स्वीकृत नगरसेवकांची निवड, शिवसेनेचा अर्ज रद्द

अहिल्यानगर महापालिकेत पाच स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली आहे. यावेळी समिती सदस्यांचीही निवड करण्यात आली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 27, 2026 | 08:10 PM
अहिल्यानगर महापालिकेत सहापैकी 5 स्वीकृत नगरसेवकांची निवड

अहिल्यानगर महापालिकेत सहापैकी 5 स्वीकृत नगरसेवकांची निवड

Follow Us
Close
Follow Us:
  • अहिल्यानगर मनपात पाच स्वीकृत नगरसेवकांची निवड
  • जाणून घ्या स्वीकृत नगरसेवकांची नावे
  • समिती सदस्यांचीही झाली निवड
अहिल्यानगर महापालिकेत स्वीकृत सदस्य आणि विविध समित्यांच्या सदस्यांच्या निवडीसाठी आज दोन विशेष सभा घेण्यात आल्या. त्यामध्ये सहा स्वीकृत सदस्यांपैकी पाच सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली, तर शिवसेनेच्या कोट्यातील एका उमेदवाराचा अर्ज अपूर्ण कागदपत्रांमुळे अवैध ठरवण्यात आला.

महापालिकेचे आयुक्त Yashwant Dange यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या उमेदवाराच्या अर्जासोबत आवश्यक शपथपत्रे नसल्यामुळे त्यांचा अर्ज रद्द करण्यात आला.

दोन विशेष सभा

आज झालेल्या पहिल्या विशेष सभेत स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समिती यांसाठी सदस्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर झालेल्या दुसऱ्या सभेत स्वीकृत सदस्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.

Good News: मार्च-एप्रिलमध्ये ३,३५० घरांसाठी म्हाडाची लॉटरी; ‘या’ भागात फ्लॅट्स होतील उपलब्ध

या बैठकीस उपमहापौर धनंजय जाधव, अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुटकेकर आणि नगरसचिव मेहेर लोहारे उपस्थित होते.

पाच स्वीकृत सदस्यांची निवड

महापालिकेत स्वीकृत सदस्यांमध्ये Nationalist Congress Party चे तीन, Bharatiya Janata Party चे दोन आणि Shiv Sena चा एक सदस्य असा कोटा होता.

गटनेत्यांनी बंद पाकिटात उमेदवारांची नावे महापौर ज्योती गाडे यांच्याकडे सादर केली. त्यानंतर आयुक्तांनी अर्जांची छाननी केली. छाननीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाचे मिळून पाच अर्ज वैध ठरवण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडलेले सदस्य :

  • बाबासाहेब नागरगोजे
  • विकास जगताप
  • रेवन्नाथ पवार
High Court: संमतीने असलेले शारीरिक संबंध ‘टॉर्चर’ ठरत नाहीत, मुंबई उच्च न्यायालयाने तरुणांविरुद्धचा POCSO खटला केला रद्द

भाजपाकडून निवडलेले सदस्य :

  • विशाल नाकाडे
  • रवींद्र बारस्कर
या पाच सदस्यांपैकी चार चेहरे नवीन असून रवींद्र बारस्कर हे यापूर्वी नगरसेवक होते. यावेळी त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

शिवसेनेचा अर्ज अवैध

शिवसेनेकडून आदेश सुरेश जाधव यांचे नाव देण्यात आले होते. मात्र त्यांच्या अर्जासोबत अपत्यांची माहिती आणि मालमत्तेबाबतचे शपथपत्र जोडलेले नसल्याने अर्ज अवैध ठरवण्यात आला. त्यामुळे आज शिवसेनेच्या कोट्यातील स्वीकृत सदस्याची निवड होऊ शकली नाही. भविष्यात होणाऱ्या सभेत त्यांना पुन्हा अर्ज सादर करण्याची संधी मिळेल, असे आयुक्त यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले.

स्थायी समितीमधील नियुक्त सदस्य

गौरी बोरकर, हरप्रीतकौर गंभीर, सुरेश बनसोडे, संध्या पवार, मीना चोपडा व पौर्णिमा गव्हाळे (राष्ट्रवादी काँग्रेस). सुभाष लोंढे, बाबासाहेब वाकळे, निखिल वारे, मनोज दुलम्, मनोज कोतकर व सोनाबाई शिंदे (भाजपा), नवनाथ कातोरे व सुनिता गेनप्पा (शिवसेना), शेहनाज शेख (एमआयएम) आणि मिनाज खान (काँग्रेस).

महिला व बालकल्याण समिती सदस्य निवड

दिपाली बारस्कर, सुनिता भिंगारदिवे, अनिता शेटिया, काजल भोसले, सुनिता कांबळे, आश्विनी लोंढे (राष्ट्रवादी काँग्रेस). वंदना ताठे, शीतल ढोणे, पुष्पा बोरूडे, आशा कातोरे, रोशनी त्र्यंबके व वर्षा सानप (भाजपा). मंगल लोखंडे, रुपाली दातरंगे (शिवसेना), शेहनाज शेख (एमआयएम) आणि मिनाज खान (काँग्रेस).

Web Title: 5 out of six approved corporators elected in ahilyanagar municipal corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 08:10 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत लॉंग मार्च सुरूच, डॉ. नवले यांचा सरकारला इशारा
1

Ahilyanagar News: जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत लॉंग मार्च सुरूच, डॉ. नवले यांचा सरकारला इशारा

Ahilynagar News: यंदा मढीची यात्रा पुन्हा तापणार? मुस्लिम व्यापाराना विरोध; भाविकांचे निर्णयाकडे लक्ष
2

Ahilynagar News: यंदा मढीची यात्रा पुन्हा तापणार? मुस्लिम व्यापाराना विरोध; भाविकांचे निर्णयाकडे लक्ष

Ahilyanagar News: अहिल्यानगर मनपाकडून शास्तीमाफी योजना जाहीर, 100 टक्के थकीत रक्कम ‘या’ तारखेपर्यंत जमा करण्याचे आवाहन
3

Ahilyanagar News: अहिल्यानगर मनपाकडून शास्तीमाफी योजना जाहीर, 100 टक्के थकीत रक्कम ‘या’ तारखेपर्यंत जमा करण्याचे आवाहन

Nanded News : 12 वीच्या विद्यार्थ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांची करडी नजर; परीक्षा केंद्रावर कर्डिले ठाण मांडून
4

Nanded News : 12 वीच्या विद्यार्थ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांची करडी नजर; परीक्षा केंद्रावर कर्डिले ठाण मांडून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.