Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विठ्ठल मंदिराच्या दर्शनातील घुसखोरी थांबणार…; दर्शन रांगेला लोखंडी तारेची जाळी लावण्याचा निर्णय 

आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी होत असते. याच पार्श्वभूमीवर दर्शन रांगेमध्ये जाळी बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 12, 2025 | 06:31 PM
6 feet net in the darshan queue at Pandharpur Vitthal Rukmini Temple

6 feet net in the darshan queue at Pandharpur Vitthal Rukmini Temple

Follow Us
Close
Follow Us:
पंढरपूर : नवनाथ खिलारे – लवकरच आषाढी वारी सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर देवस्थानांबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने भाविकांना जलद आणि सुलभ दर्शन मिळावे यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. व्हीआयपी दर्शन बंद केल्यानंतर, आता दर्शन बारीला लोखंडी तारेच्या जाळी बसवण्यात आले आहेत, ज्यामुळे वारीकाळात दर्शन रांगेत होणाऱ्या घुसखोरीला आळा बसण्यास मदत होणार आहे. सध्या एक लाखाहून अधिक भाविक पंढरपुरात येत असून, दर्शनाची रांग पत्राशेडपर्यंत पोहोचत आहे.
भाविकांचे जलद आणि सुलभदर्शन होण्यासाठी, मंदिर समितीने दररोज होणाऱ्या ८० तुळशी पूजा कमी करून त्या फक्त १० करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दर्शनाचा अवधी किमान एक तासाने कमी झाला आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता आणि दर्शनासाठी लागणारा कालावधी आणखी कमी करण्यासाठी मंदिर समितीने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे वशिल्याने दर्शन देण्याची पद्धत पूर्णपणे बंद केली आहे.
पंढरपूर दर्शनबारीत घुसखोरी होऊ नये यासाठी बसवण्यात आलेल्या जाळीची अंमलबजावणी काटेकोरपणे सुरू झाली आहे. या निर्णयामुळे पहिल्याच दिवशी भाविकांना मोठा दिलासा मिळाल्याचे अनेकांनी सांगितले. विणे गल्ली ते पत्राशेड या दर्शन रांगेला साधारण सहा ते सात फूट उंचीचे जाळी बसवण्यात आले आहेत. यामुळे दर्शन रांगेतील घुसखोरीला शंभर टक्के आळा बसेल, असा दावा मंदिर समितीने केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

मंदिर समितीच्या वतीने टोकन दर्शनाची तयारी पूर्ण

तिरुपती बालाजी देवस्थानच्या धर्तीवर पंढरपुरातही विठ्ठल दर्शनासाठी टोकन दर्शन प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. येत्या १५ जून रोजी प्रायोगिक तत्वावर पहिली टोकन चाचणी घेण्यात येणार असून, पहिल्या दिवशी १२०० भाविकांना दर्शनासाठी टोकन दिले जाणार आहे. टोकन दर्शनासाठी बुकिंग करण्यासाठी शहरातील विविध भागात बुकिंग केंद्रे सुरू करण्यात येतील. या सुविधेमुळे भाविकांना दिलेल्या वेळेत दर्शन मिळणार असून, किमान दोन तासात दर्शन घेता येईल अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. भाविकांनी या ऑनलाईन टोकन दर्शन सुविधेचा लाभ घ्यावा, अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

विठुरायाच्या पदस्पर्शासाठी कमी वेळ लागणार

दर्शनासाठी येणारा सर्वसामान्य भाविक केंद्रस्थानी ठेवून मंदिर समितीने दर्शन व्यवस्था केली आहे. भाविकांना कमी वेळेत दर्शन घेता यावे यासाठी विशेष प्राधान्य दिले जात आहे. तुळशी पूजा कमी करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर व्हीआयपी दर्शन देखील बंद केले आहे. शिवाय, दर्शनरांगेत घुसखोरी थांबवण्यासाठी जाळी गार्ड बसवले आहेत. दर्शनबारी संदर्भात आणखी काही सूचना असतील, तर त्या मंदिर समितीला लेखी स्वरूपात द्याव्यात. प्राप्त सूचनांचाही निश्चितपणे विचार केला जाईल, असे मत विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.

Web Title: 6 feet net in the darshan queue at pandharpur vitthal rukmini temple

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2025 | 06:31 PM

Topics:  

  • Ashadhi Wari
  • Pandharpur News
  • Vitthal Rukmini Mandir

संबंधित बातम्या

केअर टेकर महिलेनेच केला हातसाफ, पंढरपूरमधील चाेरीचा उलगडा; लाखोंचा मुद्देमाल जप्त
1

केअर टेकर महिलेनेच केला हातसाफ, पंढरपूरमधील चाेरीचा उलगडा; लाखोंचा मुद्देमाल जप्त

पंढरपुरात व्हीआयपी दर्शनासाठी वशिलेबाजी सुरूच; अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मर्जीतील लोकांना उत्तरद्वारमधून प्रवेश
2

पंढरपुरात व्हीआयपी दर्शनासाठी वशिलेबाजी सुरूच; अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मर्जीतील लोकांना उत्तरद्वारमधून प्रवेश

कासेगाव येथे लाखो रूपयांचा अवैध खतसाठा जप्त; जिल्हास्तरीय पथकाकडून धडक कारवाई
3

कासेगाव येथे लाखो रूपयांचा अवैध खतसाठा जप्त; जिल्हास्तरीय पथकाकडून धडक कारवाई

गावात ना शिक्षक नियमित, ना डॉक्टर तरीही पगार मात्र खात्यात; पंढरपुरात अजब कारभार समोर
4

गावात ना शिक्षक नियमित, ना डॉक्टर तरीही पगार मात्र खात्यात; पंढरपुरात अजब कारभार समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.