अहमदाबाद विमान अपघात प्रकरणावर देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे (फोटो - सोशल मीडिया)
Ahmedabad plane crash : नागपूर : अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान एआय-१७१ याचा अपघात झाला आहे. या विमानाने जरातमधील अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये हे विमान क्रश झाले. या विमानात एकूण २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स होते. यामध्ये यामध्ये 169 भारतीय तर 53 ब्रिटिश नागरिक प्रवाशांमध्ये असल्याची माहिती दिली. त्याचबरोबर 1 कॅनेडियन आणि 7 पोर्तुगीज नागरिक विमानात होते. एअर इंडियाचे विमान बोईंग ७८७-८ ट्विन जेट होते. पोलिस नियंत्रण कक्षानुसार, एअर इंडियाचे विमान एआय १७१ लंडनला जात होते.
अहमदाबाद विमान अपघात इतका भीषण होता की काही वेळातच संपूर्ण परिसर काळ्या धुराने झाकले गेले. या अपघातात आतापर्यंत 133 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या अपघातानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली. तसेच या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. अहमदाबाद विमानतळावर एअर इंडियाच्या प्रवासी विमानाच्या अपघाताबद्दल ऐकून दुःख झाले आणि धक्का बसला. मी सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो, अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.
त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या अहमदाबाद घटनेवर शोक व्यक्त केला आहे. सोशल मीडिया पोस्टमध्ये एकनाथ शिंदे यांनी लिहिले आहे की, अहमदाबाद येथील भीषण विमान अपघात अतिशय धक्कादायक आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. गुजरात प्रशासन मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य करत असून विमानातील वाचलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले जात आहे. या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाल्याची शक्यताही वर्तवण्यात येते आहे. या भयंकर दुर्घटनेतील जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, अशा भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत.
अहमदाबाद येथील भीषण विमान अपघात अतिशय धक्कादायक आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. गुजरात प्रशासन मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य करत असून विमानातील वाचलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले जात आहे. या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाल्याची शक्यताही…
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 12, 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी देखील या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. तसेचअहमदाबाद येथून होणारी सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहेत. त्यामुळे पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या शहरांकडे जाण्याचे नियोजन असलेल्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. या प्रवाशांमध्ये काहीजण आपत्कालीन वैयक्तिक, सामाजिक किंवा व्यवसायिक कारणांसाठी प्रवास करत होते, याचे भान ठेवून वडोदरा, सुरत अथवा जवळच्या इतर विमानतळांवरून विशेष उड्डाणांची व्यवस्था तातडीने करण्यात यावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.