Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashadhi Wari: वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी यंत्रणा सज्ज; तब्बल 8 हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार

वारी कालावधीत वाहतुकीची कोंडी होऊ नये भाविकांना वाहुकीचा कोणताही अडथळा येऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी  यांच्या आदेशान्वये  जड वाहतुक शहराबाहेरुन वळविण्यात आली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 04, 2025 | 02:35 AM
Ashadhi Wari: वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी यंत्रणा सज्ज; तब्बल 8 हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार

Ashadhi Wari: वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी यंत्रणा सज्ज; तब्बल 8 हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार

Follow Us
Close
Follow Us:
पंढरपूर: आषाढी शुद्ध एकादशी 06 जुलै 2025 रोजी असून, या आषाढी यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. वारी कालावधीत  येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी तसेच वारी निर्विघ्नपणे  पार पडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जुन भोसले यांनी दिली.
आषाढी  वारीत पोलीस प्रशासनाने वारकरी तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले असून, सुरक्षेसाठी व वाहतुक नियत्रंणासाठी  8 हजार 117 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये एक पोलीस अधिक्षक, चार अप्पर पोलीस अधिक्षक, 24 पोलीस उपअधिक्षक, 76 पोलीस निरिक्षिक, 312 सहाय्यक पोलीस निरिक्षक व पोलीस  उपनिरिक्षक, 4 हजार 850 पोलीस अंमलदार व 2 हजार 850 होमगार्ड तसेच 05 एसआरपीएफ कंपनी, 7 बीडीएस पथके,  आरसीपी दोन पथके, क्युआरटी चार पथके, आपत्‍कालिन परिस्थिती हातळण्यासाठी प्रशिक्षित 14 कार्ट पथके  नियुक्त करण्यात आली आहेत.  तसेच जलप्रवासी वाहतुकीवर नियंत्रण राहण्यासाठी जलसंपदा विभाग व पोलीस प्रशासनाच्या वतीने 10 ठिकाणी पथके स्थापन करण्यात आली आहेत.
 वारी कालावधीत  गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी  नदीपात्र, 65 एकर, महाव्दार, महाव्दार घाट, पत्राशेड  यासह आदी  ठिकाणी 12  वॉच टॉवर उभारण्यात  आले आहेत. वारकरी भाविकांना संरक्षण देण्यासाठी तसेच चोरी रोखण्यासाठी माऊली स्कॉडची स्थापन करण्यात आली असून यामध्ये वारकरी व नागरिकांच्या  वेशात पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच सुमारे 300 सीसीटीव्ही कॅमेरॅच्या माध्यमातून देखील लक्ष ठेवले जाणार आहे. वारकऱ्यांच्या मदतीसाठी सावरकर चौक, शिवाजी चौक, चंद्रभागा वाळवंट तसेच अंबाबाई पटांगण आदी ठिकाणी तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. वारकरी भाविकांना आवश्यक सूचना देण्यासाठी ध्वनीक्षेपन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली.
वारी कालावधीत वाहतुकीची कोंडी होऊ नये भाविकांना वाहुकीचा कोणताही अडथळा येऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी  यांच्या आदेशान्वये  जड वाहतुक शहराबाहेरुन वळविण्यात आली आहे . तसेच वाहतुक नियमनासाठी  14 ठिकाणी  डायव्हरशन पॉईट सुरु करण्यात आले आहे. त्याचबरोबर  खाजगी वाहनधारकांच्या वाहनांना थांबण्यासाठी शहरात व शहराबाहेर 17 ठिकाणी वाहनतळ व्यवस्था करण्यात आली आहे.  वारकरी भाविकांनी  सुरक्षेसाठी तसेच वारी सुरक्षित पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करुन सहाकार्य करावे  असे, आवाहनही  उपविभागीय पोलीस अधिकारी भोसले यांनी केले आहे.

Web Title: 8000 police personnel will be deployed for the security of ashadhi wari and warkari pandharpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • Ashadhi Wari
  • pandharpur
  • pandharpur wari
  • Police News

संबंधित बातम्या

धक्कादायक ! केकमध्ये आढळल्या अळ्या, नागरिक संतापले; पोलिसांनी बेकरी केली सील
1

धक्कादायक ! केकमध्ये आढळल्या अळ्या, नागरिक संतापले; पोलिसांनी बेकरी केली सील

चिपरीतील तरुणाच्या खूनाचा लागला छडा; तीन आरोपींना सापळा रचून पकडले
2

चिपरीतील तरुणाच्या खूनाचा लागला छडा; तीन आरोपींना सापळा रचून पकडले

मांजरीची क्रूर हत्या, इंस्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट केला अन्…; आरोपीला ठोकल्या बेड्या
3

मांजरीची क्रूर हत्या, इंस्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट केला अन्…; आरोपीला ठोकल्या बेड्या

Fadnavis On Yawat Voilence: “दोन्ही समाजाची लोकं…”; यवतच्या घटनेवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया
4

Fadnavis On Yawat Voilence: “दोन्ही समाजाची लोकं…”; यवतच्या घटनेवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.