Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: साताऱ्याला आधुनिक विकासाची जोड देणार! स्वातंत्र्यदिनी नगराध्यक्ष अमोल मोहितेंचे नागरिकांना आवाहन

सातारा शहराची ओळख ऐतिहासिक वारसा, सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक चळवळींचे केंद्र म्हणून आहे. या वैभवशाली परंपरेला आधुनिक विकासाची जोड देताना शहरातील मूलभूत नागरी सुविधा सक्षम करण्यासाठी नगरपरिषदेकडून प्रयत्न सुरू आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 15, 2026 | 01:51 PM
Satara News, Independence Day 2026, Satara Municipal Council, Amol Mohite,

Satara News, Independence Day 2026, Satara Municipal Council, Amol Mohite,

Follow Us
Follow Us:
  • साताऱ्याच्या वैभवशाली ऐतिहासिक परंपरेला जपत शहरात अत्याधुनिक नागरी सुविधा निर्माण करण्याचा नगरपरिषदेचा संकल्प आहे.
  • साताऱ्याच्या भविष्यातील विकासाची दिशा ठरवताना स्थानिक नागरिकांच्या अपेक्षा आणि सूचना लक्षात घेतल्या जातील.
  • केवळ प्रशासकीय कामांवर अवलंबून न राहता सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण आणि पर्यावरण संवर्धनात नागरिकांचा थेट सहभाग महत्त्वाचा
 

Satara News: देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सातारा नगरपरिषदेत उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात ध्वजारोहण सोहळा पार पडला. नगराध्यक्ष अमोल मोहिते आणि उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर यांच्या हस्ते नगरपरिषद कार्यालयाच्या आवारात राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. उपस्थित लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्मे व स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला अभिवादन केले.

स्वातंत्र्य हे असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षातून आणि बलिदानातून मिळाले आहे. त्यामुळे स्वातंत्र्याचा केवळ उत्सव न साजरा करता त्यामागील मूल्ये जपण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. देशाची एकता आणि अखंडता मजबूत करण्यासोबतच समाजातील सर्व घटकांनी परस्पर सहकार्याची भावना ठेवून देशाच्या प्रगतीस हातभार लावावा, असे आवाहन नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी केले.

Independence Day 2026 : तुटलेल्या खिडक्या, अस्वच्छ शौचालये अन्.. ; गावची शाळा पाहून अभिजीत दिपकेंची नाराजी

सातारा शहराची ओळख ऐतिहासिक वारसा, सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक चळवळींचे केंद्र म्हणून आहे. या वैभवशाली परंपरेला आधुनिक विकासाची जोड देताना शहरातील मूलभूत नागरी सुविधा सक्षम करण्यासाठी नगरपरिषदेकडून प्रयत्न सुरू आहेत. शहर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनविण्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांनीही सक्रिय भूमिका बजावणे गरजेचे असल्याचे ॲड. डी. जी. बनकर यांनी सांगितले.

शहराच्या विकासासाठी उपलब्ध साधनसंपत्तीचा योग्य वापर, विकासकामांचा दर्जा आणि नागरिकांच्या गरजांना प्राधान्य देणे या बाबींवर आगामी काळात भर देण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील समस्या नगरपरिषद प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याबरोबरच स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सार्वजनिक मालमत्तेच्या संरक्षणासाठी सहकार्य करावे. लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिक यांच्यातील समन्वय वाढल्यास शहराच्या विकासाला अधिक वेग मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Independence Day Medals 2026: स्वातंत्र्यदिनानिमित्त महाराष्ट्राचा बहुमान! ८२ अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्य व सेवा पदके जाहीर

साताऱ्याच्या विकासाची पुढील दिशा ठरविताना नागरिकांच्या सूचना आणि अपेक्षांना महत्त्व देण्यात येईल. शहराला अधिक सक्षम नागरी सुविधा उपलब्ध करून देत विकासाच्या नव्या पर्वाकडे घेऊन जाण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी नमूद केले.

राजवाडा गोलबागेतही ध्वजारोहण

दरम्यान, स्वातंत्र्यदिनानिमित्त राजवाडा गोलबाग येथे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याठिकाणीही नागरिकांनी मोठ्या उत्साहात राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. दोन्ही ठिकाणी देशभक्तीपर वातावरणात स्वातंत्र्यदिनाचा सोहळा पार पडला. या कार्यक्रमास आरोग्य सभापती धनंजय जांभळे, नियोजन सभापती अशोक शेडगे, ज्येष्ठ नगरसेवक शंकर माळवदे, नगरसेवक सुशांत महाजन, पंकज चव्हाण, रविराज किर्दत, विश्वतेज बालगुडे, सागर पावशे, दिलीप म्हेत्रे, सुनीलकुमार भंडारी, महिला व बालकल्याण समिती सभापती मोनिका घोरपडे आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Web Title: 80th independence day satara municipal council hoists national flag with patriotic fervor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 01:51 PM

Topics:  

  • Independence Day 2026
  • Satara Municipal Council
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News: साताऱ्यात पालिकेची धडक कारवाई; मंगळवार तळ्यालगतचे बांधकाम जेसीबीने हटविले
1

Satara News: साताऱ्यात पालिकेची धडक कारवाई; मंगळवार तळ्यालगतचे बांधकाम जेसीबीने हटविले

निसरेफाटा-गिरेवाडी मार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; अवघ्या आठवडाभरात तिघांचा बळी
2

निसरेफाटा-गिरेवाडी मार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; अवघ्या आठवडाभरात तिघांचा बळी

Karad News : कराड तालुक्यात दुष्काळाची झळ; संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची पृथ्वीराज चव्हाणांची मागणी
3

Karad News : कराड तालुक्यात दुष्काळाची झळ; संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची पृथ्वीराज चव्हाणांची मागणी

Satara Kas Pathar: कास पठारावर वनविभागाच्या नियोजनाचा फज्जा; वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांचे हाल
4

Satara Kas Pathar: कास पठारावर वनविभागाच्या नियोजनाचा फज्जा; वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांचे हाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.