Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yavatmal News: वैद्यकीय अधिकाऱ्यांची ८३ पदे अद्यापही रिक्त! डॉक्टरांअभावी ग्रामीण भागातील आरोग्य सेवांवर वाढला ताण

प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील डॉक्टरांची कमतरता ही ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील प्रमुख समस्या ठरत आहे. अनेक ठिकाणी एकाच डॉक्टरावर दोन ते तीन केंद्रांची जबाबदारी असल्याने रुग्णसेवेवर परिणाम होत आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 01, 2026 | 11:25 AM
वैद्यकीय अधिकाऱ्यांची ८३ पदे अद्यापही रिक्त! डॉक्टरांअभावी ग्रामीण भागातील आरोग्य सेवांवर वाढला ताण

वैद्यकीय अधिकाऱ्यांची ८३ पदे अद्यापही रिक्त! डॉक्टरांअभावी ग्रामीण भागातील आरोग्य सेवांवर वाढला ताण

Follow Us
Follow Us:

यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्थेसमोरील डॉक्टरांच्या रिक्त पदांचा प्रश्न अद्याप कायम असून, विविध श्रेणीतील तब्बल ८३ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने प्राथमिक आरोग्य सेवा प्रभावित होत आहेत. शासनाकडून सातत्याने भरती प्रक्रिया राबविण्यात येत असली आणि काही पदांवर नियुक्त्या झाल्या असल्या, तरी सर्व रिक्त जागा अद्याप भरल्या गेलेल्या नाहीत. परिणामी अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध डॉक्टरांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला असून, रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यात अडचणी येत आहेत. जिल्ह्यात सध्या ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रे (पीएचसी) आणि ४५० आरोग्य उपकेंद्रे कार्यरत आहेत. या यंत्रणेद्वारे लाखो ग्रामीण नागरिकांना आरोग्य सेवा पुरविली जाते. मात्र डॉक्टरांची कमतरता, विशेषतः दुर्गम आणि आदिवासी भागांमध्ये, आरोग्य सेवांवर परिणाम होत आहे.(फोटो सौजन्य – istock)

Yavatmal News: पीकविमा अर्जप्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव! परिसरातील शेतकरी संभ्रमात; नुकसानभरपाईबाबत अनिश्चितता

सध्या गट ‘अ’ वैद्यकीय अधिकाऱ्यांची १२९ पदे मंजूर असून त्यापैकी ७९ पदे नियमितपणे भरलेली आहेत. मात्र ५१ पदे अद्याप रिक्त आहेत. याशिवाय तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांची ४० मंजूर पदे असून त्यातील ११ पदे रिक्त होती. त्यापैकी २ पदे बदलीद्वारे भरली गेली असली, तरी ९ पदे अजूनही रिक्त आहेत. गट ‘ब’ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ४३ मंजूर पदांपैकी १७ पदे नियमित भरलेली असून,१२ पदांवर तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था करण्यात आली आहे. तरीदेखील चार पदे रिक्त असल्याने काही आरोग्य केंद्रांमध्ये नियमित वैद्यकीय सेवा देण्यात अडचणी येत आहेत. याउलट, सामुदायिक आरोग्य अधिकारी यांच्या २१२ पदांवर १०० टक्के नियुक्त्या झाल्या आहेत.

एसडब्ल्यूसीच्या ४० पदांपैकी ३२ पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यूपीएससीमार्फत तीन वरिष्ठ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली असून, ११ रुग्णालयांतील डॉक्टरांची ११ पदेही भरली गेली आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील डॉक्टरांची कमतरता ही ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील प्रमुख समस्या ठरत आहे. अनेक ठिकाणी एकाच डॉक्टरावर दोन ते तीन केंद्रांची जबाबदारी असल्याने रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. किंवा जिल्हा रुग्णालयात पाठविण्याची वेळ येत असून, त्यातून वाढत आहेत. परिणामी गंभीर रुग्णांना तालुका नागरिकांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाढत आहे.

Maharashtra Farmer Suicide: अजून किती बळी जाणार? कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या; हृदयद्रावक घटना

आरोग्य विभागाने रिक्त पदे भरण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहे. आगामी भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरांची कमतरता मोठ्या प्रमाणात दूर होईल. मात्र तोपर्यंत ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी उपलब्ध मनुष्यबळाचे प्रभावी नियोजन करणे ही प्रशासनापुढील मोठी जबाबदारी ठरणार आहे, अशी माहिती डॉ. सुभाष ढोले, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: 83 medical officer posts still vacant strain on rural healthcare services due to a shortage of doctors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 11:25 AM

Topics:  

  • doctors
  • Health Updates
  • Yavatmal

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: यवतमाळ जिल्ह्यात ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांचे उत्साहात आगमन
1

Ganeshotsav 2026: यवतमाळ जिल्ह्यात ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांचे उत्साहात आगमन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.