Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेसह सहा जणांना तब्बल ८४ लाखांचा गंडा

  • By युवराज भगत
Updated On: May 30, 2024 | 06:10 PM
पुण्यात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेसह सहा जणांना तब्बल ८४ लाखांचा गंडा
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : सायबर चोरट्यांनी शेअर मार्कट, टास्क फ्रॉड आणि क्राईम ब्रँचचे अधिकारी असल्याचे भासवत कारवाईची भीती दाखवून शहरातील ७ जणांना तब्बल ८४ लाख ३२ हजारांना गंडा घातला आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महिलेला शेअर खरेदीवर चांगला नफा
विमाननगर भागातील महिलेला शेअर खरेदीवर चांगला नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने ४१ लाख ९२ हजारांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिसांत अमेलिया, चंद्रप्रकाश पेडियार नाव्याच्या व्यक्तीसह त्यांच्या साथीदारांवर गुन्हा नोंदवला आहे. तक्रारदार महिलेशी सायबर चोरट्यांनी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे संपर्क साधला. त्यांना शेअर मार्केटच्या संदर्भात गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देऊ, असे सांगितले. पुढे त्यांना एका ग्रुपमध्ये ऍड केले. त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांच्याकडून गुंतवणूकीच्या नावाखाली पैसे उकळे.

सायबर ठगांनी गंडा घातला

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने तक्रार दिली. दुसऱ्या घटनेतही बिबवेवाडी व्यक्तीला अशाच प्रकारे सायबर ठगांनी गंडा घातला आहे. शेअर मार्केट ट्रेडींगमधील गुंतवणूकीवर चांगला नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून ३ लाख ५८ हजार रुपये उकळले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी हमीर गडवी, संजय कुमार यांच्यासह त्यांच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे.

३९ वर्षीय तरुणीची भारती विद्यापीठ पोलिसांत तक्रार

कात्रज कोंढवा रस्ता परिसरातील तरुणीला पोलीस असल्याचे सांगत कारवाईच्या भितीने पाच लाखाला गंडा घातला आहे. याप्रकरणी ३९ वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलिसांत तक्रार दिली आहे. गौरव शुक्ला, रमेश देव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तरुणीशी संपर्क साधून आरोपींनी ते दिल्ली पोलिसदलातील सायबर पोलीस बोलत असल्याचे सांगितले. विश्वास बसावा यासाठी बनावट ओळखपत्र दाखवले. त्यानंतर तुमच्याविरुद्ध आमच्याकडे केस असून, अटक होईल असे धमकावले. मात्र, त्यात मदत करून केस क्लिअर करण्याबरोबरच एनओसी देण्यासाठी मनीलॉन्ड्रींग झाली असल्याचे सांगितले.

११ लाख ४४ हजारांचा गंडा

पार्ट टाईम नोकरीचे प्रलोभन दाखवून टास्क फ्रॉडद्वारे कोंढव्यातील ४२ वर्षीय व्यक्तीला सायबर ठगांनी ११ लाख ४४ हजारांचा गंडा घातला. टेलीग्राम अ‍ॅपच्या माध्यमातून संपर्क साधून फसवणूक केली आहे. तर साईबाबानगर कोंढवा येथील २९ वर्षीय तरुणाला देखील अशाच पद्धतीने ४ लाख २६ हजारांची फसवणूक केली. हडपसर येथील तरुणीला टास्क रिव्हूव देण्याच्या बहाण्याने ९ लाख ५३ हजारांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी ३१ वर्षीय तरुणीच्या तक्रारीवरून हडपसर पोलिसांनी सायबर चोरट्यांवर गुन्हा नोंदवला. मगरपट्टा हडपसर येथील ३४ वर्षीय तरुणीची देखील सायबर ठगांनी प्रिपेड टास्क देऊन ८ लाख ६१ हजारांची फसवणूक केली. याबाबत देखील हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: 84 lakhs stock market task fraud to 7 cyber thieves at pune nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2024 | 06:05 PM

Topics:  

  • Pune Crime
  • Pune Cyber Fraud
  • pune news

संबंधित बातम्या

नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई; मनीषा मांढरेचं अखेर निलंबन
1

नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई; मनीषा मांढरेचं अखेर निलंबन

Pune : पुण्यात संग्रहालयांविषयी वाढतेय जागरूकता; वारसा जपण्याकडे नव्या पिढीचा कल
2

Pune : पुण्यात संग्रहालयांविषयी वाढतेय जागरूकता; वारसा जपण्याकडे नव्या पिढीचा कल

मुलांची आठवण आली, वडील भेटायला सासरवाडीत गेले अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ
3

मुलांची आठवण आली, वडील भेटायला सासरवाडीत गेले अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ

पुण्यात ‘हिट अँड रन’, 4 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; दाम्पत्य गंभीर जखमी
4

पुण्यात ‘हिट अँड रन’, 4 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; दाम्पत्य गंभीर जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.