Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

९० लाख टन अतिरिक्त ऊसाचा साखर आयुक्तांना ताण! दीड महिन्यात गाळप पूर्ण करण्याचे आव्हान

पश्चिम महाराष्ट्रातील उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. ज्या कारखान्यांचे गाळप पूर्ण झाले आहे त्या कारखान्याचे हार्वेस्टर आता ऊस शिल्लक असलेल्या जिल्ह्याकडे मार्गस्थ केले जात आहेत. साखर आयुक्त कार्यालयाने शिल्लक उसाचा आढावा घेतला असून राज्यात 90 लाख ऊस गाळपाचा राहिलेला आहे. शिवाय दीड महिन्यामध्ये हे गाळप पूर्ण करण्याचे उद्दीष्ट हे साखर कारखान्यांसमोर राहणार आहे. त्याअनुशंगाने प्रत्यक्षात कारवाईला सुरवात झाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 10, 2022 | 05:20 PM
९० लाख टन अतिरिक्त ऊसाचा साखर आयुक्तांना ताण!  दीड महिन्यात गाळप पूर्ण करण्याचे आव्हान
Follow Us
Close
Follow Us:

लातूर : राज्यात आजच्या घडीला गतवर्षीपेक्षा सरासरीपेक्षा अधिकच्या उसाचे गाळप झाले आहे. असे असूनही अजून तब्बल 90 लाख टन ऊस हा फडातच आहे. त्यामुळे साखर आयुक्त कार्यालयाने आतापर्यंत एक ना अनेक पर्याय शोधले पण आता प्रत्यक्षात अंमलबजावणीला सुरवात झाली आहे.

दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातील उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. ज्या कारखान्यांचे गाळप पूर्ण झाले आहे त्या कारखान्याचे हार्वेस्टर आता ऊस शिल्लक असलेल्या जिल्ह्याकडे मार्गस्थ केले जात आहेत. साखर आयुक्त कार्यालयाने शिल्लक उसाचा आढावा घेतला असून राज्यात 90 लाख ऊस गाळपाचा राहिलेला आहे. शिवाय दीड महिन्यामध्ये हे गाळप पूर्ण करण्याचे उद्दीष्ट हे साखर कारखान्यांसमोर राहणार आहे. त्याअनुशंगाने प्रत्यक्षात कारवाईला सुरवात झाली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील हार्वेस्टर मराठवाड्यात मार्गस्थ

यंदाच्या गाळप हंगामात राज्यात 1 हजार 100 लाख टन उसाचे गाळप होईल असा अंदाज होता. गतवर्षीपेक्षा अधिकचे उत्पादन होईल हे तर निश्चितच होते. पण आतापर्यंत 1 हजार 200 लाख टन उसाचे गाळप झाले आहे. तर मराठवाड्यात अजूनही 90 लाख टन ऊसाचे गाळप होणे बाकी आहे. अपेक्षेपेक्षा अधिकच्या ऊसाची लागवड झाली. त्यामुळे गाळपाचे नियोजन हुकले. असे असले तरी साखर कारखान्यांनी त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिकच्या ऊसाचे गाळप करुनही हा प्रश्न कायम आहे. कधी नव्हे ते मराठवाड्यात अशी परस्थिती निर्माण झाली आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्रातील हार्वेस्टर मराठवाड्यात मार्गस्थ झाले आहेत.

दीड महिन्यात उद्दीष्ट साधण्याचा प्रयत्न

शिल्लक उसाचे गाळप करण्यासाठी अजूनही दीड महिन्याचा कालावधी हातामध्ये आहे. त्यानंतर मात्र, पावसाला सुरवात झाली तर हे शक्य होणार नाही. शिवाय कालावधी पूर्ण होऊन तर गेला आहेच पण 90 लाख टन ऊस दीड महिन्यात पूर्ण करण्याचे उद्दीष्ट साखर आयुक्तालयाने समोर ठेवलेले आहेय. ऊसतोड मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे तर दुसरीकडे योग्य नियोजन करण्यात साखर आयुक्त हे दंग आहेत. अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निकाली लावणे हेच ध्येय असल्याचे साखर आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

[read_also content=”अखेर राज ठाकरेंचा वसंत मोरेंना रिप्लाय; म्हणाले… https://www.navarashtra.com/maharashtra/finally-raj-thackerays-reply-to-vasant-more-said-nrdm-267041.html”]

अतिरिक्त उसाबाबतचे नियोजन कसे आहे?

पश्चिम महाराष्ट्रातील उसाचे गाळप पूर्ण झाल्यामुळे या भागातील हार्वेस्टर आता मराठवाड्यातील कारखान्यांना भाडेतत्वावर देण्यात येत आहेत. कोल्हापूर, सांगली आणि कर्नाटक येथील हार्वेस्टर सध्या बीड, जालना, लातूर नांदेड या जिल्ह्यांमध्ये पाठवले जात आहेत. य़ाठिकाणी नेमलेले समन्वय अधिकारी हे उसतोडीचे नियोजन करणार आहेत. अखेर अतिरिक्त उसाचा आकडा समोर आला असून त्याअनुशंगाने काम सुरु झाले आहे. त्यामुळे आगामी काळात किती टन उसाचे गाळप होणार हे पहावे लागणार आहे.

Web Title: 9 million tonnes of extra sugarcane stress to sugar commissioners the challenge of completing the mill in a month and a half nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2022 | 05:20 PM

Topics:  

  • ajit pawar
  • balasaheb patil
  • cmomaharashtra
  • Shekhar Gaikwad

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
1

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?
2

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश
3

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश

Ajit Pawar : मला माझे मन सांगायचे की…; अजित पवारांकडून पुन्हा एकदा शरद पवारांचं कौतुक
4

Ajit Pawar : मला माझे मन सांगायचे की…; अजित पवारांकडून पुन्हा एकदा शरद पवारांचं कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.