Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

साताऱ्यात होणार ९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन! आकर्षक चित्ररथ अन्…; काय काय असणार?

साहित्य संमेलनाची देदीप्यमान परंपरा जपत असतानाच साताऱ्यातील या संमेलनातून भविष्यातील संमेलने वैविध्यपूर्ण आणि नावीन्यपूर्ण करण्याच्या नव्या वाटा आम्ही निर्माण करत आहोत, असे प्रा. मिलिंद जोशी म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 27, 2025 | 02:35 AM
साताऱ्यात होणार ९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन! आकर्षक चित्ररथ अन्…; काय काय असणार?
Follow Us
Close
Follow Us:

साताऱ्यात होणार ९९वे  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीने घेतला वेग
विद्यार्थ्यांच्या सहभागातून आकर्षक चित्ररथांसह ग्रंथदिंडी काढण्यात येणार

पुणे: येत्या १ ते ४ जानेवारीदरम्यान साताऱ्यात रंगणार्‍या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीने वेग घेतला आहे. परंपरेला उजाळा देण्यासोबतच या वर्षी संमेलनात नावीन्यपूर्ण उपक्रमांची भर असेल. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशनतर्फे हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

संमेलनाच्या पूर्वसंध्येला शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागातून आकर्षक चित्ररथांसह ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिकांचा विशेष सन्मान, संमेलनाचे पूर्वाध्यक्ष आणि महामंडळाच्या माजी अध्यक्षांचा निमंत्रित म्हणून समावेश ही वैशिष्ट्ये यंदाच्या संमेलनाची शोभा वाढवणार आहेत. पुस्तक दालनातून थेट संमेलनस्थळाकडे जाणारी विशेष व्यवस्था, साहित्यिक उपक्रमांसोबतच मनोरंजनात्मक कार्यक्रमांचीही जोड देण्यात आली आहे.

पानिपतकार विश्वास पाटील यांच्या नावावर शिक्कोमोर्तब; ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरा

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, साहित्य संमेलनाची देदीप्यमान परंपरा जपत असतानाच साताऱ्यातील या संमेलनातून भविष्यातील संमेलने वैविध्यपूर्ण आणि नावीन्यपूर्ण करण्याच्या नव्या वाटा आम्ही निर्माण करत आहोत.

महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे महामंडळाचे कार्यालय तीन वर्षे राहणार असल्याने आगामी संमेलनांना नव्या दिशा देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. साताऱ्यात तब्बल ३२ वर्षांनंतर साहित्य संमेलन भरत असल्याने साहित्यप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली आहे. नावनोंदणीला मागील वर्षांच्या तुलनेत उत्तम प्रतिसाद मिळत आहे. कविकट्टा आणि गझलकट्टा यांना तरुण साहित्यिक आणि कवींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

संमेलनात समकालीन पुस्तकांचे परीक्षण, मान्यवर लेखकांच्या मुलाखती, सरस्वती सन्मानप्राप्त साहित्यिकांची उपस्थिती, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त बालसाहित्यकारांशी विद्यार्थ्यांचा संवाद, तसेच चाकोरीबाहेरील विषयांवरील परिसंवाद असे विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. देशाच्या राजधानीनंतर आता मराठ्यांच्या राजधानीत संमेलन भरत असल्याने विशेष उत्सुकता आहे. विविध समित्यांमार्फत तयारी अंतिम टप्प्यात असून सातारकर साहित्यप्रेमी आणि रसिकांच्या स्वागतासाठी आतुर आहेत, असे संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी सांगितले.

Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यातील संमेलनाला एक कोटींचा अतिरिक्त निधी; मंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा

साताऱ्यातील संमेलनाला एक कोटींचा अतिरिक्त निधी

राज्याचे उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी साताऱ्यात होत असलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला १ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी जाहीर केला आहे. साताऱ्यात होत असलेले यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे आदर्शवत संमेलन ठरेल, अशी अपेक्षा सामंत यांनी बोलताना व्यक्त केली.

Web Title: 99th all india marathi literature conference to be held in satara attractive chariots and book stalls

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • akhil bhartiya marathi sahitya sammelan
  • Satara News
  • Uday Samant

संबंधित बातम्या

‘भविष्यात शहर विकास आघाडी निवडून आली की…’; उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास
1

‘भविष्यात शहर विकास आघाडी निवडून आली की…’; उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास

Satara : अपक्ष उमेदवाराने दोन्ही राजेंचे लावले फोटो, शिवेंद्रराजेंनी आयोगाकडे तक्रारीचा दिला इशारा
2

Satara : अपक्ष उमेदवाराने दोन्ही राजेंचे लावले फोटो, शिवेंद्रराजेंनी आयोगाकडे तक्रारीचा दिला इशारा

TET Exam : वेळेत पोहोचूनही परीक्षार्थीना गेटवरच रोखले; साताऱ्यात टीईटी परीक्षा केंद्रावर गोंधळ
3

TET Exam : वेळेत पोहोचूनही परीक्षार्थीना गेटवरच रोखले; साताऱ्यात टीईटी परीक्षा केंद्रावर गोंधळ

Ratnagiri Uday Samant : ‘आम्ही आकांडतांडव करत नाही’ सामंतांचा टोला
4

Ratnagiri Uday Samant : ‘आम्ही आकांडतांडव करत नाही’ सामंतांचा टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.