Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Zp Election Result : साताऱ्याच्या ‘मिनी मंत्रालय’वर कुणाची सत्ता? भाजपची लाट रोखणार का राष्ट्रवादी?

‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेवरील वर्चस्वासाठी भारतीय जनता पक्षाने यंदा टोकाची लढाई उभी केली असून, साताऱ्यात ऐतिहासिक सत्तांतराची शक्यता वर्तवली जात आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 09, 2026 | 11:12 AM
Satara News : रुग्णवाहिकांच्या डिझेलसाठी जिल्हा परिषद सेसमधून निधी; अर्थ समितीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

Satara News : रुग्णवाहिकांच्या डिझेलसाठी जिल्हा परिषद सेसमधून निधी; अर्थ समितीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

Follow Us
Follow Us:
  • साताऱ्याच्या ‘मिनी मंत्रालय’वर कुणाची सत्ता?
  • भाजपची लाट रोखणार का राष्ट्रवादी?
  • आज निकाल जाहीर होणार
सातारा : सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीनंतर संपूर्ण जिल्ह्यात राजकीय वातावरण अक्षरशः तापले आहे. ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेवरील वर्चस्वासाठी भारतीय जनता पक्षाने यंदा टोकाची लढाई उभी केली असून, साताऱ्यात ऐतिहासिक सत्तांतराची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या साताऱ्यात भाजपने आक्रमक रणनीती आखत प्रत्येक गणात ताकद लावली. प्रचारापासून मतदानापर्यंत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत रंगली. काही ठिकाणी कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला, तर काही ठिकाणी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.

मतदानानंतर जिल्ह्यात निकालाबाबत प्रचंड उत्सुकता असून, “आपलाच उमेदवार विजयी” असा दावा करत अनेक ठिकाणी समर्थकांनी चक्क पैजाही लावल्याचे चित्र दिसत आहे. भाजप समर्थकांकडून जिल्हा परिषद आपल्या ताब्यात येणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे, तर राष्ट्रवादीकडून शेवटच्या क्षणापर्यंत गड राखण्यासाठी चुरशीची लढत दिल्याचा दावा केला जात आहे.

दरम्यान, आज मतमोजणी होणार असून, त्याच दिवशी साताऱ्याच्या राजकारणाचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. जिल्हा परिषदवर भाजपचा झेंडा फडकणार की राष्ट्रवादी आपला बालेकिल्ला कायम राखणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. साताऱ्याच्या राजकारणात ऐतिहासिक उलथापालथ होणार की परंपरागत सत्ता कायम राहणार, याचा फैसला आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे.

भाजपच्या आक्रमक वाटचालीला अडथळा आणण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी गटांसह शिवसेना आणि काँग्रेसनेही आपआपल्या परीने शर्थीचे प्रयत्न केले. प्रत्येक जागेवर चुरस वाढली असून, अंतिम निकालात राजकीय गणिते कशी जुळतात याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हे सुद्धा वाचा : पुणे जिल्ह्याचा ‘कौल’ कुणाला? ७३ जिल्हा परिषद जागांसाठी मतमोजणी, बारामतीकडे सर्वांचे लक्ष

कार्यकर्ते आकडेमोडीत व्यस्त

शनिवारी झालेल्या मतदानानंतर रविवारी दिवसभर जिल्ह्यातील राजकीय मंडळी, पदाधिकारी व कार्यकर्ते आकडेमोडीत गुंतले होते. फोनाफोनीद्वारे विजय–पराभवाचे अंदाज बांधले जात असून, संभाव्य सत्तासमीकरणांवर चर्चा रंगत आहेत.

12 जिल्हा परिषदांसह 125 पंचायत समितींची मतमोजणी

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. निकालानंतर आचारसंहिता उठवली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या ७३१ जागांसाठी एकूण २६२४ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीची मतमोजणी सकाळी दहापासून सुरु झाली आहे. त्यानंतर राज्यातील निवडणुकीचे कल समोर येणार आहेत. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर सर्वच मतमोजणी केंद्रांवर चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

Web Title: Everyones attention is on the results of the satara zilla parishad elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 11:12 AM

Topics:  

  • Election Result
  • Satara News
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

‘मराठ्यांना फसवाल तर भविष्यात मोठी किंमत मोजावी लागेल’; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
1

‘मराठ्यांना फसवाल तर भविष्यात मोठी किंमत मोजावी लागेल’; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Satara News : गोडोलीत पालिकेचा हातोडा; रस्त्यावरील १५ फलक हटविले !
2

Satara News : गोडोलीत पालिकेचा हातोडा; रस्त्यावरील १५ फलक हटविले !

Umbraj News: उंब्रज जिल्हा परिषद शाळेत निकृष्ट कामामुळे ग्रॅनाईट कोसळले; ३ विद्यार्थी जखमी; शिक्षण सभापती तेजस्विनी कदम आक्रमक!
3

Umbraj News: उंब्रज जिल्हा परिषद शाळेत निकृष्ट कामामुळे ग्रॅनाईट कोसळले; ३ विद्यार्थी जखमी; शिक्षण सभापती तेजस्विनी कदम आक्रमक!

Wai News: वाई शहरात पोलिसांचा धाक उरलाय की नाही? बेकायदेशीर गुटखा विक्री, ट्रिपल सीट अन् बुलेटच्या फटाक्यांनी वाईकर हैराण
4

Wai News: वाई शहरात पोलिसांचा धाक उरलाय की नाही? बेकायदेशीर गुटखा विक्री, ट्रिपल सीट अन् बुलेटच्या फटाक्यांनी वाईकर हैराण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.