Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune-Mumbai Traffic Jam: पुणे-मुंबई ट्रॅफिक जामला कायमचा ‘ब्रेक’! १३५ किमीचा शिरूर-उरण मल्टिनोडल कॉरिडॉरला हिरवा कंदील

हा कॉरिडॉर सुरू झाल्यानंतर पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहतुकीवरील ताण ७० ते ८० टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील कोंडीची समस्या कमी होईल.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 06, 2026 | 03:54 PM
Multimodal Corridor, Pune-Mumbai Traffic Jam, JNPT Port,

Multimodal Corridor, Pune-Mumbai Traffic Jam, JNPT Port,

Follow Us
Close
Follow Us:
  • खेड-चाकण परिसराची ‘भाग्यरेषा’ ठरणार नवा महामार्ग
  • पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवरील ८०% ताण कमी होणार
  • शिरूर-चाकण-तळेगाव-कर्जत-उरण कॉरिडॉरला राज्य सरकारचा हिरवा कंदील.
 

Pune-Mumbai Traffic Jam:  मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर वारंवार होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे प्रवासी, नोकरदार तसेच मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून पर्यायी मार्ग उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. अखेर या मागणीला यश मिळण्याची चिन्हे दिसू लागली. खेड–आळंदी मतदारसंघाचे आमदार बाबाजी काळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शिरूर–चाकण–तळेगाव–कर्जत–उरण मल्टिनोडल कॉरिडॉर उभारणीला राज्य सरकारने हिरवा कंदील दिल्याची माहिती समोर येत आहे.

गेल्या काही महिन्यांत मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर अनेक वेळा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत तब्बल ३० तासांहून अधिक काळ वाहतूक ठप्प झाली होती. अपघात, वाहन बिघाड तसेच दुरुस्तीच्या कामांमुळे हजारो प्रवासी महामार्गावर अडकून पडले. या घटनेमुळे एकाच मार्गावर अवलंबून असलेली पुणे–मुंबई वाहतूक व्यवस्था किती असुरक्षित आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

Maharashtra Budget 2026: मुंबईसाठी ‘बजेट’चा बूस्टर डोस! पायाभूत सुविधांच्या महाजाळासाठी हजारो कोटींची तरतूद

याच पार्श्वभूमीवर विधानसभा अधिवेशनात आमदार बाबाजी काळे यांनी ठाम भूमिका घेत, या समस्येवर पर्याय म्हणून शिरूर– चाकण– तळेगाव– कर्जत– उरण मल्टिनोडल कॉरिडॉर उभारण्याची मागणी केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे. सुमारे १३५ किलोमीटर लांबीचा चारपदरी कॉरिडॉर उभारण्याचा प्रस्ताव आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यास पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच नगर रस्त्यावरील वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. विशेष म्हणजे शिरूर आणि चाकण एमआयडीसी परिसरातील औद्योगिक मालवाहतूक उरण येथील जेएनपीटी बंदराशी थेट जोडली जाणार आहे.

तज्ज्ञांच्या मते, हा कॉरिडॉर सुरू झाल्यानंतर पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहतुकीवरील ताण ७० ते ८० टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील कोंडीची समस्या कमी होईल.

दरम्यान, या महत्त्वाच्या विषयावर सभागृहात सातत्याने आवाज उठवून राज्य सरकारचे लक्ष वेधण्यात आमदार बाबाजी काळे यशस्वी ठरल्याने नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे. आता या प्रकल्पाची प्रशासकीय प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Govt Jobs For Agniveers: अग्निवीरांसाठी मोठी बातमी ! सेवेनंतर राज्य सरकारच्या ४ विभागांत मिळणार नोकरीची संधी

 

या प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :

-सुमारे १३५ किमी लांबीचा चारपदरी कॉरिडॉर

– शिरूर–चाकण–तळेगाव–कर्जत–

-उरण असा मार्ग

-चाकण व शिरूर एमआयडीसीला थेट जेएनपीटी बंदराशी जोडणी

-पुणे व पिंपरी-चिंचवड वाहतुकीवरील ताण ७०–८०% कमी होण्याची शक्यता

-औद्योगिक मालवाहतूक अधिक वेगवान व सुलभ

“मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीला पर्याय मिळावा, यासाठी मी सभागृहात वारंवार हा मुद्दा मांडत आलो आहे. हा रस्ता केवळ खेड तालुक्यासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यास या रस्त्याचा मोठा फायदा होईल. लवकरच या प्रकल्पाबाबत योग्य निर्णय होईल. तसेच या मार्गामुळे खेड तालुक्यातील पर्यटनालाही चालना मिळेल आणि हा रस्ता खेड तालुक्यासाठी भाग्यरेषा ठरेल.”

— बाबाजी काळे (आमदार, खेड–आळंदी मतदारसंघ)

 

Web Title: A 135 km shirur uran multinodal corridor will be built to end pune mumbai traffic congestion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 03:54 PM

Topics:  

  • Pune Traffic
  • Pune-Mumbai expressway

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.