
Pune Katraj Traffic Update (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
पुण्यात स्वारगेट ते कात्रज दरम्यान भूमिगत मेट्रोचे काम जोरात चालू आहे. त्यामुळे कात्रज चौकात रोजच ट्रॅफिक जाम होत आहे. लोकांना तासंतास अडकून राहावे लागत आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आता मोठा निर्णय घेतला आहे. कात्रज चौकातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे, विशेषतः जड आणि अवजड वाहनांसाठी.
वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले, कात्रज चौकात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आम्ही काही बदल केले आहेत. डंपर, सिमेंट मिक्सर, ट्रेलर, कंटेनर अशा मोठ्या वाहनांनी कात्रज चौकात येऊच नये. त्यांनी दुसऱ्या पर्यायी रस्त्याने जावे. Pune Katraj Traffic Update:
पोलिसांनी सगळे रस्ते बंद केले आहेत जे कात्रज चौकात येतात. पुणे-सातारा हायवेवरून जुन्या कात्रज बोगद्यामार्गे येणाऱ्या गाड्यांना शिंदेवाडी पासूनच पुढे येऊ दिले जाणार नाही. सातारा रोडने नवीन बोगद्यातून कात्रजकडे येणाऱ्या गाड्यांना नवले पूल इथेच अडवले जाणार आहे.
मुंबई-बेंगलोर बाह्यवळण रस्त्याने वारजे मधून कात्रजकडे येणाऱ्या वाहनांना पण नवले पुलावरच थांबवले जाणार आहे. मुंबईकडून वारजेमार्गे येणाऱ्या गाड्यांना पण तिथेच बंदी असेल.
सोलापूरकडून हडपसर, मंतरवाडी, कात्रज-कोंढवा रोडने येणाऱ्या जड गाड्यांना मंतरवाडी चौकाच्या पुढे येऊ दिले जाणार नाही. बोपदेव घाटातून कात्रज-कोंढवा रोडने येणाऱ्या गाड्यांना पण बंदी आहे.
मार्केट यार्ड, गंगाधाम, बिबवेवाडी मार्गे कात्रजकडे येणाऱ्या गाड्यांना पण प्रवेश नाही. स्वारगेटकडून कात्रज चौकात जाणाऱ्या गाड्यांना पण थेट बंदी घातली आहे.
पोलिसांनी पर्यायी मार्ग पण सांगितले आहेत. जड वाहनांनी नवले पूल, नवीन कात्रज बोगदा, खेड शिवापूर, सासवड, गराडे, चिंबळी, मंतरवाडी, वडकी या मार्गाने जावे. दुसरा मार्ग म्हणजे नवले पूल, नवीन कात्रज बोगदा, खेड शिवापूर, गराडे, भिवरी, बोपदेव घाट, येवलेवाडी, पिसोळी, मंतरवाडी असा आहे.
Crime News: मुलगी गरोदर असल्याचं कळताच बापाने उचललं धक्कादायक पाऊल; अखेर कोर्टाचा मोठा निर्णय!
साताऱ्याहून स्वारगेटकडे येणाऱ्या एसटी बस आणि प्रवासी गाड्यांनी नवले पूल परिसरातून उजवीकडे वळून कात्रज मार्गे स्वारगेटला जावे, असे सांगितले आहे.
कात्रजमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी पण नियम आहेत. कात्रजकडून स्वारगेटला जाणाऱ्यांनी कात्रज चौकातून जाऊ नये, दुसरा रस्ता वापरावा.आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे पार्किंगवर बंदी घातली आहे.
कुणीतरी आले गं! Pune शहरात घुमणार वाघांची डरकाळी; नागपूरवरून आले नवे पाहुणे, मात्र…
वंडरसिटी सोसायटी ते कात्रज बायपास चौकापर्यंत दोन्ही बाजूला गाड्या लावता येणार नाहीत. कात्रज बायपास चौक ते मोरे बाग, बायपास चौक ते राजस सोसायटी आणि बायपास चौक ते जुन्या कात्रज बोगद्यापर्यंत पण दोन्ही बाजूला पार्किंगला मनाई आहे.
मेट्रोचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी हे बदल केले आहेत. पुणेकरांनी पोलिसांना सहकार्य करावे आणि पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.