कल्याण- येथील शिवगर्जना मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अर्वाच्च भाषेत शेरेबाजी करत त्यांना अर्वाच्च भाषेत भाषणातून शिवीगाळ करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या माजी नगरसेविका आणि शिवसेनेच्या (उध्दव बाळासाहेब ठाकरे) महिला मुंबई संघटक राजुल पटेल यांच्या विरुध्द शिंदे गटाच्या समर्थक छाया वाघमारे यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तातडीने तपास सुरू केला आहे.
काय म्हणाल्या राजुल पटेल?
ही जी लढाई आहे निष्ठा विरुद्ध स्वार्थाची लढाई आहे. या लढाईत स्वार्थी माणूस केव्हावी हरतो आणि निष्ठा जिंकते असे त्या म्हणाल्या. गेली अडीच वर्ष शिंदे नगरविकास मंत्री होते सगळी कामे केली तेव्हा झोपले होते का? असा सवाल केला अडीच वर्षात उद्धवजिंच्या, राष्ट्रवादी , काँग्रेसच्या मांडीला मांडी लावली. अडीच वर्षांत आठवण आली शिवसेना जे करतेय ते चुकीचं आहे. आम्ही करणार ते खरं आणि आमच्या जवळ बाळासाहेबांचे हिंदुत्व आहे पुढे बोलताना शिव्या देत त्यांना त्यांची जागा दाखवणे गरजेचं असल्याचे सांगितले.
आज भाजप त्यांना शिकवतात. आमचे उद्धव ठाकरे तुमच्यावर विश्वास ठेवत होते. तुम्ही जे सांगणार ते पूर्व दिशा करत होते. मुख्यमंत्रीच व्हायचं होत तर उद्धव ठाकरे यांना सांगायचं होतं त्यांनी खुल्या मनाने केलं असतं. शिवसेनेला संपवणारे संपले. नारायण संपला, राज ठाकरे संपले. नाव घेणार नव्हते मात्र आज राज ठाकरे यांच्याकडे एक आमदार आहे. महानगरपालिकेत एक नगरसेवक नाही. राज ठाकरे निघाले तेव्हा शिवसेना संपली बोलत होते. नारायण राणे निघाले तेव्हा शिवसेना संपली असे बोलत होते. पुढे बोलताना पटेल यांनी राणे यांना समजायला पाहिजे असे सांगत राणे यांना शिव्या दिल्या. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करीत पुढील तपस सुरू केला आहे.